दम आलू मराठी Dum Aloo Recipe In Marathi

दम आलू मराठी Dum Aloo Recipe In Marathi  दम आलू हे आलू उकडून बनवले जातात. हा खायाला एकदम स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. जो सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे, हा शुध्द शाकाहारी पदार्थ आहे. यांचा उपयोग पुरी किंवा चपाती सोबत जेवणात केला जातो. भारतात विविध ठिकाणी दम आलू वेग-वेगळ्या प्रकारे बनवले जातात. आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल किती चवदार आणि स्वादिष्ट दम आलू मिळतात.

परंतु काही भागात स्वादिष्ट दम आलू मिळत नाही, काही लोकांना दम आलू खूप आवडतात. पण त्याचा परिसरात स्वादिष्ट दम आलू मिळत नाही, आणि काही लोकांना यांची रेसिपी माहीत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या पद्धतीने हॉटेल सारखे मसालेदार दम आलू कशे बनवतात यांची रेसिपी. आता आपण दम आलू रेसिपी पाहणार आहेस.

Dum Aloo Recipe

दम आलू मराठी Dum Aloo Recipe In Marathi

दम आलूचे प्रकार :

दम आलू हा एक स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ आहे. दम आलूचे विविध प्रकार पडतात, जसे दम आलू, मसाला आलू, आलू मटर, आलुची चटणी, रस्सा आलू हे सर्व प्रकार खायाला एकदम चवदार आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
दम आलू ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

दम आलुच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ :

दम आलू तयार करण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर ही रेसिपी बनवू शकतो, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

दम आलू कुकिंग करण्यासाठी आपल्याला 25 मिनिट वेळ लागतो.

टोटल टाईम :

दम आलू बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करावे लागते, नंतर कुकिंग करावे लागतात. यासाठी आपल्याला टोटल टाईम 45 मिनिट वेळ लागतो.

दम आलूसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 5 ते 6 बटाटे/आलू.
2) 2 टोमॅटो.
3) 2 हिरवी मिरची.
4) 3 चमचे लसण-अद्रक पेस्ट.
5) 1 चमचा जिरे.
6) 1 चमचा हळद.
7) 1 चमचा मिरची पावडर.
8) कोथिंबीर.
9) 2 चमचे गरम मसाला.
10) तेल.
11) 1 चिमूट कस्तुरी.
12) मीठ.
13) थोडी लवंग, दालचिनी.
14) 2 ते 3 तमालपत्र, मिरे.

पाककृती :

 • भटुरे मराठी
 • सर्वात प्रथम बटाटे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्या. नंतर लसन-अद्रक पेस्ट तयार करा.
 • नंतर टोमॅटो, कोथिंबीर, आणि कांदा बारीक चिरून घ्या, आणि मिक्सर मधून बारीक पेस्ट तयार करा.
 • नंतर गॅस चालू करून, त्यावर एक खोल तळाचे भांडे ठेवा. त्यामध्ये बटाटे उकळू घाला.
 • बटाटे चांगले नरम झाले की, खाली काढा, व थंड होऊ द्या. नंतर त्याची साल काढून घ्या.
 • बटाटेच्या मध्य भागात चमच्याने 4 ते 5 छिद्रे पाडा, यामुळे बटाट्यांमध्ये भाजीचा रस्सा चांगला मिक्स होईल.
 • एका भांड्यात बटाटे टाकून, त्यावर अर्धा चमचा मिरची पावडर, हळद, आणि थोडे मीठ टाकून चांगले मिक्स करा.
 • नंतर गॅस वरती एक खोल तळाचा पॅन ठेवा, त्यात थोडे तेल टाकून 2 मिनिट आलू फ्राय करून घ्या.
 • बटाटे फ्राय झाले की, नंतरच्या कामासाठी बाजूला ठेवा, आता आपण मसाला तयार करूया.
 • आता पॅनमध्ये आणखी आवश्यक तेवढे तेल टाकून गरम करा. यामध्ये प्रथम बारीक कांदा आणि लसन-अद्रक पेस्ट टाका,
 • पेस्ट छान होईपर्यत परतवत रहा, पेस्ट मधील कच्चा वास निघून गेला पाहिजे.
 • पेस्ट झाला की, यामध्ये 2 ते 4 लवंग, काळी मिरे, दालचिनी, तमालपत्र टाकून चांगले फ्राय करा.
 • नंतर यांमध्ये टोमॅटो पेस्ट आणि हिरवी मिरची टाका, आणि व्यवस्थित मिक्स करा, हे मिश्रण 4 ते 5 मिनिट शिजवू द्या.
 • नंतर 4 ते 5 मिनिट नंतर यांमध्ये मिरची पावडर, हळद, गरम मसाला, आणि थोडी कस्तुरी टाकून मिक्स करा.
 • हा सर्व मसाला चांगला शिजू द्या, नंतर यांमध्ये चवीनुसार थोडे मीठ आणि बारीक कोथींबीर टाका.
 • मसाला झाला की, यामध्ये फ्राय केलेले आलू टाका, आणि रस्सा घट होईपर्यत मसाला होऊ द्या.
 • मसाला घट्ट झाला की, त्यांमध्ये थोडी कोथिंबीर टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.

आता आपली स्वादिष्ट आणि मसालेदार दम आलू खाण्यासाठी तयार आहेत. आपण पोळी किंवा पुरी सोबत दम आलू खाण्याचा आनंद घेऊ शकतो.

दम आलूमध्ये असणारे घटक :

दम आलू हा एक पौष्टिक पदार्थ आहे, यांमध्ये विविध भाजीपाले वापरले जातात. त्यामुळे यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅल्शियम, प्रथिने, कर्बोदके, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, चरबी हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

दम आलू हा एक पौष्टिक आहार आहे, यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यासारखे घटक आहेत. यामुळे आपले डोळे, त्वचा कोरडी राहते.

यातील कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन कर्बोदके हे आपले शरीर निरोगी ठेवतात, आणि आपला थकवा दूर करतात.

यातील सर्व घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत,

तोटे :

दम आलू हा एक पौष्टिक पदार्थ आहे, आपण हा जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला पोटदुखी होऊ शकते.

यामध्ये विविध घटक असतात, हे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपण आजारी पडू शकतो.

म्हणून आपण दम आलू योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला दम आलू रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment