Dahi Handi Festival Information In Marathi दहीहंडी हा भारतातील एक मनोरंजक आणि स्पर्धात्मक असा सण आहे. जो श्रीकृष्णाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो तसेच हा सण हिंदु सणाशी संबंधित आहे.दहीहंडी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. महाराष्ट्र व्यतिरिक्त हा सण गुजरात या राज्यात सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दहीहंडी हा सण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या काळापासून खूप प्रसिद्ध झालेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमीची सुट्टी सुद्धा मिळते.
दहीहंडी सणाची संपूर्ण माहिती Dahi Handi Festival Information In Marathi
दहीहंडी हा उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यामध्ये अनेक तरुण दहीहंडीसाठी संघ तयार करून त्यामध्ये सहभागी होतात तसेच या उत्सवा दरम्यान एका उंचीवर दही आणि भरलेली हंडी फोडण्यासाठी तरुणांचे संघ स्पर्धा करत असतात.
हा एक स्वरूपाचा खेळत आहे यामध्ये अनेक बक्षीस असे सुद्धा देण्यात येतात. दहीहंडी हा सण ऑगस्ट ते सप्टेंबर च्या मध्यामध्ये येत असतो तसेच हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या व्यतिरिक्त इतर राज्यामध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो.
दहीहंडी हा सण कसा साजरा करतात?
दहीहंडी हा सण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहाने व अन्य थाटामाटात साजरा केला जातो तसेच भारतातील अनेक धार्मिक स्थळे सजवली जातात तसेच देशाच्या अनेक भागांमध्ये अनेक संस्था हा सण उत्सव सुद्धा साजरा करत असतो. हा एक हिंदूंचा सण आहे, महाराष्ट्रामध्ये या दहीहंडीचे सौंदर्य विशेषता आपल्याला पाहायला मिळते. हा खेळ शहरात तसेच ग्रामीण भागांमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
या उत्सवांमध्ये अनेक गोविंदा सहभागी होतात. दहीहंडी फोडणाऱ्याला गोविंदा असे म्हटले जाते त्यालाच गोविंदा आला रे गोविंदा आला असा डान्स सुद्धा करतात जो भगवान श्रीकृष्णाच्या आगमनाची संकेत देतात. हा सण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो या उत्सवाला संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी मिळते. भगवान श्रीकृष्ण यांना लहानपणी दही, दूध, माखन खाण्यासाठी मातीचे लटकवलेले मडके फोडून त्यामधील दही, दूध आणि माखन खाऊन टाकत असे.
जर मडके जास्तीत वर टाकले असेल तर श्रीकृष्ण आपल्या मित्रांना घेऊन त्या मडक्याला फोडून त्यामधील दही, दूध, ताक सर्वांमध्ये वाटून खात होते. त्याच गोष्टीची आठवण ठेवत आज देशांमध्ये सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने व उत्साहाने साजरा केला जातो. दहीहंडीचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील पुणे मुंबई आणि विविध ठिकाणी साजरा केल्या जातो.
दहीहंडीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सुरुवातीला एक मातीचे मडके घेतात आणि त्यामध्ये दही, दूध, ताक आणि काही फळांना कापून टाकले जाते. त्या मडक्याला एखाद्या उंच ठिकाणी दोरीवर मधोमध टाकले जाते. नंतर बाळगोपाळ आपल्या मंडळासह एक एक करून येतात व या मडक्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मडके फोडण्याचा प्रयत्न करतात, मडक्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक गट त्यांच्या थरांचा उपयोग करतो. या दरम्यान गोविंदा आला रे आला..! असे सुद्धा म्हणतात.
या उत्साहात ज्या गोपाळाने त्या मडक्याला फोडले, त्याला डोक्यावर घेऊन त्यांचा आनंद सुद्धा व्यक्त करतात व त्या पूर्ण टीमला एक बक्षीस सुद्धा देण्यात येते. अशाप्रकारे दहीहंडीचा हा उत्सव साजरा केला जातो.
दहीहंडी या सणाविषयीच्या अख्यायीका :
दहीहंडी हा उत्सव साजरा करण्यामागे एक आख्यायिका आहे. श्रीकृष्ण हे आपल्या लहानपणी मित्रांसोबत गोकुळांमध्ये घराघरातून लोणी आणि दही चोरून मित्रांसोबत खायचे म्हणून त्यांना माखन चोर असे सुद्धा म्हटले जात होते. गोकुळा मधील लोक त्यांची भांडी ही उंच ठिकाणी लटकवून ठेवत असत म्हणजेच एखाद्या मातीच्या मडक्यामध्ये ताक किंवा लोणी दूध उंच जागी टांगून ठेवायचे.
ज्यामुळे लहान मुलांचा तिथपर्यंत हात पोहोचणार नाही परंतु श्रीकृष्ण हे त्यांच्या सवंगड्या सोबत जाऊन मित्रांच्या सहाय्याने त्या मडक्यापर्यंत पोहोचून मडके फोडून त्यातील दही, दूध, ताक व लोणी खायचे आणि आपल्या मित्रांना सुद्धा द्यायचे त्यांची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. या सणानिमित्त सगळीकडे आनंदी आनंद व बालगोपालांची क्रीडा पाहायला आपल्याला वेगळीच मजा वाटते.
दहीहंडी या सणाचे महत्त्व :
दहीहंडी हा एक सांस्कृतिक आणि धार्मिक सण असून त्याचे महत्त्व सुद्धा तेवढेच आहे. हा सण भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीलांची आपल्याला आठवण करून देते. श्रीकृष्ण त्यांच्या लहानपणी लोणी, दही, दूध व ताक खाण्यासाठी लोकांच्या घरात मित्रांच्या सहाय्याने मडकी फोडत असत किंवा दह्याने भरलेले मडके फोडण्यासाठी आपल्या सवंगड्यांची मदत घेत असत. या उत्सवातून सहकार्य याला प्रोत्साहन मिळते.
त्यांच्या सवंगड्याच्या पाठीवर उभे राहून एक जणूकाही पिरॅमिड तयार करून मडके फोडण्यासाठी श्रीकृष्ण वर चढायचे आणि त्यातील दही दूध खायचे आणि आपल्या मित्रांना सुद्धा द्यायचे म्हणजेच या सणातून आपल्याला एक शिकवण मिळते की, नेहमी कार्य संघ सदस्यांना सोबत घेणे तसेच एकमेकांवर विश्वास ठेवून काम करणे. जात, पंत किंवा धर्माची परवा न करता उत्सव साजरा करणे आणि लोकांना एकत्र करणे.
दहीहंडी या उत्सवाची संबंधित काही अडचणी:
दहीहंडीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करताना एखाद्या टोळीचे सदस्य वारंवार जखमी होतात. डॉक्टरांचे त्यावर असे म्हणणे आहे की, या सरावांमध्ये गुंतल्यावर लोकांना प्राण घातक जखमा सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे 2012 मध्ये 225 गोविंदांना दुखापत झाली होती. परिणामी महाराष्ट्र सरकारने अनेक अनोखे नियम या उत्सवाविषयी तयार केलेले आहेत. त्यापैकी खालील प्रमाणे काही नियम आहेत. महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये सांगितले होते की, बारा वर्षाखालील मुलांना दहीहंडी कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीत सहभागी होणाऱ्या किमान 18 वर्षे वयाची अट घालून किमान वयाची 18 वर आणलेली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये निर्णय दिला की, 14 वर्षाखालील अल्पवयीन मुलांना दहीहंडीमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही.
14 वर्षाखालील मुलांना बालकामगार कायद्यांतर्गत दहीहंडी स्पर्धेत सुद्धा भाग घेण्याची परवानगी देण्यात येत नाही अशी माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. दहीहंडीसाठी उभारण्यात येणाऱ्या ह्यूमन पेरॅमिडच्या उंचीवर मात्र न्यायालयाने निर्बंध घातलेले नाहीत.
FAQ
दहीहंडी फोडणाऱ्या मुलांना काय म्हणतात?
दहीहंडी फोडणाऱ्या मुलांना गोविंदा असे म्हटले जाते.
दहीहंडी फोडण्यासाठी मुले काय करतात?
दहीहंडी फोडण्यासाठी मुले एक प्रकारचे थर रचून दहीहंडीपर्यंत पोहोचविले जाते. या मध्ये एक गट तयार केला जातो. ज्याला गोविंदा पथक असे सुद्धा म्हणतात. एकामागून एक गोविंदांचा समूह हा थर रचून दूध दह्याने भरलेली मडकी फोडण्याचा प्रयत्न करतो.
दहीहंडी या उत्सवाविषयी कोणते नियम तयार करण्यात आले आहे?
महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये सांगितले होते की, बारा वर्षाखालील मुलांना दहीहंडी कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीत सहभागी होणाऱ्या किमान 18 वर्षे वयाची अट घालून किमान वयाची 18 वर आणलेली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये निर्णय दिला की 14 वर्षाखालील अल्पवयीन मुलांना दहीहंडी मध्ये भाग घेण्याची परवानगी नाही. 14 वर्षाखालील मुलांना बालकामगार कायद्यांतर्गत दहीहंडी स्पर्धेत सुद्धा भाग घेण्याची परवानगी देण्यात येत नाही.
दहीहंडी या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदाचे वय किती वर्ष असावे?
18 वर्ष.
दहीहंडी उत्सव केव्हा साजरा केला जातो?
दहीहंडी हा उत्सव कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.