Dr. Punjabrao Deshmukh Information In Marathi एक उच्चशिक्षित मराठी नेते, आणि सामान्य जनतेच्या सुखासाठी आपली संपूर्ण ह्यात व्यतीत करणारे व्यक्ती म्हणून पंजाबराव देशमुख यांना सर्वत्र ओळखले जाते. त्यांनी विदर्भासाठी फार मोलाचे कार्य केलेले असून, विदर्भात शैक्षणिक, राजकीय, कृषी, शेतकरी या सर्वांच्या विकासाकरिता त्याचबरोबर बहुजन समाजाच्या हिताकरिता त्यांनी फार मोठे कार्य केलेले आहे. त्यांना भारतीय कृषी क्रांतीचे अग्रदूत म्हणून देखील ओळखले जाते. त्यांचे नाव एक उत्कृष्ट नेता म्हणून भारताचा इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांमध्ये कोरले गेलेले असून, अशा या पंजाबराव देशमुख यांच्या जीवनचरित्राबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत…
डॉ. पंजाबराव देशमुख यांची संपूर्ण माहिती Dr. Punjabrao Deshmukh Information In Marathi
नाव | पंजाबराव देशमुख |
जन्म दिनांक | २७ डिसेंबर १८९८ |
जन्मस्थळ | पापळ, अमरावती, महाराष्ट्र |
आई वडील | राधाबाई देशमुख आणि शामराव देशमुख |
पत्नी | विमलाबाई देशमुख |
ओळख | शेतकरी नेते, अस्पृश्य आणि दुर्बल घटकांसाठी कार्य करणारे व्यक्ती |
शैक्षणिक उपलब्धी | एडींबरो विद्यापीठातून एम ए, आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टर ऑफ लिटरेचर |
मृत्यु दिनांक | १० एप्रिल १९६५ |
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या बद्दल कुटुंबिक माहिती:
दिनांक २७ डिसेंबर १८९८ या दिवशी अमरावती मधील एका शेतकरी कुटुंबात पापळ या गावी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या तिसरी पर्यंतचे शिक्षण जन्मगावी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता शेजारीलच चांदूर या ठिकाणी प्रवेश मिळवला.
पुढे माध्यमिक शिक्षणाकरिता त्यांनी कारंजा लाड येथे प्रवेश घेत चांगल्या गुणांनी पास होत गेले. त्यांनी पुढील परीक्षा हिंदू हायस्कूल अमरावती या ठिकाणाहून पूर्ण करत, फर्ग्युसन महाविद्यालयांमध्ये देखील प्रवेश घेतला. लहानपणापासूनच शिक्षणामध्ये प्रचंड हुशार असणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण घेण्याकरिता इंग्लंड मध्ये केले.
तिथे १९२० या वर्षी त्यांनी प्रवेश घेत ऑक्सफर्ड विद्यापीठामधून पीएचडी ही पदवी प्राप्त केली. त्यामुळे त्यांना डॉक्टर म्हटले जाऊ लागले. त्यांनी गरिबांच्या न्याय व हक्कासाठी लढण्याकरता बॅरिस्टर पदवी मिळवली होती.
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे ऐतिहासिक कार्य:
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील आणि पंजाबराव देशमुख हे दोघेही समकालीन होते. या दोघांमधील सारखेपणा म्हणजे दोघेही शिक्षणाच्या बाबतीत फारच तज्ञ व्यक्ती होते. पूर्वी वर्ण आधारित शिक्षण व्यवस्था होती. जी मोडीत काढून त्यांनी आधुनिक शिक्षण देण्याकरिता फार मोलाचे कार्य केले होते. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पायावर पाऊल ठेवत शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणली होती.
भारतीय मंत्री मंडळामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना शिक्षण तज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था या महाकाय संस्थेची स्थापना १९३१ मध्ये अमरावती या ठिकाणावरून केली होती. सुरुवातीला अतिशय लहान स्वरूपाचे असणारे हे महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्था आता फार मोठी झालेली असून, तिच्या संपूर्ण भारतभर १५४ पेक्षा देखील अधिक शाखा आहेत.
उच्च शिक्षण तसेच अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याकरिता ही शैक्षणिक संस्था ओळखली जाते. या संस्थे अंतर्गत अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रकारचे विद्यालय, विविध कौशल्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, व्यायाम शाळा आणि मुलांना राहण्याकरिता च्या वस्तीगृहाची देखील निर्मिती करण्यात आली आहे.
डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि कृषी क्रांती:
डॉक्टर पंजाबराव देशमुख हे शेतकऱ्यांचे देखील नेते होते. त्यांनी शेती व्यवस्था फार जवळून बघितल्यामुळे, शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबद्दल त्यांना जाण होती. त्यांना १९३० मध्ये शिक्षणासह कृषी मंत्रालयाची देखील जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी शेती क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी बजावली होती.
त्यांनी १९५२ ते १९६२ या दहा वर्षांच्या कालावधीसाठी कृषिमंत्री म्हणून कार्य करत शेती क्षेत्रामधील प्रगतीला फार मोठी गती दिली होती. त्यांनी शेती क्षेत्रामध्ये केलेली क्रांती बघता पंजाबच्या शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल फार आदर वाटू लागला, आणि या आदरामधूनच पंजाबच्या शेतकऱ्यांनी त्यांना पंजाबराव असे नाव बहाल केले.
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा सत्याग्रह:
बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता, आणि मंदिर प्रवेश मिळवला होता हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र या कार्यामध्ये त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्थात भाऊसाहेब देशमुख यांचा देखील फार मोलाचा हातभार लाभला होता. त्यांनी या कार्यामध्ये बाबासाहेबांची फार मोठी मदत केली होती.
पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक क्षेत्रामधील कार्य:
संपूर्ण समाज हाच आपला गोतावळा आणि आपले कुटुंब असे डॉक्टर पंजाबराव देशमुख नेहमी म्हणत असत. त्यांना समाजाच्या प्रगतीमध्ये फार स्वारस्य होते. त्यांनी शैक्षणिक, शेती, कृषी, यांसारख्या क्षेत्रामधील जुनाट प्रथापरंपरा मोडीत काढून, नवीन व आधुनिक पद्धतीने समाजाला प्रगती करण्यासाठी उद्युक्त केले होते.
त्यांनी अस्पृश्यता या प्रथेवर बंदी घालत, त्याविरुद्ध फार मोठे आंदोलन केले होते. त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्य परिषद भरवून अस्पृश्यांसाठी सार्वजनिक विहिरी, पिण्याच्या पाण्यासाठी खुल्या करून दिल्या होत्या. त्यामुळे त्यांना सर्व समाजाबद्दल फार मानसन्मान मिळत असे.
त्यांनी मागास जमातींच्या कल्याणाकरिता अखिल भारतीय मागास जाती संघ स्थापन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी फार मोठी कामगिरी केली होती. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी देखील फार मोलाचे कार्य केलेले असून, सर्व जाती-धर्मांच्या मुलांना समान पद्धतीने शिक्षण घेता यावे, याकरिता श्रद्धानंद छात्रालय स्थापन केले होते. या अंतर्गत मागास समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत फार मोठी मजल मारली होती.
निष्कर्ष:
आजच्या पिढीने बघितलेले नेते हे वेगळ्या स्वरूपातील आहे. नेता म्हटलं की खाकीचे एकदम कडक कपडे, आणि डोक्यावर टोपी हेच समोर येते. भरपूर पैसा, गाड्यांचा फौज फाटा अशी आजचे नेत्यांची ओळख झालेली आहे. मात्र पूर्वीच्या काळी नेता म्हटलं की समाजासाठी स्वतः पुढे होऊन नेतृत्व गुण दाखवत कार्य करणाऱ्या व्यक्तीला नेता म्हणून ओळखले जात असे.
नेते हे समाजाच्या हितासाठी फार कार्य करत असत, त्यामुळे त्यांना समाजातून फार प्रतिष्ठा देखील लाभत असे. असेच एक भारतातील नेते म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना ओळखले जाते. शेतकरी वर्ग असो दुर्बल घटक असो किंवा अस्पृश्य वर्ग असो समाजातील प्रत्येक घटकांच्या हितासाठी आणि विकासासाठी त्यांनी आपली संपूर्ण हयात झीजवली होती.
अशा या पंजाबराव देशमुख यांच्या बद्दल आज आपण माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या जीवनचरित्राबरोबरच कौटुंबिक जीवन, प्रारंभिक आयुष्य, त्यांनी केलेले ऐतिहासिक कार्य, कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या क्रांतीमध्ये त्यांचे योगदान, त्याचबरोबर त्यांनी मंदिरात प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह, यांसारख्या विविध गोष्टींची माहिती बघितलेली आहे.
FAQ
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे संपूर्ण नाव काय होते?
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे संपूर्ण नाव पंजाबराव (भाऊसाहेबराव) शामराव देशमुख असे होते.
पंजाबराव देशमुख यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?
पंजाबराव देशमुख यांचा जन्म दिनांक २७ डिसेंबर १९९८ या दिवशी अमरावतीच्या पापळ या ठिकाणी झाला होता.
पंजाबराव देशमुख यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?
पंजाबराव देशमुख यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव शामराव बापू असे होते.
पंजाबराव देशमुख यांनी घेतलेले सर्वात उच्च शिक्षण कोणते समजले जाते?
पंजाबराव देशमुख यांना उच्च शिक्षणासाठी ओळखले जाते, त्यांनी परदेशी जाऊन शिक्षण घेतलेले असून त्यांच्या सर्वोच्च शिक्षणामध्ये पीएचडी चा समावेश होतो. त्यांनी ही पदवी ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ लिटरेचर म्हणून घेतली होती.
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता?
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा मृत्यू दिनांक १० एप्रिल १९६५ या दिवशी झाला होता.