Donkey Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण गाढव या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. या लेखात आपण गाढव या प्राण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसे, गाढव कुठे राहतात,त्यांचे प्रकार किती आहेत?
गाढव प्राण्याची संपूर्ण माहिती Donkey Information In Marathi
गाढव हा एक घोड्यांच्या परिवाराशी संबंधित एक प्राणी असून, पाच हजार वर्षांपासून हा जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये एका ओझ्याप्रमाने वावरत असणारा प्राणी आहे.अनेक देशांमध्ये याचा उपयोग दुधासाठी केला जातो. आश्चर्यकारक बाब ही की जगातील सर्वात महाग पनीर हे गाढवाच्या दुधापासून बनवले जाते.
सस्तनी वर्गातील एक विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील एक प्राणी म्हणजे गाढव.आशिया खंडात मंगोलिया आणि तिबेटपासून सिरियापर्यंत, तर आफ्रिका खंडाच्या पूर्व आणि उत्तर भागांत गाढवे आढळून येतात.खुरटी झुडपे आणि विरळ हिरवळ सपाट वालुकामय प्रदेशात गाढवांचा वावर असतो.
आफ्रिकेत आता गाढवांच्या आढळून येणार्या दोन जाती आहेत;
ईक्वस आफ्रिकेनस सोमॅलिकस आणि ईक्वस आफ्रिकेनस आफ्रिकेनसयूरोप व अमेरिकेत आढळणारी पाळीव गाढवे (ईक्वस आफ्रिकेनसअॅसिनस) ह्या जातीची असतात.आफ्रिकेत आढळणारी मूळ रानटी गाढवे ईक्वस आफ्रिकेनस आणि आशियाई रानटी गाढवेईक्वस हेमिओनस या जातीची आहेत.
आशियातील पाळीव गाढवे मूळ रानटी जातीतूनच उत्पन्न झाली असून आशियाई गाढवाच्या पाच उपजाती खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत.
- ईक्वस हेमिओनस हे गाढव मंगोलियात आढळते.
- ईक्वस हेमिओनस ओनेजर ही उपजाती इराण, तुर्कमेनिस्तान आणि भारत या प्रदेशात आढळते.
- ईक्वस हेमिओनस कियांग-ही सर्वांत मोठी आणि देखणी जात असून ती तिबेट आणि सिक्कीम येथे आढळून येते.
- ईक्वस हेमिओनस हेमिप्पस -ही सिरियन गाढवे जवळपास नामशेष झाली आहेत.ईक्वस हेमिओनसह्या प्रकारचे गाढव भारतात कच्छचे रण, लडाख आणि पाकिस्तान येथे आढळतात.
- बराचसा घोड्यासारखा दिसणारा हा प्राणी असून आकारमानाने घोड्यापेक्षा लहान दिसून येतो.
खांद्यापाशी त्याची उंची ०.९-१.५ मी, असून त्याचे कान घोड्याच्या तुलनेत अधिक लांब असतात. पाय आखूड असतात. डोक्यासह गाढवाची लांबी २-२.२ मी, त्याची असून शेपटी ४२-४५ सेंमी लांब असते.शेपटीच्या टोकाला लांब केसांचा झुपका असतो.अंगावर केसांचे दाट आवरण असते. रंग पिवळसर करड्यापासून गडद तांबूस अथवा तपकिरी रंगाच्या दरम्यान आढळून येतो.खांद्याजवळ आणि चारही पायांवर काळे पट्टेही असतात.
बेटांवर रात्रीच्या वेळी गाढवे चरताना आढळतात. प्रसंगी काही गाढवे एकटेही भटकताना दिसतात. गाढवे आपला गुजारा चार्यावर आणि कमी पाण्यावर करत असतात.गाढवांमध्ये वसंत ऋतूत प्रजनन होते. गर्भावधी सुमारे वर्षभराचा असून ,एका वेळी एकच पिलू जन्माला येते.
शिंगरू सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करते व गाढवीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असून केसीन या दुग्धप्रथिनांचे प्रमाण कमी पहावयास मिळते.
गाढवाचा आयु:काल २५-४६ वर्षे इतका असून गाढवे सु. १३,००० वर्षांपूर्वीपासून पाळली जात असावीत असा अंदाज वैज्ञानिकांचा आहे.सु. ३,००० वर्षांपूर्वीपासून ईजिप्तमध्ये ओझी वाहून नेण्यासाठी आणि सवारीसाठी गाढवांचा वापर होत असतो .
काटकपणा आणि सहनशीलता या गुणधर्मांमुळे दुर्गम डोंगराळ प्रदेशात ओझी वाहून नेण्यासाठी गाढवे अतिशय उपयुक्त ठरतात.प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने काम करण्यात गाढवे प्रसिद्ध आहेत.गाढवांसाठी ‘अॅस’ हा इंग्रजी शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो. डाँकी, मोक, जेनेट, बरो असे शब्दही अॅसच्या समानार्थी आहेत.
गाढव (नर) व घोडी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकराला ‘खेचर’ म्हणतात.घोडा व गाढवी यांच्यापासून उत्पन्न झालेल्या संकरजाला ‘हिनी’ असे म्हणटले जाते.ही पोस्ट तुम्हाला गाढवांबद्दल सामान्य माहिती देण्यासाठी पुरेशी असावी अशी आशा आहे.
जगात जो कोणी मूर्खपणाबद्दल बोलतो त्याला गाढव संबोधले जाते असून एक प्रकारे गाढव हा मूर्खपणाचा समानार्थी शब्द बनला आहे. परंतु आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे गाढव मूर्ख नसून बुद्धिमान प्राणी आहेत.
आता जाणून घेऊया गाढवाविषयी रंजक माहिती.
- प्राणी-गाढव
- वैज्ञानिक नाव : Equus asinus
- श्रेणी : सस्तन प्राणी
- जात : आय आफ्रिकनस
- आयुर्मान :25-46 वर्षे
- जमिनीवर लोटांगण घालणे खूप आवडते तुम्हाला नक्कीच माहित असेल.
- गाढवाला पाऊस आवडत नाही.
- गाढव त्या जागेला सुद्धा लक्षात ठेवू शकते जेथे तो या पूर्वी पंचवीस वर्ष राहत होता.एक गाढव हा सोबतच्या गाढवांना सुद्धा लक्षात ठेवू शकतो ज्यांवयासोबत तो पंचवीस वर्षांपूर्वी राहत होता.
- गाढवाची पिल्ले जन्माच्या तीस मिनिटानंतर उठून उभी राहतात.
- अन्य जनावरांच्या तुलनेने गाढवाचे दूध मानवाच्या दुधाशी अधिक समानता दाखवणारे असते.
- जगातील सर्वात महाग पनीर गाढवाच्या दुधापासून बनवले जाते. हे पनीर सर्बिया मध्ये जेसविका येथे बनवले जाते.गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात छोटा गाढव अमेरिका येथील KneeHi हा आहे. जो फक्त 25 इंच उंच होता.
- गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात मोठा गाढव अमेरिका येथील Romulus नावाचा गाढव असून तो 5 फूट 8 इंच उंच होता आणि त्याचं वजन 590 किलो होते.
- अमेरिकन डेमोक्रेटिक पार्टी यांचे निवडणूक चिन्ह देखील गाढव होते ज्याला त्यांनी 1828 मध्ये निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले होते.
- मिस्त्र या देशाची राणी Cleopatra आपली सुंदरता राखून ठेवण्यासाठी गाढवाच्या दुधापासून अंघोळ करत होती अशी आख्यायिका आहे.
- पाळीव गाढव जगभरामध्ये सगळीकडे आढळतात. परंतु ते प्रामुख्याने कोरड्या आणि उष्ण क्षेत्रांमध्ये आढळतात.
- मध्य पूर्व आणि आफ्रिकेच्या वाळवंटी क्षेत्रामध्ये जिवंत राहण्यासाठी शारीरिक रूपाने गाढवाची रचना असते.
- नर गाढवाला Jacks आणि मादी गाढवाला Jennets म्हणतात.
- अति शांत प्रदेशांमध्ये गाढव 60 मैल दूर अंतरावरून सुद्धा दुसऱ्या गाढवाचा आवाज ऐकू शकतो. हे त्याच्या मोठ्या काना मुळे त्याला शक्य होते.
- गाढवाचे मोठे कान त्याच्या शरीराला उष्ण आणि वाळवंटी प्रदेशात थंड ठेवण्यासाठी मदत करतात.
- गाढव सकाळी आणि संध्याकाळी जास्त सक्रिय असतात. आणि ते दिवसातील सर्वात उष्ण वेळ आराम करण्यात घालवतात.
- गाढव एक शाकाहारी प्राणी असून तो झाडे, फळे, फुले इत्यादी आहारावर उदरनिर्वाह करतो.
- गाढव खाण्याला खूप शौकीन असतो.
- घोड्याच्या तुलनेने गाढव आपल्या सुरक्षेशी संबंधित विचार करण्यामध्ये अधिक सक्षम असतात.
- गाढव नेहमी समूहामध्ये राहण्यास पसंद करतो.
- गाढवाच्या मांस ला Poopy म्हणतात.
ही माहिती आपणास आवडली असेल तर नक्की कळवा.
धन्यवाद!!!!!