रॅम म्हणजे काय? ( computer ram information in marathi).
रॅम म्हणजे काय? ( computer ram information in marathi). आजकाल जवळ जवळ सर्वांकडे स्मार्टफोन झाले आहेत तसेच बहुतांश लोकांकडे संगणक आणि टॅबलेट पीसी देखील आहेत.
मोबाइल असो की संगणक खरेदी करते वेळेस सर्वांची एका गोष्टीकडे नक्कीच नजर जाते आणि ती म्हणजे रॅम काही मोजक्याच लोकांना रॅम बद्दल सखोल माहिती असते बाकी लोक अधिक रॅम म्हणजे चांगला परफॉर्मनस या एकाच समिकर्णाच्या आधारे मोबाइल अथवा संगणक खरेदी करतात.
तर आज आपण रॅम म्हणजे काय या विषयावर माहिती बघणार आहोत.
मोबाईल आणि संगणकाचे प्रोसेसर इतकेच किंबहुना त्याहूनही अधिक महत्व रॅम ला आहे.संगणकातील आणि मोबाईल मधील रॅम ची काम करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी प्रक्रिया मात्र सारखीच असते.
प्रोसेसर प्रमाणेच रॅम डॉमेज झाल्यास डिव्हाईस बंद पडू शकते.
रॅम चे पूर्ण नाव हे रॅनडम एक्सेस मेमरी random access memory आहे.आपल्या डिव्हाईस मधील साठवणूक करणाऱ्या अंतर्गत किंवा बाह्य प्रणालीपेक्षा जलद प्रणाली रॅम मध्ये असते सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास रॅम म्हणजे साठवलेल्या माहिती व प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसर यांच्यामधील दुवा म्हणता येईल. किंवा मोबाइल अथवा संगणकाचा मेंदूदेखील म्हणता येऊ शकतो.
रॅम कसे कार्य करते?
आपण मोबाईल मधली कुठलीही माहिती शोधत असू तर ही संपूर्ण प्रक्रिया पार पडण्याचे कार्य रॅम करते.
रॅम च्या विरुद्ध असणारा प्रकार म्हणजे सॅम serial access memory ज्यामध्ये कुठलाही डाटा म्हणजे माहिती एका सेल्समध्ये साठवला जातो व शोधताना अनुक्रमानेच शोधला जातो म्हणजे जोपर्यंत इच्छुक माहिती सापडत नाही तोपर्यंत अनुक्रम आणि शोधकार्य चालूच राहते आणि यामध्ये प्रचंड वेळ जातो
या विरुद्ध ram मध्ये माहिती शोधण्यासठी कुठलाही सेल्स मध्ये प्रवेश करणे शक्य असते परिणामी फक्त हवी असलेली माहिती तपासली जाते व वेळ वाचतो.
रॅम चा बॅटरीवर परिणाम होतो का?
या विधानासाठी कुठलाही कठोर नियम नाही सोशल मीडिया ॲप जसे की फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी संबंधित संस्थेच्या सर्वरशी जोडलेले असतात व वारंवार अद्यावत म्हणजेच अपडेट होत असतात परिणामी हे बॅटरी खर्च करण्यास समर्थ असतात मात्र बरेच प्रकारचे ऑफलाईन ॲप्स फक्त वापरल्यास कार्यरत असतात परिणामी रामचा देखील वापर होत नाही व बॅटरी खर्च होत नाही.
रॅम ची क्षमता वाढवली जाऊ शकते का?
बऱ्याच वेळेस आपण मोबाईल अथवा संगणक घेताना पैशांअभावी अथवा काही कारणास्तव कमी रॅमचा पर्याय निवडतो मात्र वेळेनुसार आपल्याला ती रॅम कमी पडू लागते व इतक्यात आपण नवीन डिवाइस खरेदी देखील करू शकत नाही मग आपल्याला प्रश्न पडतो की रॅम वाढवता येऊ शकेल काय?
मात्र याचे उत्तर नकारात्मकच येते आजपर्यंत तरी रॅम वाढवता येणे शक्य नाही यासाठी पर्याय म्हणजे सुरवातीलाच पुरेसा रॅम असलेल्या डिव्हाईस ची निवड करणे फायद्याचे ठरते आपण जास्त हेवी काम करणार नसाल तर आपणास 2 GB पुरेसा ठरू शकतो मात्र आपण हेवी गेम्स सोबतच multitasking करणार असाल तर आपल्याला 6 -8 GB क्षमतेच्या रॅम आवश्यक आहे. आजकाल 4 -6 GB रॅम सर्रास वापरली जाते.
रॅम चे प्रकार कोणते आहेत?
SRAM (static random access memory) अर्थात स्थिर रँडम एक्सेस मेमरी
Static random access memory ही अशी अशी प्रकारची रॅम आहे ज्यामधील डेटा म्हणजेच माहिती डिव्हाईस बंद अर्थात switch off केल्यानंतर पुसली जाते.याच मेमरीला cache memory देखील म्हंटले जाते या प्रकारची मेमरी कमी वेळेस रिफ्रेश होते याचे कारण ही flip flop पासून बनलेली असते.
DRAM dynamic random access memory
या प्रकारची रॅम किमतीला स्वस्त असते . म्हणून डिवाइस मध्ये याच प्रकारच्या रॅमचा वापर होतो स्वस्त असली तरीही या मेमोरी चा वेग अतिशय कमी असतो याचे कारण म्हणजे रिफ्रेश होण्याचा वेग अधिक असणे या प्रकारची मेमरी प्रति सेकंदाला एक हजार वेळेस रिफ्रेश होते
आशा आहे रॅम म्हणजे काय? ( computer ram information in marathi) माहिती आपल्यासाठी मार्गदर्शक ठरली असेल असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी विकी मित्राला नियमित भेट द्या तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील वाचण्याचा सल्ला द्या