डाळ बाटी रेसिपी मराठी daal bati Recipe in Marathi दाळ बाटी ही रेसिपी सर्वांच्या आवडीची आहे. आजकाल रेस्टॉरंटमध्ये किंवा स्टॉलवर देखील डाळ बाटी उपलब्ध असते. बाटी ही दोन प्रकारची बनवली जातात. एक म्हणजे तळलेली व दुसरी म्हणजे भाजलेली. तर आज आपण तळलेली बाटी रेसिपी विषयी माहिती पाहूया. ही बाटी खायला अगदी कुरकुरीत व चवदार लागते. डाळ भाटी खाण्याची मजाच वेगळी आहे. परंतु बऱ्याच गृहिणींना बाटी करण्याची रेसिपी माहित नसते त्यामुळे त्या घरी स्वतः करू शकत नाहीत. परंतु आता काळजी करण्याची चिंता नाही आम्ही तुमच्याकरिता खास दाळबाटी ही रेसिपी घेऊन आलो आहोत.
तर मग चला जाणून घेऊया डाळबाटी रेसिपीसाठी लागणारे साहित्य व पाककृती.
डाळ बाटी रेसिपी मराठी daal bati Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
दाळ बाटी ही रेसिपी गहू, रवा किंवा मक्याचे पीठ यांच्या मिश्रणापासून बनवली जाते. हे भारतीय शाकाहारी भोजन आहे. हे दोन प्रकारे बनवले जाते, एक म्हणजे भाजून बनवलेली बाटी आणि दुसरी म्हणजे तळलेली बाटी. डाळ बाटी ही रेसिपी राजस्थान गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ती महाराष्ट्रातही खूप प्रसिद्ध आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा घरच्या एखाद्या कार्यक्रमांमध्ये देखील डाळ बाटी रेसिपी आपण ठेवू शकतो. डाळ बाटी खायला अतिशय अप्रतिम चविष्ट व कुरकुरीत लागते. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी माहिती.
ही रेसिपी किती जणांकरता बनणार आहे ?
ही रेसिपी आपण 5 व्यक्तींकरता बनवणार आहोत.
पूर्वतयारीकरिता लागणारा वेळ :
डाळ बाटी पूर्वतयारी करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
बाटी साठी लागणारे साहित्य :
1) एक वाटी गव्हाचे पीठ
2) दोन वाट्या रवा
3) एक चमचा ओवा
4) मीठ चवीनुसार
5) पाव चमचा हळद
6) तेल
7) गरम पाणी
8) अर्धा चमचा बेकिंग पावडर
डाळीचे साहित्य :
1) एक वाटी तुरीची डाळ
2) अर्धा चमचा हळद
3) एक चमचा तेल
4) पाणी
5) एक चमचा तूप
6) एक चमचा जिरे
7) पाव चमचा मोहरी
8) कोथिंबीर
9) कांदा
10) टोमॅटो
11) हिरव्या मिरच्या
12) लसूण
13) चिमूटभर हिंग
14) चवीनुसार मीठ
बाटी करण्याची पाककृती :
- उकडीचे मोदक रेसिपी मराठी
- एका परातीत रवा आणि गव्हाचे पीठ वरील दिलेल्या प्रमाणानुसार एकत्रित करा. त्यामध्ये ओवा, हळद, मीठ, तेल, बेकिंग पावडर टाकून कोरडेच मिक्स करून घ्या.
- नंतर दोन कप गरम पाणी घालून पीठ मळून घ्या. पिठाचा गोळा केल्यानंतर दहा मिनिटे बाजूला ठेवून द्या.
- पिठाचे चार भाग करा आणि लांब आकार देऊन.
एका मोठ्या गंजात पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये ह्या बाटी सोडून द्या आणि दहा मिनिटे उकडून घ्या. - दहा मिनिटानंतर पाण्याच्या बाहेर काढून बाजूला ठेवा. हे पाणी फेकून देऊ नये कारण त्यामध्ये बाटीची चव उतरते. ते तुर डाळीमध्ये टाकण्यास उपयोगी येईल.
- उरलेल्या पाण्यात एक वाटी तुरीची डाळ शिजवून घ्या. त्यामध्ये शिजताना एक चमचा तूप मीठ आणि हळद घाला.
- मातीतील मीठ पाण्यामध्ये उतरलेले आहे त्यामुळे मिठाचे प्रमाण आपल्याच अंदाजानुसार घालावे.
- फोडणीसाठी एका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करा त्यामध्ये मोहरी व जिरे घाला.
- मोहरी व जिरे चांगले तडतडले की, त्यामध्ये कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या ठेचलेला लसूण चिमूटभर हिंग व कोथिंबीर घाला. एक उकळी आल्यानंतर दाढ खाली उतरून ठेवा.
- नंतर कढाई मध्ये बाट्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा थंड झालेल्या बाटीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.
- तेल चांगले गरम झाले की, त्यामध्ये सर्व बाट्या तपकिरी रंग होईपर्यंत तळून घ्या तळल्यानंतर त्या हलक्या व कुरकुरीत होतील. अशाप्रकारे डाळबाटी रेसिपी तयार आहे तुम्हीही घरच्या घरी ही रेसिपी बनवू शकता व हलक्या व कुरकुरीत डाळबाटीचा आनंद घेऊ शकता.
पोषक तत्व :
डाळ बाटी एक पोषक असे अन्न आहे. ज्यामुळे आपले कार्यक्षमता ऊर्जा वाढते. त्यामध्ये मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, तांब, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने यांसारखे घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात खूपच आवश्यक आहेत. डाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचन सुधारण्यासाठी देखील डाळीचा उपयोग होतो.
फायदे :
डाळ बाटी जेवण केल्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते त्यामुळे अगदी दैनंदिन कामांमध्ये आपल्याला उत्साह वाटतो.
डाळीमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि झिंक आढळतात, त्यामुळे संसर्ग रोगापासून देखील आपले संरक्षण होते.
डाळ बाटीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे गुणधर्म आहेत एक वाटी तूरडाळ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
हृदयाच्या आरोग्यासाठी दुर्जनाची सेवन करणे नक्कीच फायदेशीर असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, तसेच शरीराचा रक्तदाब योग्य राहतो व हृदयविकाराशी संबंधित समस्यांचा धोका देखील कमी होतो.
तोटे :
डाळ बाटी खाणे आरोग्यासाठी चांगलेच आहे; परंतु बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो. त्यामुळे डाळ खाल्ल्यामुळे आणखीन पित्त वाढण्याची शक्यता.
जास्त प्रमाणात डाळ बाटी खाल्ल्यामुळे पोट फुगणे किंवा मग पोटदुखीचा त्रास आपल्याला जाणवू शकतो. त्यामुळे प्रमाणातच सेवन करावे.
तळलेल्या बाटीमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल असणाऱ्या रुग्णांसाठी देखील ते हानिकारक आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला डाळ बाटी ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा तसेच ही रेसिपी घरी तयार करून बघायला विसरू नका.