मगर प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Information In Marathi

Crocodile Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण मगर या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण मगर या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, मगर कुठे राहतात, ते वास्तव्य कसे करतात, त्यांचे प्रकार किती आहेत?

Crocodile Information In Marathi

मगर प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Information In Marathi

मगर हा प्राणी पाणी आणि जमीन दोन्ही वरही राहू शकतो म्हणून त्याला उभयचर प्राणी म्हणतात .या प्राण्याला आपण मराठीमध्ये “मगर” हिंदीमध्ये “मगरमच” आणि इंग्रजीमध्ये “क्रोकोडाइल” असे म्हणतात .हा प्राणी खाऱ्या आणि गोड्या या दोन्ही प्रकारच्या पाण्यात राहतो.

मगर ही आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मधील उष्ण कटिबंधात पाहायला मिळतात. काही प्रजाती विशेषतः ऑस्ट्रेलिया ,आग्नेय आशिया आणि पॅसिफिक बेटांच्या जवळ आढळतात.खारट पाण्यातील मगर बहुतेक वेळा किनारपट्टीच्या भागात आढळतात.मगर एक प्राचीन वंश असून तो डायनासोर च्या काळापासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे असे मानले जाते.

मगरीची शारीरिक वैशिष्ट्ये

त्यांना चांगले शिकारी बनवतात. मगरीच्या एकूण 13 प्रजाती आहेत. मगरीचे सामान्य नाव मगर असून, तिचे वैज्ञानिक नाव Crocodylinae असे आहे.

मगरीची शरीर रचना

मगरीला दोन डोळे, चार पाय व एक लांब शेपूट असते. शेपटीला लहान लहान काटे असतात. शेपटीची लांबी 10 फुटांपर्यंत असते. मगरीची शेपूट लांब, सपाट आणि मजबूत असते. त्याच्या शेपटीत भरपूर शक्ती असते. शेपूट हे त्यांचे एक प्रकारचे हत्यार आहे ज्याने ते किनाऱ्यावरील प्राण्यांना ओघाने पाण्यात ओढतात.

या प्राण्याचा जबडा मोठा असतो. हा प्राणी जीभेने आपले पक्ष पकडून खातो. मगरीचे डोके त्रिकोणी व चपटे असते. तोंडाच्या वरच्या बाजूस दोन नाकपुड्या असतात. या प्राण्याच्या तोंडात दात असतात व वरच्या बाजूस दोन मोठे दात असतात. या प्राण्याची लांबी शेपटीपासून डोक्यापर्यंत 7 ते 8 फूट असून,या प्राण्याची त्वचा जाड असते.

मगरीचा रंग राखाडी काळपट असतो. सर्वात लहान मगर म्हणजे बौने मगर त्याची लांबी सुमारे 5.7 फूट म्हणजेच 1.7 मीटर असते. आणि वजन 13 ते 15 पौंड म्हणजेच 6 ते 7 किलो ग्रॅम असते. सर्वात मोठी मगर म्हणजे खाऱ्या पाण्यातील मगर या मगरीची लांबी 20 फूट म्हणजे 6.17 मीटर लांब आहे. त्यांचे वजन 2000 पौंड म्हणजेच 907 किलो पर्यंत असू शकते.

आधिवास

मगरि या साधारणपणे सरोवरे, नद्या ,आद्रभूमि ,तलाव आणि अगदी काही खाऱ्या पाण्याच्या प्रदेशांत जवळ देखील राहतात. मगर हा प्राणी शक्यतो उष्णकटिबंधीय प्रदेशात मध्ये राहतो.कारण ते थंड रक्ताचे आहेत .

ते स्वतःची उष्णता निर्माण करू शकत नाही. थंड महिन्यांमध्ये ते हायबरनेट करतात किंवा सुप्त होतात. आणि हायबरनेट  करण्यासाठी ते नदीच्या काठावर किंवा तलावाच्या बाजूला एक खड्डा खोदतात आणि दीर्घ झोपेसाठी तेथे स्थायिक होतात.

मगरीचा आहार

मगर हा प्राणी एक मांसाहारी प्राणी आहे .मगर फक्त मांस खाते.मगर मासे, पक्षी ,बेडूक, उंदीर या प्रकारचे अन्न खाते. जंगलातील मगर जेव्हा शिकार करते तेव्हा शिकार आपल्या जवळ यामध्ये पकडते. मगर एक हिंसक प्राणी आहे .ती कधी कधी माणसावरही जीवघेणा हल्ला करते. ती एखाद्या माणसाला ही आपल्या जबड्यात पकडू शकते.

मगरीला आपला जबडा लवकर उघडता येत नाही म्हणून मगर आपले भक्ष समोर दिसताच हळूहळू आपला जबडा उघडून ठेवते आणि भक्षाजवळ जाऊन चटकन आपले भक्ष तोंडात घेते. स्वतःच्या रक्षणासाठी मगर आपल्या शेपटीचा उपयोग करते.

मगर या प्राण्याचा विधीचा हंगाम आणि सवयी

मगरीचा प्रजनन हंगाम जानेवारी ते मे दरम्यान असतो नवीन हंगामात नर मादी ना घुंगरू पाण्यात थाप मारून नाकातून पाणी उडवून आणि विविध प्रकारचे आवाज करून मादी मगरीला आकर्षित करतात. मगर तलाव तळे यांच्या काठावरील झुडपात घरटी बांधून सुमारे 20 ते 40 अंडी घालते ते घरटे पाणी आणि इतर वनस्पती ती झाकून ठेवते पडणारी वनस्पती आणि उबदार आणि घरटे ओलसर ठेवते मादी घरटे जवळ राहून घरट्याचे रक्षण करते एका वेळेला मगर खूप अंडे देते पण त्यापैकी खूप कमी जिवंत राहतात. इतर प्राणी त्या अंड्यांना खाऊन घेतात. जेव्हा त्या अंड्यातून आवाज येतो तेव्हा त्या अंड्यांना मगर बाहेर काढते व मगरीच्या पिल्लांचा जन्म होतो.

मगरी विषयी काही वैशिष्ट्ये

मगरीचे शरीर खूप कठीण असते. याचे शरीर हे बुलेटप्रूफ प्रमाणे म्हणजेच यांना बंदुकीच्या गोळीने सुद्धा काही होणार नाही असे असते .त्यांच्या शरीराची चामडी खूप कठीण असते. त्यांच्या शरीरावर बाकी प्राण्यांसारख्या घामाच्या ग्रंथी नसतात. मगरीचा आयुष्य काळ हा 70 ते 100 वर्षापर्यंत असतो.

मगर हा प्राणी जमिनीवर तसेच पाण्यात सुद्धा राहतो. पण पाण्यात असताना त्याला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर यावे लागते पण आवश्यकता पडली तर तो 5 ते 6 तास सुद्धा पाण्यामध्ये राहू शकतो. मगर ही जर जंगलात राहत असेल तर तिचा जीवन काळ हा 30 ते 50 वर्षापर्यंत असतो.

पण तेच मगर जर पाण्यामध्ये राहत असेल तर ती सहा 70 ते 80 वर्ष जगते.मगरीची आणखी एक विशेषता म्हणजे ती आपले डोळे उघडे ठेवून सुद्धा झोप घेऊ शकते. तसेच मगर स्वतःचे तोंड सुद्धा उघडे ठेवून झोपते कारण तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या घामाच्या ग्रंथी नसल्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर टाकू शकत नाही म्हणून ती आपले तोंड उघडे ठेवून झोपते.

ज्याच्या माध्यमाने ती आपल्या शरीरातील उष्णता बाहेर टाकू शकेल. मगरीची आणखी एक विशेषता म्हणजे ते कोल्ड ब्लडेड  प्राण्यांमध्ये वर्गीकृत होतात. त्यांच्या शरीरात चयापचय क्रिया खूप हळू हळू होत असते म्हणून हे प्राणी खूप दिवस उपाशी सुद्धा राहू शकतात. एक महिना काहीही न खाता मगर जिवंत राहू शकतात.

मगरीच्या कातडीचे फायदे

जनावरांच्या कातड्याचा वापर माणूस बऱ्याच ठिकाणी करायला लागला आहे. त्याच प्रमाणे मगरीच्या कातड्यापासून कमरेचे बेल्ट, पर्स ,जॅकेट, पिशव्या यांची निर्मिती केली जाते. त्यामुळे मागील काही वर्षात मगरीच्या शिकारीत वाढ झालेली पाहायला मिळते.

मगर प्राण्याविषयी काही तथ्य

  • जगातील सर्वात मोठी मगर प्रजाती भारत फिजी आणि ऑस्ट्रेलियाच्या खाऱ्या पाण्यात आढळते. ही प्रजाती क्रोकोडायलस पोरोसु म्हणून ओळखली जाते. त्यांची लांबी 123 फूट आणि वजन 100 किलो पर्यंत असू शकते.
  • सर्वात लहान मगर म्हणजे बटू मगर त्याची लांबी पाच फूट पर्यंत असते आणि वजन 32 किलोपर्यंत आहे.
  • माचीमोसॉरस जगातील सर्वात मोठी मगर होती त्याचा आकार तितकाच मोठा होता. त्याची लांबी 30 फूट आणि वजन 3 टन होते.त्याची कवटी 5 फूट लांब होती.
  • उष्ण कटिबंधीय प्रदेशात मगरी आढळण्याचे मुख्य कारण म्हणजे ते थंड रक्ताचे प्राणी आहे त्यामुळे ते स्वतःची उष्णता निर्माण करू शकत नाहीत.
  • एस्टीव्हेशन च्या वेळी मगरी प्रत्येक 2 मिनिटात फक्त एक किंवा दोन वेळा श्वास घेतात. त्यांच्या शरीराचे तापमान देखील 15 अंशांनी कमी होते .जे त्यांचा चयापचय व दर देखील कमी करते.
  • मगरीच्या तोंडात 24 दात असतात जे अतिशय तीक्ष्ण असतात. त्यांचा जबडा देखील खूप मजबूत असल्यामुळे ते त्यांची शिकार चघळण्याऐवजी गीळणे पसंत करतात.
  • मगरीची एक अनोखी गोष्ट अशी आहे की शिकार गिळल्यानंतर हे दगडाचे तुकडे ही गिळतात. दगडाचे तुकडे पोटात जातात आणि अन्न तोडून पावडर करतात. या प्रक्रियेमुळे अन्न पचन होण्यास मदत होते.
  • मगरीचे डोळे तीक्ष्ण असतात. रात्री त्यांची दृष्टी दिवसापेक्षा चांगली असते. रात्रीच्या वेळी मगरीचे डोळे चमकलेले दिसतात. हे त्यात सापडलेल्या चमकदार पदार्थामुळे आहे जे रात्री चमकतात .रात्री मगरी पाण्याखाली दिसतात तेव्हा त्यांचे डोळे लाल ठिपक्या सारखे दिसतात.
  • मगर सुमारे 25 मैल प्रति तास वेगाने पाण्यात पोहू शकतात. त्यांच्या मजबूत शेपटी मुळे ते शक्य होते.

धन्यवाद !!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment