डाळ गंडोरी रेसिपी मराठी dal Gandori Recipe in Marathi

डाळ गंडोरी रेसिपी मराठी dal Gandori Recipe in Marathi डाळ गंडोरी ही रेसिपी सर्वांच्याच आवडीची आहे. हे एक शाकाहारी व पौष्टिक भाजी आहे. दुपारच्या जेवणामध्ये डाळ मिरची भाजी, मिरचीची भाजी किंवा मग आंबटचुका भाजी अत्यंत पोषक आहेत. आजकाल रेस्टॉरंट मध्ये देखील अशा जेवणाची उत्तम सोय असते. मिरचीची भाजी व भाकरी बरेच लोक आवर्जून खाण्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंट होत जातात. परंतु तिथे अस्वच्छता किंवा तेथील महागडे रेट पाहून आपण आपल्या घरी स्वतः स्वच्छता राखून मिरचीची भजी, मिरचीची भाजी, डाळ गंडोरी, मिरचीचा ठेचा इत्यादी पदार्थ बनवू शकतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारी साहित्य व पाककृती.

dal Gandori

डाळ गंडोरी रेसिपी मराठी dal Gandori Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

मिरचीची भाजी ही बेसन घालून व दुसरी म्हणजे डाळ घालून रस्सा मिरची भाजी अशा दोन प्रकारे केली जाते. आपण येथे डाळ गंडोरी या रेसिपी विषयी माहिती पाहणार आहोत. या रेसिपीमध्ये आंबट चुका, हिरव्या मिरच्या तूर डाळ इत्यादी घालून ही मिरचीची भाजी केली जाते. मिरचीची भाजी वेगवेगळ्या भागांमध्ये विभिन्न प्रकार केली जाते. भाजीची त्या भागानुसार बदलते परंतु खास महाराष्ट्रीयन मिरचीची भाजी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागते तसेच खानदेशी मिरचीची भाजी इत्यादी रेसिपीज आहेत. आज आपण डाळ गंडोरी रेसिपी कशी तयार करायची याविषयी माहिती बघणार आहोत. तर चला मग जाणून घेऊया रेसिपी विषयी सविस्तर माहिती.

ही रेसिपी किती व्यक्तींकरिता आहे?
ही रेसिपी आपण 6 व्यक्तींकरता तयार करणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

हिरव्या मिरचीची भाजीच्या पूर्वतयारी करता आपल्याला 10 मिनिट एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

या रेसिपीच्या कुकिंग करण्याकरिता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

हिरवी मिरची रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण 30 मिनिटे एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) 1 वाटी तुरीची डाळ
2) 100 ग्राम पालक भाजी
3) 100 ग्राम आंबट चुका भाजी
4) 10-12 हिरव्या मिरच्या
5) 2 हिरवी वांगी
6) 1 टोमॅटो
7) 1 टेबलस्पून अद्रक लसुण पेस्ट
8) 1-1 टीस्पून जीरे मोहरी
9) 1 टीस्पून हिंग
10) पाव वाटी शेंगदाणे
11) पाव वाटी खोबऱ्याचे काप
12) 1 टीस्पून हळद
13) मीठ
14) 3 टेबलस्पून तेल
15) खानदेशी मसाला

पाककृती :

  • डाळ गंडोरि करण्याकरिता पालक आणि आंबट चुका भाजी स्वच्छ धुवुन घ्या. नंतर 2 हिरवी वांगी धुवून चिरून घ्या.
  • नंतर तुरीची डाळ देखील स्वच्छ धुऊन घ्या त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घाला आणि सर्व साहित्य कुकरमध्ये चार शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घ्या.
  • आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी तडतल्यावर हिंग, अद्रक, लसुण पेस्ट आणि 2 हिरवी मिरची घालून 1 मिनिट छान परतून घ्या.
  • आता त्यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप टाकून मिक्स करून घ्या. आणि 2 मिनिट शिजवून घेतले.
  • आता फोडणीमध्ये कूकर मधली भाजी घालून व्यवस्थित घोळून मिक्स करून घ्या. 3 ते 4 उकळ्या येईपर्यंत ही भाजी शिजू द्या.
  • नंतर गॅस बंद केल्यावर त्यात खान्देशी गरम मसाला घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर कोथिंबीर घालून गरम गरम भाजी सर्व्ह करा.
  • डाळ गंडोरि ही भाजी तुम्ही पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकता ही अत्यंत स्वादिष्ट व पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघावा मला कमेंट मध्ये सांगा.

पोषक घटक :

डाळ गांडोरी भाजी सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, विटामिन सी, लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यामध्ये बीटा कॅरोटीन व क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीनचे प्रमाण जास्त असते.

फायदे :

डाळ गंडोरी ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असण्याव्यतिरिक्त, त्यात कॅलरीज नसतात. हिरव्या पालेभाज्या देखील चयापचयासाठी चांगली मानली जाते.

हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीरातून उष्णता बाहेर पडते. रक्त प्रवाह सुरळीत चालते. रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते.

डाळ गंडोरी ही रेसिपी जेवण केल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते व पौष्टिक असा आहार प्राप्त केल्याचा आनंद मिळतो.

तोटे :

ही भाजी पौष्टिक आहे, परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. किंवा मग ऍसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो. म्हणून ही भाजी खाताना प्रमाणातच खाल्ली पाहिजे.

मुळव्याधचा त्रास असलेल्यांनी ही भाजी खाऊ नये कारण यामुळे आणखीन त्रास वाढतो.

तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment