डाळ ढोकळी रेसिपी मराठी daal dhokali Recipe in Marathi

डाळ ढोकळी रेसिपी मराठी daal dhokali Recipe in Marathi डाळ ढोकळी हा पदार्थ सर्वांचेच ओळखीचा असेल कारण ही डिश गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. जी पारंपारिकरित्या आजही तेथे बनवून खाल्ली जाते. केवळ गुजरात मध्येच नाही तर महाराष्ट्रातही डाळ ढोकळी ही रेसिपी बनवली जाते. डाळ-ढोकळी ही भारतीय तसेच शाकाहारी पदार्थ आहे. जी डाळीच्या आमटीमध्ये कणिकच्या चकत्या पाडून तयार केली जाते. डाळ ढोकळी कशासोबतच खाल्ली जात नाही. ती केवळ एक स्पेशल डिश आहे. डाळ ढोकळी ही रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. त्यासाठी फार मोठे अशा साहित्याची देखील गरज नाही. तर चला बघ जाणून घेऊया रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

daal dhokali

डाळ ढोकळी रेसिपी मराठी daal dhokali Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

डाळ ढोकळी हे गुजरात मधील एक प्रसिद्ध रेसिपी आहे. डाळ-ढोकळी बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. डाळ शिजवल्यानंतर त्याची आमटी तयार केली जाते व त्यामध्ये गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या शंकरपाळ्याच्या आकाराच्या ढोकळ्या टाकल्या जातात. सुरुवातीला या ढोकळ्यांचा आकार गोल असायचा परंतु आता शंकरपाळ्याच्या आकाराचा किंवा डायमंडच्या आकाराचा हा आकार असतो. ही रेसिपी खाण्यासाठी अतिशय चविष्ट व पौष्टिक आहे. तर चला मग जाणून घेऊया ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य व पाककृती.

ही रेसिपी किती व्यक्ती करता आहे ?
डाळ ढोकळी ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरता करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

डाळ ढोकळी रेसिपीच्या पूर्वतयारी करता आपल्याला किमान 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

डाळ ढोकळी या रेसिपीच्या कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

ही रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 40 मिनिटे एवढे लागतो.

डाळ ढोकळीसाठी लागणारे साहित्य :

1) एक वाटी गव्हाचे पीठ
2) पाव चमचा हळद
3) एक चिमूट हिंग
4) चवीनुसार मीठ

डाळीसाठी लागणारे साहित्य :

1) एक वाटी तूर डाळ
2) दोन बारीक चिरलेले टोमॅटो
3) दोन ते तीन हिरव्या मिरच्या
4) सुटलेल्या कश्मीरी लाल मिरच्या तीन
5) दोन मोठे चमचे चिंचा
6) एक मोठा चमचा गूळ
7) पाव चमचा मोहरी
8) अर्धा चमचा जिरे
9) पाव चमचा हळद
10) सात-आठ कढीपत्त्याची पाने
11) एक चमचा काश्मिरी लाल तिखट
12) दोन मोठे चमचे तेल
13) चवीनुसार मीठ
14) पाव वाटी शेंगदाणे
15) बारीक चिरलेली कोथिंबीर

डाळ ढोकळी बनवण्याची पाककृती :

  • सर्वप्रथम आपल्याला ढोकळी बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे. ही कणीक भिजवत असताना पाणी कमी वापरून याला दहा मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे आहे.
  • नंतर चिंचेला पंधरा मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. म्हणजे त्यातील रस तयार होईल नंतर रस एका गाळणीने गाळून घ्या.
  • डाळ बनवण्यासाठी तुरीच्या डाळीला दोन तास भिजवून ठेवा आणि दोन तासानंतर डाळीला पाण्यातून काढून घ्या.
  • नंतर एक प्रेशर कुकर घ्या त्यामध्ये डाळ हिरवी मिरची एक बारीक चिरलेली टोमॅटो मी ठरत आणि दीड कप पाणी घालून चार शिट्ट्या होऊ द्या.
  • थोड्या वेळानंतर कुकर थंड झाले की, डाळीला एक सारखे बारीक करण्यासाठी व्यवस्थित घोटून घ्या.
  • डाळीला कुकरमध्ये पुन्हा मोठे आचेवर ठेवा. यामध्ये चिरलेले टोमॅटो, चिंचेचा कोळ, गुळ शेंगदाणे दोन कप पाणी आणि मीठ घाला.
  • पुन्हा याला उकळी येऊ द्या. नंतर मंद आचेवर दोन मिनिट शिजवून घ्या.
  • तोपर्यंत ढोकळीच्या कणकेच्या पातळ पोळ्या लाटून त्यांना शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कापून घ्या.
  • या कापांना उकळत्या डाळीमध्ये घाला. नंतर मंद आचेवर सहा ते सात मिनिटे शिजू द्या.
  • नंतर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी जिरे, हिंग कढीपत्ता सुक्या कश्मीरी मिरच्या आणि कश्मीरी लाल तिखट पावडर घाला.
  • हे चांगले मिश्रण परतून झाले की लगेच ही फोडणी त्या डाळीवर घाला. आणि त्वरित कुकरचे झाकण बंद करा, त्यामुळे फोडणीचा सुगंध पूर्ण डाळीमध्ये पसरेल. नंतर कोथिंबीर घालून गरमागरम डाळ ढोकळी सर्व्ह करा.

पोषक घटक :

डाळ ढोकळी हे आपल्या शरीरासाठी पोषक पदार्थ आहे. त्यामधून आपल्या शरीराला प्रथिने, फॉलिक ऍसिड, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक तांब, सेलेनियम, मॅग्नीज इत्यादी घटक मिळतात.

फायदे :

तुरीच्या डाळीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे. त्यामुळे आपले शरीर चांगले राहते, रोगप्रतिकारक्षमता वाढते वजन, नियंत्रणात राहते.

तुरीच्या डाळीमध्ये पोषक घटकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे उष्मांकाचे प्रमाणही कमी असते. या डाळीमध्ये कोलेस्ट्रॉल, सोडियम आणि सॅच्युरेटेडचे प्रमाण देखील कमी असते.

डाळ-ढोकळी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते व आपल्या शरीराला आवश्यक घटकही मिळतात त्याने ऊर्जा मिळते, व्यक्ती दिवसभर उत्साही राहतो.

डाळ ढोकळी ही रेसिपी हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगली आहे. त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण असल्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहण्यास मदत होते.

तोटे :

डाळ ढोकळी खाण्यापासून कोणतेही तोटे नाहीत परंतु तूरडाळ ही पित्तकारक आहे. त्याच्या अतिसेवनाने पित्त होऊ शकते.

ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे, अशा लोकांनी तूर डाळीचे सेवन करू नये.

तर मित्रांनो, तुम्हाला डाळ ढोकळी या रेसिपी विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment