दाबेली रोल ची रेसिपी | dabeli roll recipe in marathi

दाबेली रोल ची रेसिपी | dabeli roll recipe in marathi

नमस्कार खवय्ये बंधुनो आणि भगिनींनो आज आपण एक स्नॅक्स ची रेसिपी पाहणार आहोत.ही रेसिपी घरातील लहान थोर माणसानं देखील ही दाबेली रोल ची रेसिपी आवडते.

2-3 जणांसाठी आपण ह्या साहित्यात ही रेसिपी बनवू शकतो.

दाबेली रोल ची रेसिपी साहित्य | dabeli roll recipe in marathi ingredients

5-6 उकडलेले बटाटे
7-8 ब्रेड चे स्लाइस
1 चमचा दाबेली मसालाचवीनुसार मीठ
1-2 चमचे चिंचेची चटणी
1-2 चमचे शेव
1 कांदा (बारीक चिरलेला)
1-2 चमचे बटर
1 चमचा तेल
1 चमचा कोथिंबीर
2-3 चमचे डाळिंबाचे दाणे
2 चमचे भाजलेले शेंगदाने

15-20 मि मध्ये आपण ही रेसिपी झटपट बनवू शकतो.

दाबेली रोल ची रेसिपी कृती ( dabeli roll recipe in marathi steps ):

सगळ्यात अगोदर एका तव्यात तेल गरम करून घ्या आणि त्यात दाबेली मसाला घाला आणि छान परतुन घ्या.मसाला कमी आचेवर परतून जेणेकरून तो जळणार नाही.

आता त्यात उकडलेले बटाटे मॅश करून घाला आणि छान मॅश करूण घ्या.1 -2 चमचे पाणी घालावे म्हणजे बटाटे लवकर मॅश होतील आणि मसाला देखील छान मऊ होईल.थोड मीठ घालावे आणि व्यवस्थित मिसळून घ्यावे.

आपले स्टफिंग आत्ता तयार आहे.आता तयार स्टफिंग एका ताटलीत काढून घ्या व व्यवस्थित पसरवून घ्या.त्यावर डाळिंबाचे दाणे,भाजलेले शेंगदाने आणि थोड़ी कोथिंबीर घाला.

पुणेरी भाकरवडी | puneri bhakarwadi recipe in marathi येथे वाचा

आता एक ब्रेड स्लाइस घ्या त्याचे काठ सुरिने कापून घ्या आणि लाटन्याच्या मदतीने ब्रेड लाटून घ्यावे.आता ब्रेड वर चिंचेची चटनी लावून घ्या.

त्यावर तयार स्टफिंग ठेवा आणि ब्रेड ला रोल करून घ्या. कडा व्यवस्थित बंद करून घ्या.अश्याप्रकारे सर्व रोल तयार करुन घ्या.आता तव्यावर बटर घालून घ्या व त्यावर ब्रेड रोल ठेवा आणि दोन्ही बाजुनी छान ब्राउन होइपर्यंत भाजून घ्या.

अश्याप्रकारे सर्व रोल भाजून घ्यावे.तयार दाबेली रोल प्लेट मध्ये काढून घ्या व त्यावर कोथिंबीर,चिरलेला कांदा, शेव, डाळिंबाचे दाणे घाला.दाबेली रोल तयार आहे. आत्ता तयार रोल टोमॅटो sauce सोबत सर्व्ह करा.

Leave a Comment