दुधी हलवा रेसिपी मराठी Dudhi Halwa Recipe In Marathi दुधी हलवा हा दुधी भोपळ्याचा कीस, दूध, आणि काजू, बदाम पिस्ता पासून बनवला जातो. हा एक स्वादिष्ट आणि गोड पदार्थ आहे. भारतात काही ठिकाणी दुधी हलवा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. दुधी हलवा हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. दुधी हलव्याचा उपयोग आपण नाष्टा म्हणून किंवा जेवणासोबत गोड पदार्थ म्हणून करू शकतो, हा एक लोकप्रिय पदार्थ आहे.
आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती स्वादिष्ट आणि चवदार दुधी हलवा खायाला मिळतो. काही लोकांना दुधी हलवा खूप आवडतो, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट आणि गोड हलवा मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि चवदार दुधी हलवा कसा बनवतात यांची रेसिपी. आता आपण दुधी हलवा रेसिपी पाहणार आहोत.
दुधी हलवा रेसिपी मराठी Dudhi Halwa Recipe In Marathi
दुधी हलव्याचे प्रकार :
दुधी हलवा हा एक पौष्टिक पदार्थ आहे, भारतात विविध ठिकाणी दुधी हलवा वेग-वेगळ्या प्रकारे बनवला जातो. जसे दुधी हलवा, दुधी घारगे, दुधी शिरा, दुधी पराठे, दुधी भोपळ्याचे हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आणि चवदार आहेत.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
दुधी हलवा रेसिपी ही आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
दुधी हलव्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :
दुधी हलवा तयार करण्यासाठी पहिले सर्व साहित्य एकत्र करावे लागते. नंतर आपण लवकर हलवा बनवू शकतो, यासाठी आपल्याला 15 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
दुधी हलवा कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
दुधी हलवा बनवण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर कुकिंग करावी लागते, यासाठी आपल्याला टोटल टाईम 35 मिनिट वेळ लागतो.
दुधी हलव्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 3 वाट्या दुधी भोपळ्याचा खिस.
2) 100 ग्रॅम तूप.
3) 2 वाट्या साखर.
4) 1 ग्लास दूध.
5) 1 चमच वेलची पावडर.
6) 1 वाटी काजू, बदाम, पिस्ता.
पाककृती :
- सर्वात प्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुऊन घ्या, नंतर भोपळा व्यवस्थित कापून त्यातील बिया वेगळ्या काढा.
- नंतर दुधी भोपळ्याचे लहान-लहान तुकडे तयार करून त्याला चांगला खिसून घ्या, आणि एका भांड्यात काढून ठेवा.
- नंतर काजू-बदाम, पिस्ताचे लहान तुकडे तयार करून घ्या, आणि नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅसवरती कढई ठेऊन त्यात 3 चमचे तूप टाकून गरम करा, तूप गरम झाले की,
- यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ताचे तुकडे टाकून चांगले भाजून घ्या, थोडे तपकिरी झाले की खाली काढून घ्या.
- नंतर कढईत अजून थोडे तूप टाकून गरम करा, नंतर यामध्ये आपण तयार केलेला दुधी खिस टाका.
- आणि चांगल्या प्रकारे तुपात भाजून घ्या, आणि सतत ढवळत रहा, म्हणजे हलवा खाली लागणार नाही.
- हलव्याचा कच्चा वास निघून गेला की, खिस बाजूने थोडे तूप सोडेल तेव्हा आपला खिस झाला समजावे.
- नंतर यामध्ये थोडे दूध टाका, आणि व्यवस्थित मिसळून घ्या, आणि 5 मिनिट झाकण ठेऊन चांगला शिजवू द्या.
- थोडा वेळाने यामध्ये आवश्यक तेवढी साखर, आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
- 2 मिनिट नंतर यामध्ये आपण तयार केलेले बारीक काजू-बदाम, पिस्ताचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- नंतर गॅस बंद करून हलवा खाली काढून घ्या, हलवा वरती थोडे आणखी काजू-बदाम पिस्ताचे तुकडे टाकून सजवा.
- आता आपला स्वादिष्ट आणि गोड दुधी हलवा खाण्यासाठी तयार आहे, आपण एका छोट्या वाटीत घेऊन दुधी हलवा खाण्याचा आनंद घेऊ शकतो.
दुधी हलव्यामध्ये असणारे घटक :
दुधी हलवा हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, हलवा तयार करण्यासाठी विविध प्रकारचे पौष्टिक साहित्य वापरले जाते. यामुळे यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, जसे कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी, लोह, चरबी, फॅट, कॅलरी, तांबे, मॅग्निशियॅम, फॉस्फरस, प्रथिने हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक घटक आहेत.
फायदे :
दुधी हलवा सेवन केल्याने आपल्याला कॅल्शियम, प्रोटीन, तांबे, पोटॅशियम सारखे घटक मिळतात.
यामुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, आणि आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.
यामध्ये असणारे घटक लोह, चरबी, फॅट, कॅलरी यामुळे आपल्या शरीराची आणि मासपेशीची वाढ होते.
दुधी हलव्यामध्ये असणारे सर्व पौष्टिक घटक आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
दुधी हलवा आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला उलटी किंवा मळ-मळ होऊ शकते.
यामध्ये असणारे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जास्त झाले तर, आपण आजारी पडू शकतो.
हलवा हा एक तेलकट पदार्थ आहे, ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो.
म्हणून दुधी हलवा आपण योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.
तर मित्रांनो, तुम्हाला दुधी हलवा रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.