कॉर्न पकोडे मराठी Cron Pakode Recipe In Marathi

कॉर्न पकोडे मराठी Cron Pakode Recipe In Marathi कॉर्न पकोडे हा पदार्थ कणीसचे दाने, बेसन, आणि तांदुळाच्या पिठा पासून बनवले जातात, हा चवीला एकदम स्वादिष्ट आणि कुरकुरीत पदार्थ आहे. पकोडे हा शुध्द शाकाहारी आणि लोकप्रिय पदार्थ आहे, भारतात विविध ठिकाणी कॉर्न पकोडे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. कॉर्न पकोडे हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत. कॉर्न पकोडेचा उपयोग नाष्टा म्हणून केला जातो.

आपण हॉटेल किंवा नाष्टा सेंटर वरती पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चटकदार कॉर्न पकोडे खाण्यासाठी मिळतात. काही लोकांना कॉर्न पकोडे खूप आवडतात, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट कॉर्न पकोडे मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने चवदार कॉर्न पकोडे कशे बनवतात यांची रेसिपी. आता आपण कॉर्न पकोडे रेसिपी पाहणार आहोत.

 Cron Pakode

कॉर्न पकोडे मराठी Cron Pakode Recipe In Marathi

कॉर्न पकोडेचे प्रकार :

कॉर्न पकोडे हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे, विविध ठिकाणी कॉर्न पकोडे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. जसे कॉर्न पकोडे, कॉर्न मसाला पकोडे, कॉर्न वडे, कॉर्न चिप्स, कॉर्न उपमा हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
कॉर्न पकोडे रेसिपी ही आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

कॉर्न पकोडेच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

कॉर्न पकोडे तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते, नंतर आपण लवकर पकोडे बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

कॉर्न पकोडे कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

कॉर्न पकोडे बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

कॉर्न पकोडेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 4 मक्याचे कणीस.
2) 2 चमचे तांदूळ पिठ.
3) 1 वाटी बेसन.
4) 1 चमच हळद.
5) 4 ते 5 हिरवी मिरची.
6) तेल, मीठ.
7) 2 कांदे.
8) 1 चमच लाल मिरची पावडर.
9) थोडे जिरे आणि ओवा.
10) 1 चिमूट सोरा.

पाककृती :

  • गूळ पोळी रेसिपी मराठी
  • सर्वात प्रथम कणीसचे व्यवस्थित दाने काढून घ्या, आणि नंतर एका प्लेटमध्ये ठेवा.
  • नंतर कांदा आणि मिरची बारीक चिरून घ्या, आणि तांदूळ पिठ, आणि बेसन चांगले चाळून घ्या,
  • आता कणीसचे दाने मिक्सर मधून, मध्यम थोडे जाडसर बारीक करून घ्या, आणि एका मिक्सिंग बाऊल मध्ये काढा.
  • नंतर यामध्ये बारीक कापलेली मिरची, कांदा, चवीनुसार थोडे मीठ, मिरची पावडर, हळद, टाकून चांगले मिक्स करा.
  • नंतर यामध्ये थोडे जिरे, ओवा, आणि एक चिमूट सोरा टाकून चांगले मळून घ्या, आणि एक गोळा तयार करा.
  • आवश्यक असल्यास थोडे पाणी घेऊ शकता, मिश्रण घट्ट झाले पाहिजे, तेव्हा आपले पकोडे छान बनतील.
  • आता गॅसवरती एक कढई ठेऊन त्यामध्ये आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा, तेल गरम झाले की.
  • गरम तेलात पकोडे काढा, कढईत बसतील तेवढे पकोडे काढा, आणि चांगले तळून घ्या.
  • पकोडे लालसर आणि कुरकुरीत होये पर्यत चांगले तळून घ्या, आणि नंतर एका पेपर वरती काढून घ्या.
  • म्हणजे पकोडे मधील शिल्लक तेल निघून जाईल, अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे पकोडे तयार करून घ्या.
  • आता आपले स्वादिष्ट आणि चवदार कॉर्न पकोडे खाण्यासाठी तयार आहेत.
  • आपण एका प्लेटमध्ये कॉर्न पकोडे आणि खटाई किंवा शेंगदाणे चटणी घेऊन पकोडे खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

कॉर्न पकोडेमध्ये असणारे घटक :

कॉर्न पकोडे हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक असतात. जसे कॅल्शियम, प्रोटीन पोटॅशियम, व्हिटॅमिन, प्रथिने, चरबी, फॅट, मॅग्निशियॅम, कॅलरी, हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

कॉर्न पकोडे सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम, प्रोटीन, सारखे पौष्टिक घटक मिळतात.

यामुळे आपले हाड, शरीर मजबूत राहते, आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.

यामध्ये असणारे चरबी, फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन यामुळे आपल्याला शरीराची वाढ होते, व शरीरावर फॅटचे प्रमाण वाढते.

कॉर्न पकोडेमध्ये असणारे सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

कॉर्न पकोडे आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

पकोडे हा एक तेलकट पदार्थ आहे, आणि पौष्टिक सुध्दा यामुळे आपल्या मळ-मळ किंवा उलटी होऊ शकते.

म्हणून कॉर्न पकोडे आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला कॉर्न पकोडे रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment