क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती Credit Card Information In Marathi

Credit Card Information In Marathi आज विज्ञान तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की, आपण घरबसल्या आपले दैनंदिन जीवनातील अनेक कामे करू शकतो किंवा व्यवहार सुद्धा करू शकतो. ऑफिसच्या कामापासून ते ऑनलाईन शॉपिंग पर्यंत आपण घरबसल्या सर्वच कामे करू शकतो. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आपल्याला बँकेतील व्यवहार किंवा पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर आता बँकेमध्ये जाण्याची सुद्धा गरज राहत नाही किंवा एखाद्या हॉटेलमध्ये तुम्हाला रूम बुक करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून ही रूम बुक करू शकता.

Credit Card Information In Marathi

क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती Credit Card Information In Marathi

बँकांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्रेडिट कार्डची निर्मिती केलेली आहे. क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे पेमेंट कार्डच आहे. जे बँकेद्वारे जारी केले जाते जे त्यांच्या वापरकर्त्यांना वस्तू तसेच सेवा खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वर रोख रक्कम काढण्याची सुद्धा परवानगी देते. अशा प्रकारे कार्ड वापरल्याने कर्ज जमा होते. नंतर ते फेडावे लागते.

ते क्रेडिट कार्ड हे जगभरातील सर्व मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पेमेंट प्रकारांपैकी एक आहे. ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना यामुळे काही प्रमाणात सूट किंवा रिवार्ड पॉईंट मिळत असतात. याच क्रेडिट कार्ड विषयी आज आपण माहिती पाहूया.

क्रेडिट कार्ड माहिती
वयोमर्यादा18 वर्ष
व्याजदर2.5% ते 3.5% परमंथ
उत्पन्नएक लाख ते तीन लाख
क्रेडिट कार्डचे प्रकाररिवार्ड, कॅशबॅक,
खरेदी, लाइफस्टाइल.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड ही एक बँक कडून वित्तीय सेवा कंपनीद्वारे जारी केलेले प्लास्टिक किंवा धातूचा एक पातळ असा तुकडा असतो. जे कार्डधारकांना उधारी खात्याप्रमाणेच कोणतेही व्यवहार करण्यास परवानगी देते. कोणत्याही बँकेचे तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर या कार्डमध्ये तुम्ही उधारी व्यवहार सुद्धा करू शकता परंतु त्यामध्ये एक लिमिट दिलेली असते.

म्हणजेच या क्रेडिट कार्डमध्ये पैसे नसताना सुद्धा तुम्ही पैशांची व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. वापरलेले पैसे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात बँकेला परत करायचे असतात. खर्च केलेले पैसे तुम्ही पूर्ण भरू शकता किंवा मिनिमम रक्कम सुद्धा तुम्ही खात्यामध्ये जमा करू शकता.

क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

तुम्ही क्रेडिट कार्ड काढू शकता त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते.
पगारदार व्यक्तींना क्रेडिट कार्ड लागू करण्यासाठी काही कागदपत्रे खालील प्रमाणे आहे. त्यामध्ये ओळखीचा पुरावा ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे लागतात.

पत्ता पुरावा त्यासाठी तुम्हाला टेलिफोन बिल, पासपोर्ट, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदार ओळखपत्राची आवश्यकता असते. उत्पन्नाचा पुरावा, नवीनतम पे स्लिप फ्रॉम 16 आणि आयकर रिटर्न. वयाचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र. इतर कागदपत्रे त्यामध्ये पॅन कार्ड, फोटोकॉपी आणि फॉर्म नंबर 60.

क्रेडिट कार्ड पात्रता :

क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला काही पात्रतेच्या अटी आहेत. ज्या पूर्ण कराव्या लागतात, त्यामध्ये अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे किमान उत्पन्न किंवा वेतन एक लाख ते तीन लाख दरम्यान असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार एक तर पगार दर किंवा स्वयंरोजगार असावा.

क्रेडिट कार्डचे प्रकार :

रिवार्ड क्रेडिट कार्ड : यामध्ये तुम्ही कार्ड सोबत खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी काही प्रकारचे तुम्हाला रिवार्ड मिळतात. प्रत्येक बँक तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या व्यवहारासाठी मिळणाऱ्या रिवार्ड पॉईंटची संख्या ग्राह्य धरली जाते.

कॅशबॅक क्रेडिट कार्ड : तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदीची रक्कम भरली असेल तर तुम्हाला कॅशबॅक म्हणून काही रक्कम परत मिळते. जे तुमच्या खात्यात जमा होते जसे तुम्हाला पेट्रोल व्यवहारांसाठी कॅशबॅक मिळू शकते.

खरेदी क्रेडिट कार्ड : खरेदी क्रेडिट कार्ड हे तुमच्या खरेदीच्या खर्चासाठी वापरले जाते. जेव्हा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता तेव्हा तुम्हाला यावर डील्स किंवा ऑफर मिळतात किंवा इतर बक्षिसे सुद्धा मिळू शकतात.

लाईफस्टाईल क्रेडिट कार्ड : यामध्ये प्रीमियर स्क्रीनिंग नाईट लाईफ फॅशन शो आणि बरेच काही गोष्टी समाविष्ट केलेले आहेत. या सर्व खर्चांवर तुम्ही कार्ड्स स्वाईप केल्यानंतर काही फायदे मिळतात.

क्रेडिट कार्डचे फायदे :

क्रेडिट कार्डचे तुम्हाला अनेक फायदे आहेत. क्रेडिट कार्ड जर तुमच्याकडे एखाद्या बँकेचे असेल तर तुम्ही तुमच्याकडे पैसे नसले तरी सुद्धा काही व्यवहार करू शकता या कार्डमध्ये तुम्हाला पैशांची एक लिमिट दिलेली असते. त्या लिमिटपर्यंत तुम्ही हे व्यवहार करू शकता आणि तुम्हाला महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे बँकेला परत करायचे असतात. तुम्ही खर्च केलेले पैसे पूर्ण सुद्धा करू शकता किंवा मग तुम्हाला मिनिमम रक्कम भरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही भरू शकता.

वेलकम ऑफर : क्रेडिट कार्ड धारकांना विविध प्रकारचे वेलकम ऑफर मिळतात. यामध्ये भेटवस्तू वाउचर डिस्काउंट किंवा बोनस रिवार्ड पॉईंटच्या स्वरूपात ग्राहकांना मिळत असतात. याचा उपयोग करून ते व्यवहार सुद्धा करू शकतात.

फ्यूल सरचार्ज सूट : ही सेवा सर्वच प्रकारच्या क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या वाहनांमध्ये इंधन भरता तेव्हा तुम्ही विशिष्ट रक्कम खर्च केल्यावर क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही पैसे भरल्यास तुम्हाला यावर काही प्रमाणात सूट मिळते.

रिवार्ड पॉईंट्स आणि कॅशबॅक : तुम्ही जर क्रेडिट कार्डचा उपयोग करून शॉपिंग केली असेल तर तुम्हाला काही रिवार्ड पॉईंट्स किंवा कॅशबॅक सुद्धा मिळते. या रिवार्ड पॉईंटचा वापर मोफत वस्तू मिळवण्यासाठी केला जातो. इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तूच्या किमती कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. तर कॅशबॅक हे एक तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणारी रक्कम असते. याशिवाय रिवार्ड पॉईंट्स ऐवजी तुम्ही एअर माईलसुद्धा मिळू शकतात. जी फ्लाईट किंवा इतर तिकीट बुक करण्यासाठी सुद्धा वापरू शकता.

कॅश ॲडव्हान्स : कॅश ऍडव्हान्स तुम्ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्डचा उपयोग करून रोख रक्कम एटीएम मधून काढू शकता. हा एक क्रेडिट कार्डचा महत्त्वाचा फायदा आहे.

विमा क्रेडिट कार्ड : अपघात त्याच्या बाबतीत विमा आणि निश्चित कव्हर रक्कम सुद्धा उपलब्ध करून देते. ही विमान अपघात कव्हरेज कार्ड लॉस कव्हर किंवा परदेशी हॉस्पिटडायजेशन कव्हर उपलब्ध करतात.

क्रेडिट कार्डवर लोन : तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड उपलब्ध असेल तर तुम्ही कोणतेही कागदपत्रे सादर न करता ताबडतोब लोन घेऊ शकता. तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिटनुसार तुम्हाला लोन बँकेकडून प्राप्त होते.

क्रेडिट कार्ड कसे काढावे ?

तुम्ही क्रेडिट कार्ड काढत असताना सर्वप्रथम तुम्हाला कोणते क्रेडिट कार्ड हवे आहेत. ते पर्याय निवडावे लागेल. त्यानंतर तुम्ही हवे असलेले फायदे यावर अवलंबून राहून कार्डाची निवड करू शकता. तुम्ही स्वतःसाठी योग्य असे कार्ड निवडल्यानंतर कार्डची पात्रता आणि तुमच्या क्रेडिट कार्ड अर्ज सोबत तुम्ही सबमिट केलेली सर्व कागदपत्रे याबद्दल बँकेकडे तपासा. त्यानंतर तुमच्या कार्डसाठी अर्ज करावा लागतो. त्यामध्ये सर्वच कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावे लागतील. तुम्ही अर्ज भरून घेतल्यानंतर तुम्हाला काही चार्ज लागेल त्यानंतर तुमचे कार्ड ऍक्टिव्ह करावे लागेल. क्रेडिड कार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता.

FAQ

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारचे कर्ज सुविधा आहे. प्रत्येक क्रेडिट कार्डला एक विशिष्ट मर्यादा असते.

क्रेडिट कार्ड चा शोध कधी लागला

1950 मध्ये डायनर्स क्लब कार्ड हे सर्वात पहिले आधुनिक क्रेडिट कार्ड म्हणून ओळखले जाते.

भेटकार्ड कधी लोकप्रिय झाले?

1970 च्या दशकाच्या सुरुवातीस क्रेडिट कार्ड लोकप्रिय झाले.

क्रेडिट कार्ड मधील चिप चा शोध कोणी लावला?

मिशेल उगॉन यांनी दोन चिप्स असलेले पहिले मायक्रोप्रोसेसर स्मार्ट कार्ड शोधून काढले.

कार्डचा विकास कसा झाला?

अमेरिकन एक्सप्रेस ने 1959 मध्ये पहिले प्लास्टिकचे बनवलेले पहिले क्रेडिट कार्ड जारी केले आणि डिनर क्लब ने 1961 मध्ये त्यांच्या कार्डची प्लास्टिक आवृत्ती जारी करण्यास सुरुवात केली.

Leave a Comment