सायकल बोलू लागली तर…मराठी निबंध । Cycle Bolu Lagli Tar Marathi Nibandh

Cycle Bolu Lagli Tar Marathi Nibandh मी सायकल आहे !काही लोक मला दुचाकी या नावाने ओळखत असले तरी सर्वसाधारणपणे सर्वजण मला  सायकलच म्हणतात .

Cycle Bolu Lagli Tar Marathi Nibandh

सायकल बोलू लागली तर…मराठी निबंध । Cycle Bolu Lagli Tar Marathi Nibandh

माझा जन्म कधी झाला हे मला नक्की माहीत नाही पण काही शोधांच्या पुराव्यावरून माझा जन्म 1990 ला फ्रान्स देशातील एम. डी.सिंह वर्क र्यांच्या हस्ते त्यानंतर अठराशे 76 साले मला गती मिळाली साखळीचे दंततबकडी बसवली माझ्या गतीवर झाला नाही मला खरा वेग आला रबरी टायर मुळे .

ज्यावेळी माझा नवीन नवीन शोध लागला त्यावेळी माझा प्रचार आणि प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला या जगात ,असा एकही देश नाही जिथे माझा वापर केला जात नाही .

लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्याचे लाकडी घोडा असेल तरी दुसरे वाहन हे हमखास मीच असतो .मुलं चालायला लागले की थोडेसे मोठे झाले की आई- वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात यामागचे कारण  माहित आहे का ?

एकतर माझी किंमत ही खूप माफक असते, त्यात अपघाताची शक्यता तर अगदी कमी !मुले सुरुवातीला मला चालविण्यासाठी पडतील तरी त्यांना थोडेसे खरचटले थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी सुद्धा होईल .मात्र तुम्ही मला एकदा चालवायला शिकलात की तुमची आणि माझी संगत चांगली होईल .

असे म्हणतात की मोठे वाहन चालविण्यासाठी सुरुवातीलाच सायकल यायलाच हवी .त्यामुळे लहान मुलांना सर्वप्रथम सायकल शिकविले जाते .

एकदा का तुम्ही सायकल शिकला ,ती घरातील लहान लहान कामे करण्यासाठी आणि बाहेरून कुठलीतरी वस्तू आणण्यासाठी तुम्ही माझा उपयोग अतिशय सोयीस्कर रित्या करू शकता .

कधी भाजीपाला, कधी दुकानातून दूध ,कधी आजोबांच्या गोळ्या अशी लहान-मोठी कामे करण्यासाठी माझा उपयोग केला जातो .कार बाईक चालवायचे असेल तर त्या साठी खास चालक परवाना काढावा लागतो .परंतु मला चालविण्यासाठी कुठल्याही चालक परवाना ची मुळीच गरज भासत नाही .

लहान मुला मुलीन पासून ते वयस्कर आजी-आजोबांपर्यंत कोणीही मला सहज रित्या चालू शकतो ,आणि कधी आड रस्त्यात मी पंचर झाले तर मला सहज रित्या हातात धरून आणायला काहीही अवघड नाही .कारण मी सडपातळ आणि वजन खूप हलकी फुलके असते .

इतर वाहनांचा म्हणजे कारवाईचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य आहे खूप लांब जायचं असेल तरी त्याचा वापर जरूर करावा पण शाळेला बाजाराला घरातील काही लहान गोष्टी आणण्यासाठी एवढा वेगाचे आणि कार बाईक ची काय गरज ?

अशा वेळी तुम्ही सहज रित्या माझा वापर करणे फायद्याचे ठरू शकते .माझा वापर हा तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक आहे .मी वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या तुम्हाला लाभदायी ठरते .

कसे ते सांगते हे पहा ,तुम्ही नियमितपणे मला चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही .दररोज सकाळी मला चालवल्याने तुमची अधिक कार्यक्षमता वाढेल तसेच तुम्ही तंदुरुस्त राहा प्रतिकारक्षमता वाढते आणि तुमच्या पायांचे आयु  बळकट होतात.हा झाला आरोग्याचा फायदा .

याशिवाय माझे बरेच फायदे आहेत ते म्हणजे माझी किंमत ही फार कमी असते त्यामुळे तुमचे पैसे वाचतात शिवाय गरीब लोकांना सुद्धा ही सहज रित्या उपलब्ध होऊ शकते .कधी पडलात माझ्यातील काही भाग खराब झाले तर तेच दुरुस्त करण्यासाठी जास्त खर्च लागणार नाही, कमी पैशांमध्ये तुम्ही मला पुन्हा दुरुस्त करू शकता .

तसेच मला चालविण्यासाठी महागड्या  पेट्रोल-डिझेलची गरज भासणार नाही त्यातही तुमचे पैसे वाचतात .यामुळे इंधन बचत होते वैयक्तिक दृष्ट्या मी तुमच्यासाठी लाभदायी आहे ,त्यासोबत समाजासाठी आणि देशासाठी सुद्धा आणि एक प्रकारे सहकार्य करते .

आपल्या देशात पेट्रोल डिझेल ,रॉकेल ,परदेशातून विकत घ्यावे लागते .याशिवाय त्यांचे भाव गगनाला भिडले आहे पेट्रोल-डिझेल सहजरीत्या खरेदी करणे शक्य नाही .

एवढेच नसून आज आधुनिक जग जसे बदलत चालले आहे त्याच प्रमाणे आधुनिक जगात मी देखील बरीच आधुनिक झाले मी मूळची बिन घेरची पण आता गिअर  पण आले शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी केली.आणि पर्यटकांसाठी वेगळी .

तुमची जशी आवड तशी माझी निवड.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment