धिरडे मराठी माहिती Dhirde Recipe In Marathi

धिरडे मराठी माहिती Dhirde Recipe In Marathi  धिरडे हा पदार्थ तांदूळ आणि वेग वेगळ्या डाळी पासून बनवला जातो. हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. जो चवीला स्वादिष्ट आणि चवदार आहे. धिरडे हा एक पारंपरिक पदार्थ आहे. ग्रामीण भागात धिरडेला धिंडे म्हणून सुध्दा ओळखले जाते. धिरडे पौष्टिक आहार आहे. यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. भारतात विविध ठिकाणी धिरडे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात.

धिरडे हा एक लोकप्रिय पदार्थ आहे, आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार धिरडे खाण्यासाठी मिळतात. काही लोकांना धिरडे खूप आवडतात. पण त्याचा परिसरात स्वादिष्ट धिरडे मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे. एकदम सोप्या पद्धतीने चवदार धिरडे कशे बनवतात यांची रेसिपी. आता आपण धिरडे रेसिपी पाहणार आहोत.

धिरडे मराठी माहिती

धिरडे मराठी माहिती Dhirde Recipe In Marathi

धिरडेचे प्रकार :

धिरडे हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, विविध ठिकाणी धिरडे वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. जसे धिरडे, ज्वारीचे धिरडे, गव्हाचे धिरडे, मसाला धिरडे, काकडीचे धिरडे, केळाचे धिरडे हे सर्व प्रकार एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
धिरडे रेसिपी आपण 7 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

धिरडेच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

धिरडे तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर धिरडे बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

धिरडे कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

धिरडे बनवण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर कुकिंग करावे लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.

धिरडेसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) अर्धा किलो तांदूळ.
2) 1 वाटी उडीद डाळ.
3) 1 वाटी तूर डाळ.
4) 1 वाटी मूंग डाळ.
5) 2 वाट्या चना डाळ.
6) 4 चमचे जिरे.
7) 2 चमचे धने.
8) 1 चमच लाल मिरची पावडर.
9) 1 चमच हळद.
10) थोडी कोथिंबीर.
11) तेल, मीठ.

पाककृती :

  • सर्वात प्रथम तांदूळ, डाळ, जिरे आणि धने चांगले नीसून घ्या, आणि थोडा वेग उन्हात वाळू घाला.
  • नंतर तांदूळ, सर्व डाळी, धने आणि जिरे एका भाड्यात पूर्ण मिक्स करा, आणि दळून आणा.
  • आता आपले धिरडे बनवण्यासाठी लागणारे पीठ तयार आहे, पीठ चांगले गाळून घ्या.
  • आता एका खोल भांड्यात 4 वाट्या धिरडे पीठ घ्या, आणि यामध्ये हळद, मिरची पावडर, बारीक कोथिंबीर, आणि चवीनुसार थोडे मीठ घाला.
  • नंतर हे पूर्ण मिक्स करून घ्या, यामध्ये थोडे-थोडे पाणी टाकून, डोस्या सारखे पातळ मिश्रण तयार करून घ्या.
  • मिश्रण पूर्ण एकजीव झाले पाहिजे, नंतर 10 मिनिट हे मिश्रण भाजुला ठेऊन द्या.
  • आता गॅस चालू करून गॅस वरती नॉनस्टिक तवा किंवा पॅन ठेवून गरम करा, तवा गरम झाला की.
  • आता आपले पिठाचे मिश्रण घ्या, त्याला एका चमच्याने मिक्स करून घ्या, नंतर चमच्याने ते गरम तव्यावर टाका.
  • आणि डोसा जसा पसरवतो, तसा गोल पसरून घ्या, गॅस मध्यम आसेवर ठेवा.
  • आता धिरडेच्या भाजून थोडे तेल सोडा, आणि चांगला भाजून घ्या, एका भाजूने चांगला लालसर झाला की.
  • दुसऱ्या बाजूने उलटा, धिरडे चांगले लालसर आणि तपकिरी तयार होतील, नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • अशा प्रकारे आपले सर्व मिश्रणाचे धिरडे तयार करून घ्या.
  • आता आपले स्वादिष्ट आणि चवदार धिरडे खाण्यासाठी तयार आहेत. आपण धिरडे सोबत खटई किंवा नारळ चटणी घेऊन खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

धिरडेमध्ये असणारे घटक :

धिरडे तयार करण्यासाठी आपण वेग-वेगळे कडधान्य आणि डाळ वापरतो, हा एक पौष्टिक आहार आहे. यामध्ये विविध घटक असतात, जसे मॅग्निशियॅम, फॅट, चरबी, व्हिटॅमिन, कॅलरी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहेत.

फायदे :

धिरडे हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये मॅग्निशियॅम, कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक आहे. हे आपले शरीर निरोगी ठेवतात.

यातील चरबी, फॅट, कॅलरी, व्हिटॅमिन हे घटक आपली मास-पेशी आणि शरीराची वाढ करतात.

यातील काही घटक आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवतात, यातील सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

धिरडे हा वेग-वेगळ्या धान्य पासून बनवले जाते, यामुळे हे एक जड अन्न आहे,

धिरडे आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर आपल्या पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत, जे आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपली तब्बेत खराब होऊ शकते.

म्हणून धिरडे आपण योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला धिरडे रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment