दिवाळी सणाची संपूर्ण माहिती Diwali Festival Information In Marathi

Diwali Festival Information In Marathi दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. हा सण दरवर्षी सर्व भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यालाच आपण दीपावली या नावाने सुद्धा ओळखतो. भारतामध्ये तर प्रत्येक क्षण साजरे होतात तसेच त्या सणाविषयीच्या वेगवेगळ्या कथा सुद्धा प्रचलित आहेत. दिवाळी या सणा निमित्त सर्व घरांमध्ये व बाहेर अंगणात दिवे लावले जातात, रोषणाई केली जाते. हा सण अंधारावर मात करणारा म्हणजेच वाईट प्रसंगावर विजय दर्शविण्यासाठी साजरा केला जातो. हा सण शरद ऋतुच्या मध्यभागी अश्विन कार्तिक महिन्यामध्ये येतो.

Diwali  Festival Information In Marathi

दिवाळी सणाची संपूर्ण माहिती Diwali Festival Information In Marathi

अश्विन वैद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध तृतीया हे सहा दिवस दिवाळी साजरी केली जाते. साधारणपणे हा सण ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांमध्ये येत असतो. खेड्यापाड्यांमध्ये तर सणाच्या महिन्याभर अगोदर लोक घराची सजावट बाजारहाट यांसारखे कार्य मोठ्या उत्साहाने करत राहतात. घरामध्ये विविध प्रकारचे पदार्थ सुद्धा केले जातात.

चिवडा, चकली, शंकरपाढे, लाडू, करंजी यांचा पाहुण्यांना सुद्धा दिले जातात. दिवाळी या सणा निमित्त शाळेला सुद्धा पंधरा दिवसांसाठी सुट्टी असते. दिवाळी साजरी करण्यासाठी तसेच मामाच्या घरी जाण्यासाठी आपल्याला ही सुट्टी मिळते असे लहानपणी आपल्याला वाटते परंतु त्यामागे एक वेगळेच कारण आहे. आज आपण दिवाळी या सणाविषयी सविस्तर माहिती पाहूया.

दिवाळी हा सण कसा साजरा केला जातो ?

दिवाळी हा सण सहा दिवस साजरा केला जातो, त्यामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते. भारतामध्ये दिवाळीची सुट्टी ही पंधरा दिवस आपल्याला मिळते आणि या पंधरा दिवसांमध्ये दिवाळी मोठ्या प्रेमाने उत्साहाने साजरे केली जाते. दिवाळी जसजशी जवळ येते तसं प्रत्येक क्षण हा उत्साहाने आनंदाने भरलेला असतो कारण दिवाळीमध्ये आपल्याला नवीन कपडे सुद्धा मिळतात.

दिवाळीच्या काही दिवस आधीच लोक त्यांची घरे, ऑफिस, शाळा, महाविद्यालय तसेच प्रमुख ठिकाणी सुद्धा साफसफाई करायला सुरुवात करतात तसेच दिवाळी हा सण सकारात्मक आणि सौंदर्य वाढवण्याचा सण आहे. साफसफाई केल्यामुळे मन प्रसन्न होते तसेच घराची सजावट सुद्धा मोठ्या उत्साहात केली जाते.

वसुबारस : दिवाळी सणाच्या अगोदर अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी वसु म्हणजे द्रव्य आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी या दिवसाला गोवस्य द्वारशी सुद्धा म्हटले जाते. भारताची संस्कृती ही कृषी प्रधान आहे, त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला दिसून येते. या दिवशी संध्याकाळी गाईची तिच्या वासरासह पूजा केली जाते.

घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या उद्देशाने या दिवशी ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत, त्यांना पुरणपोळी व इतर गोडधोड पदार्थांचा स्वयंपाक खाऊ घालतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू वाहतात, फुले अक्षदा वाहून त्यांना माळ घालतात, निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी सारखे पदार्थ गाईला खाऊ घालतात, दारी रांगोळी सुद्धा काढतात.

धनत्रयोदशी : धनत्रयोदशी हा सण अश्विन कृष्ण त्रयोदशीला साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे सुद्धा एक कथा आहे, जी कथा भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र सोळाव्या वर्षी मरणार होता, त्याने आपल्या पुत्राचे जीवन वाचावे व त्यांनी आपले सर्व सुख भोगावित म्हणून राजा -राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस आहे.

या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही, त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवून त्याला जागी ठेवण्याचे प्रयत्न ठेवते. महालाचे प्रवेशद्वारही असे सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठे दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमारच्या खोलीमध्ये सर्प रूपात प्रवेश करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या दागिन्याच्या प्रकाशाने दिपतात.

या कारणास्तव राजकुमार वाचतो. अशी एक आख्यायिका आहे, त्यामुळे या दिवसाला यम दान सुद्धा केले जाते. संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावून त्याला नमस्कार करतात, यामुळे अपमृत्यू सुद्धा टळतो अशी समज आहे. तसेच या दिवशी धन्वंतरीची सुद्धा पूजा केली जाते.

नरक चतुर्दशी : नरक चतुर्दशी या सणाविषयी सुद्धा एक कथा प्रचलित आहे. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, त्यामुळे जुनी राजवटीतून त्याच्या प्रजेला सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला होता.

त्या वराच्या बलावर त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण करून मोठ्या प्रमाणात छळ केला होता तसेच त्याने देव देवतांना सुद्धा त्रास दिला. त्यामुळे या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, नरक चतुर्दशीच्या पहाटेपासूनच फटाके फोडायला सुरुवात केली जाते. तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो, त्यानंतर घरामध्ये उरलेले फटाके तुळशीच्या लग्न दिवशी सुद्धा फोडली जातात.

लक्ष्मीपूजन : अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही खूप चंचल स्वरूपाची मानली जाते. हिंदु शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर राहावे, यासाठी केले जाते. घरामध्ये धनधान्य पैसा भरभराट राहावा, या उद्देशाने लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोब नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सकाळी सर्वच स्नान करून पाटावर रांगोळी काढतात, तांदूळ ठेवतात, त्यावर वाटी, तबक ठेवतात, त्यामध्ये सोन्याचे दाग दागिने रुपया ठेवून त्याची पूजा करतात.

महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीपूजनाला बत्ताशे लाह्या, नैवेद्य वगैरे दाखवण्याची प्रथा आहे. या दिवशी नवीन कपडे सुद्धा घातले जातात. तसेच कुबेर पूजन करण्याची सुद्धा या दिवशी प्रथा आहे. कारण कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी आहे असे मानले जाते. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्याचा अधिपती कुबेर याला सुद्धा निमंत्रण दिले जाते व त्यांची पूजा केली जाते.

बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा असे म्हटले जाते व हा सण कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. यालाच दिवाळी पाडवा सुद्धा म्हटले जाते. या दिवशी बळीराजाचे रांगोळी चित्र सुद्धा काढली जाते. त्याची पूजा केली जाते. “इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो” असे सुद्धा बरेच लोक म्हणतात. हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो व या दिवसाला विशेष महत्त्व आहे. सकाळी पहाटे उठतात, स्नान करतात तसेच शेतामध्ये कणकेचा दिवा घेऊन जातात. या दिवशी शेणाने सुद्धा बळीराजाचे चित्र काढण्याची प्रथा आहे. घरोघरी संध्याकाळी पत्नी पतीला ओवाळते.

भाऊबीज : भाऊबीज हा सण दिवाळीमध्ये खूप महत्त्वाचा दिवस असतो. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीय साजरा केला जातो, यालाच यमद्वितीया असे सुद्धा म्हणतात. या दिवशी बहीण भावांना कुंकू लावते, पाटावर बसवते व वाढते व बहिणीला भाऊ सुद्धा काही पदार्थ गिफ्ट देतो. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन सुद्धा करतो. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्राला वाढते व नंतर आपल्या भावाला आवडते. हे एक बहिण भावाच्या नात्याचे अतूट नातं जोडणारा सण आहे.

FAQ

दिवाळी हा सण कोणत्या धर्माचा सण आहे?

हिंदू.

दिवाळी सणाचे प्राचीन नाव काय आहे?

यक्ष रात्री दीपमाला.

नाग दिवाळी कधी असते?

नाग दिवाळी हा सण शिवरात्री आणि सिद्धी योगामध्ये असते.

दिवाळी हा सण किती दिवशी साजरा केला जातो?

दिवाली हा सहा दिवस साजरा केला जातो.

दिवाळीच्या दिवशी कशाचे पूजन केले जाते?

श्री लक्ष्मी देवी.

Leave a Comment