Deforestation Project Information In Marathi आजच्या युगामध्ये आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मोठ मोठ्या इमारती सुद्धा बांधल्या जात आहेत आणि मोठमोठ्या इमारतींमध्ये मोठे मोठे हॉस्पिटल सुद्धा मोठ्या प्रमाणावर बांधली जात आहेत. अशा आधुनिकीकरणासाठी जागा खूपच कमी पडत आहे, त्यामुळे अनेक लोक जंगल तोड करीत आहेत तसेच जंगलाशी नासधूस करून त्या ठिकाणी औद्योगीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि बरेच लोक शेतीसाठी वापर करत असलेल्या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग बांधत आहेत.
जंगलतोड प्रकल्पची संपूर्ण माहिती Deforestation Project Information In Marathi
पृथ्वीवर 30% टक्के भाग हा जंगलांनी व्यापलेला असून त्या जंगलांमध्ये अनेक प्रकारचे वन्यजीव राहतात तसेच जंगलांच्यामुळेच वन्यजीवांच्या अस्तित्व आपल्याला पृथ्वीवर दिसते जर हे जमले नष्ट झाली तर निसर्गाचा समतोल बिघडून जाईल.
असंख्य झाडी तोडल्यामुळे झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि त्यामुळे अनेक नैसर्गिक समस्या निर्माण होतात. आज आपल्याला नव्हे तर संपूर्ण जगाला अनेक नैसर्गिक आपत्ती आहे. जंगल पाहिले तर वन्यजीवांचे घर आहे म्हणजेच तेथे अनेक प्रजातींचे पशुपक्षी वास्तव्य करतात.
तेथेच त्यांचे अन्न पाणी निवारण बनवतात परंतु मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी या झाडांची तोड करून जंगलांचा मोठ्या प्रमाणावर उध्वस्त करीत आहेत. त्यामुळे वन्यजीवांच्या राहण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो तसेच त्यांना खाण्यासाठी सुद्धा अन्न मिळत नाही. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, जंगल नष्ट झाले तर भयानक वन्यजीव जंगल सोडून बाहेर पडतील आणि त्यापासून मानवाला मोठ्या प्रमाणात हानी होईल हे सर्व धोके जर कमी करायचे असेल तर जंगलतोड थांबवली पाहिजे.
जंगलतोड म्हणजे काय?
जंगलतोड म्हणजे जंगलातील झाडे मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी तोडत आहे. त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती औद्योगीकरण शेती हॉटेल्स उभारण्यात येत आहेत. म्हणजेच आपल्याला सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी जमिनीची पर्याप्त जागा मिळवण्यासाठी वृक्षांची तोडणी करतो त्यालाच जंगलतोड असे म्हटले जाते.
वृक्षतोड ही एक समस्या प्रकल्प :
सध्याच्या काळामध्ये वृक्षतोड ही एक मोठी समस्या बनलेली आहे. कारण माणूस त्याच्या स्वार्थासाठी जंगलांचा नाश करण्याच्या मागे लागलेला आहे. मनुष्याला हे सुद्धा माहित नाही की, निसर्गाचा समतोल केवळ जंगलांमुळेच राखला जातो. त्याच्या दैनंदिन गरजांसाठी लाकडांची गरज असते तसेच मनुष्य झाडांचे मोठ्या प्रमाणात तोडणी करून आपल्या गरजा पूर्ण करतो.
यामुळेच जंगलांचा मोठ्या प्रमाणावर नाश होत आहे आणि जंगलतोडची ही समस्या दूर करण्यासाठी सरकार अनेक प्रकल्प सुरू करतात. त्यामध्ये एक लोकप्रिय प्रकल्प झालेला आहे, तो म्हणजेच झाडे लावा झाडे जगवा.
हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आणि त्यामुळेच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच झाडांचे आपल्या आयुष्यामध्ये काय फायदे आहेत, महत्त्व आहेत हे त्यांना कळू लागले आहे. त्याचबरोबर अनेक लोकांना या प्रकल्पामुळे जंगलाचे महत्त्व सुद्धा समजले आहे. जंगल तोड केल्यामुळे पर्यावरणाला किती हानी पोहोचते. हे या प्रकल्पातून सिद्ध झाले आहे, त्यामुळे मनुष्याने आपली जंगलतोड थांबवली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे.
जंगलतोड प्रकल्पाचे हेतू :
जंगलतोड प्रकल्प हे चांगल्या पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे कारण जंगल तोड झाल्यामुळे जागा वसाहत झाले आहे. अकालीन दुष्काळ, जमिनीची धूप, वाढत्या उन्हाची झळ माणसाला सोसावी लागत आहे. या प्रकल्पाचे काय हेतू आहेत, ते आपण खालील प्रमाणे पाहूया.
हा प्रकल्प सुरू करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जंगलांचा मोठ्या प्रमाणात होणारा नाश थांबवणे. जंगलतोड या प्रकल्पामध्ये आपण जंगलांची मोठ्या प्रमाणावर नाचतोस केली तर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो याचा सविस्तर अभ्यास करणे.
जंगलतोड या प्रकल्पाचा हेतू आपल्या पृथ्वीला संतुलित ठेवण्यासाठी कसे मदत करतात. याचा सविस्तरपणे अभ्यास करून जंगलांचे महत्त्व काय आहे, याबद्दल लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करावी हा आहे .
जंगल याविषयी माहिती घेणे तसेच जंगलांचे मनुष्याच्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे. हे सुद्धा जाणून घेणे चांगल्या पर्यावरणासाठी जंगल कसे महत्त्वाचे आहे. हे मनुष्यांना पटवून देणे खूप गरजेचे आहे.
जंगलांचा उपयोग काय आहे :
पृथ्वीवर जास्तीत जास्त ऑक्सिजन हे केवळ जंगलातील झाडांपासूनच आपल्याला मिळते. हे आपल्याला माहीतच असेल की, ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात झाडे असतात. त्या ठिकाणी ऑक्सिजन सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होते. त्यामुळेच ऑक्सिजनचा पुरवठात आपल्याला चांगल्या प्रमाणात होऊ शकतो.
ज्यामुळे जंगलातील झाडांच्या तोडीमुळे ऑक्सिजनच्या पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. यामुळे मानवाला ऑक्सिजनची गरज असते आणि ही ऑक्सिजनची निर्मिती जर कमी झाली तर मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
झाडांमुळेच हवेतील इतर वाहनांमधून निघणारा कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतलं जातो आणि त्यामुळेच हवेतील प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होते.
त्या ठिकाणी शुद्ध हवा झाडे आपल्याला देतात. जर जंगलांमधील झाडे तोडले गेले तर कार्बन डाय-ऑक्साइडचे शोषण घेण्याची प्रमाण सुद्धा कमी होईल, त्यामुळे हवा प्रदूषित होईल आणि त्यामुळे मनुष्यांना वेगवेगळे रोग जडतील.
जंगलातील झाडांचे लाकूड हे वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जात आहे. ते तर आपल्याला माहीतच आहे. जसे घरे बांधणे कागद तयार करणे इंधन अशा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते.
झाडांच्या जास्तीत जास्त असण्यामुळे पृथ्वीचे तापमान सुद्धा कमी राहते, त्यामुळे जास्त प्रमाणात झाडे असणे गरजेचे आहे. पृथ्वीवर जेवढे जंगले आहेत, त्या भागातील तापमान सुद्धा कमी असते.
झाडांच्या नियमित असल्यामुळे जलचक्र चालण्यास मदत होते. जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे असल्यामुळे जलचक्र सुद्धा चांगले राहते.
जंगल तोडीचे परिणाम :
जंगल तोडीचे परिणाम आजकाल आपल्याला दिसतच आहेत कारण जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे जास्त प्रमाणात होऊन तापते. पृथ्वीची दुख होते तसेच जंगलतोडीमुळे हवेमधील ऑक्सिजन कमी होते. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. हवा प्रदूषित होते. लोकांना यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
जंगलतोड केल्यामुळे वन्यजीवांचा अन्न, पाणी आणि निवारा नष्ट होतो. जंगलातील प्राणी यांना पिण्यासाठी योग्य पाणी तसेच निवाऱ्यासाठी जागा मिळत नाही, त्यामुळे जर हे प्राणी बाहेर पडले तर मानवी वस्तींमध्ये शिरून मानवांना हानी पोहोचू शकते.
जंगल तोडीमुळे झाडांची संख्या खूपच दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे नैसर्गिक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. झाडांच्या तोडीमुळे पृथ्वीवरील तापमान सुद्धा वाढत चाललेले आहे. त्यामुळे आपण झाडे तोडणे थांबवली पाहिजे. हा या प्रकल्पामागील उद्देश आहे. झाडे लावा झाडे जगवा कारण पृथ्वी केवळ वृक्षांमुळेच शोभून दिसते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असेही संतांनी म्हटले आहे.
FAQ
जंगलतोड म्हणजे काय?
जगभरामध्ये जंगलांची होणारी घट तसेच वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोडणी होत आहे. तेथे कृषी क्षेत्र किंवा शहरीकरण तसेच मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटल कारखाने उभारण्यात येत आहे, त्याला जंगलतोड म्हणतात.
जंगल तोडीची कोणती कारणे आहेत?
लाकूड काढणे शेतीचा विस्तार, रस्ते बांधणी, घर बांधणी इत्यादी जंगल तोडीचे कारणे आहेत.
जंगल तोड प्रकल्पाचे नाव सांगा?
झाडे लावा झाडे जगवा.
जंगलातील झाडांपासून आपल्याला काय फायदे होतात?
जंगली मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शुद्ध ऑक्सिजन मिळते तसेच हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषण घेतल्यामुळे हवा शुद्ध राहते. जमिनीची धूप होत नाही, जलचक्र सुरळीत राहते.
जंगल तोड झाल्यामुळे काय होईल?
जंगल तोड झाल्यामुळे वन्य जीवाना राहण्यासाठी निवारा अन्न त्याचा तुटवडा निर्माण होईल.