रोम म्हणजे काय ? | computer rom information in marathi
विकिमत्र च्या सर्व वाचकांचे स्वागत मित्रांनो आज आपण कॉम्पुटर च्या एका अविभाज्य भागाबद्दल माहिती करून घेणार आहोत. चला तर म…!
ROM म्हणजे इंग्रजी मध्ये त्याचा फुलफॉर्म होतो रीड ओन्ली मेमरी (read only memory) असा आहे.ROM ही एक कॉम्पुटर कगी मेमरी आहे.ही कॉम्पुटर ची अशी मेमरी आहे जी केवळ आणि केवळ वाचली जाऊ शकते पण ती काढली किंवा पुसली जाऊ शकत नाही.
रोम चा उपयोग हा संगणकामध्ये किंवा मोबाईल मध्ये मल्टिमीडिया ऑडिओज,व्हिडीओ, चित्रे,महत्वपूर्ण फाईली संचयित करण्यासाठी होतो.
रोम संगणकामध्ये किंवा मोबाईल मध्ये खूप महत्त्वाचे कार्य बजावतो जे म्हणजे जेव्हा आपण संगणकामध्ये किंवा मोबाइल मध्ये काही महत्त्वाचे कार्य करत असू आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाला तर रोम आपला महत्त्व पूर्ण डेटा अदृश्य होऊ देत नाही. रोम हा संगणकामधील डेटा कायमचा संचयित करून ठेवतो. या मुळे रोम ला फॉरेव्हर किंवा कायमस्वरूपी स्टोरेज डिव्हाईस देखील म्हंटले जाते.
रोम चे कार्य
रोम चे महत्वाचे कार्य म्हणजे संगणक बंद झाल्यावर ही डेटा सुरक्षित ठेवणे. रोम हा चिप रॅम पेक्षा बऱ्याच प्रमाणात स्वस्त असतो.रोम हा सिपीयू चा एक भाग मानला जातो.रोम चा उपयोग फक्त संगणकात होत नसून अनेक यंत्रांमध्ये याचा उपयोग होतो. रोम ह्या मेमरी चा उपयोग हा टेलिव्हिजन,एसी,मोबाईल,वॉशिंग मशीन मध्ये देखील केला जातो.
रोम ची मेमरी ही नॉन व्होलाटाइल या प्रकारची आहे, नॉन व्होलाटाइल ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की जी मेमरी कधीही पुसली जाऊ शकत नाही. किंवा डिलीट होऊ शकत नाही. जेव्हा वीज खंडित होते तेव्हा संगणक बंद पडतो तेव्हा ही मेमरी पुसली जात नाही व सिपीयू मधल्या चिप मध्ये साठवून राहते.
जेव्हा तुम्ही तुमचा संगणक स्टार्ट करता,बुटिंग करता किंवा संगणक प्रोसेस होत असतो तेव्हा संगणकाला instructions ची गरज असते, या instruction रोम मध्ये साठवलेल्या असतात. या instruction चा उपयोग करून संगणकाची बुटिंग प्रोसेस होते.
रोम चे चार प्रकार पडतात.
1. MROM – मास्केबल रीड ओन्ली मेमरी (maskable read only memory)
ही सगळ्यात जुन्या प्रकारची मेमरी असून सध्या कुठेही हीचा वापर होत नाही.
2. PROM – प्रोग्रामेबले रीड ओन्ली मेमरी (programmable read only memory)
प्रोग्रामेबले रीड ओन्ली मेमरी अश्या प्रकारची मेमरी आहे जी केवळ एकदाच बदली जाऊ शकते.एकदा अपडेट केल्यावर आपण ही मेमरी बदलू शकत नाही. जर आपण रिकाम्या रोम मध्ये माहिती संचयित करून ठेवली तर आपण ही माहिती तर आपण ही माहिती पुन्हा कधीही अपडेट करू शकत नाही. म्ह्णून माहिती भरताना काळजी पूर्वक भरावी. एकदा संचय केलेली माहिती पुसली जात नाही.
3. EPROM – ईरेसेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी (erasable and programmable read only memory)
ईरेसेबल अँड प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी अशी मेमरी आहे जी आपण इरेज करू शकतो व पुन्हा एकदा संचयित करू शकतो.इरेज आणि पुन्हा संचय करण्याची प्रक्रिया जरा वेगळी असते,त्यासाठी या मेमरील 40 मिनिटे अल्ट्राव्हायोलेट लाईट मध्ये ठेवले जाते त्यामुळे ही मेमरी नष्ट होते,मेमरी नष्ट केल्यावर आपण मेमरी पुन्हा संचय करू शकतो.
4. EEPROM – इलेकट्रीकली इरेज आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरी (electrically erase and programmable read only memory)
सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात नव नवीन शोधांमुळे मेमरी नष्ट करणे व पुन्हा संचय करण्याची गरज आपल्याला भासते.या मुळे या इलेकट्रीकली इरेज आणि प्रोग्रामेबल रीड ओन्ली मेमरीचा शोध लागला. या मेमरीला नवीन युगात जास्त प्रमाणात वापरले जाते. या मेमरी चे वैशिष्ट्य असे आहे की या मेमरीला आपण 10 हजारापेक्षा जास्त वेळा इरेज करू शकतो,व त्याच प्रमाणात अपडेट देखील करू शकतो. या मेमरीमध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणची मेमरी इरेज न करता आपल्याला हव्या त्या ठिकाणची मेमरी इरेज करून आपण तिथे अपडेट करू शकतो. या साठी आपल्याला सगळ्या ठिकाणची मेमरी इरेज करावी लागत नाही.
रोम चे फायदे (advantages of computer rom in marathi)
1.जोपर्यंत आपण रोम ची माहिती बदलत नाही,तोपर्यंत रोमची माहिती बदलली जात नाही.,रोम ची माहिती स्वतःहून बदलली जात नाही.
2.रोम मधील माहिती नष्ट होत नाही.
3.रोम ही मेमरी रॅम मेमरी पेक्षा अधिक विश्वासू असते,कारण संगणकाचा वीज पुरवठा खंडित झाला तरीही रोम मेमरी पुसली जात नाही.
4.ही मेमरी स्थिर असल्याकारणाने पुन्हा पुन्हा रिफ्रेश करण्याची गरज नसते.
5.रोम मध्ये डेटा हा काळजीपूर्वक साठवावा कारण तो पुन्हा बदलता येऊ शकत नाही.
आशा करतो की रोम म्हणजे काय ? ( computer rom information in marathi ) हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला यामधून नवीन काही माहिती मिळाली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.