Dussehra Festival Information In Marathi असा एकही महिना नसेल ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सण आला नाही. भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांची मोठी रेलचेल असून, प्रत्येक सणाचा खास काहीतरी उद्देश किंवा महत्त्व असतेच असते. असाच एक महत्त्वपूर्ण सण म्हणून दसरा ओळखला जातो. संपूर्ण भारतभर साजरा केला जाणारा हा सण का साजरा केला जातो याचे मूळ आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये किंवा पुराणांमध्ये आढळून येते.
दसरा सणाची संपूर्ण माहिती Dussehra Festival Information In Marathi
सण प्रत्येक वर्षाच्या मराठी दिनदर्शिका नुसार अश्विन महिन्यांमध्ये येत असतो. ज्याची तिथी शुक्ल पक्ष दशमी अशी असते. या सणामागील कारण म्हणजे ज्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध करता यावा याकरिता चंडी पूजा केली, त्या दिवसाला दसरा म्हणून ओळखले जाते. आजच्या भागामध्ये या ऐतिहासिक स्वरूपाचे महत्त्व प्राप्त असलेल्या दसरा सणाबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, व त्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत…
प्रत्येक वर्षी दसरा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण भारतीय लोक/शस्त्रास्त्रांची पूजा करून विजय उत्सव साजरा करत असतात. प्रत्येक वर्षाला मराठी महिन्यानुसार शुक्लपक्ष दशमी या आश्विन महिन्यातील तिथीला साजरा केला जातो.
त्या दिवशी रावण या लंकाधिश राजाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील केले जाते. हे वाईट शक्तीवर चांगल्या शक्तीचे प्रभुत्व किंवा विजय म्हणून साजरा केला जात असते. हा सण भारतातील काही ठिकाणी फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणांमध्ये राजस्थानचे जोधपुर, हिमाचल मधील बैजनाथ, मध्यप्रदेश मधील मंदसौर, आणि आंध्र प्रदेशातील काकीनाडा इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.
दसरा सणाचे महत्त्व:
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाचे विशिष्ट असे महत्त्व आहे. ज्यावेळी भगवान श्रीराम यांनी रावणाविरुद्धचे विरुद्ध जिंकले होते, तसेच दृष्ट शक्तीचा नाश केला होता या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी आपट्याच्या झाडावर शस्त्र लपवले गेले होते, असे सांगितले जाते.
व हे शस्त्र लंकेच्या विजयानंतर पुन्हा मिळवले गेले आणि आनंदोत्सव साजरा केला. त्या दिवशी या गोष्टीचे प्रतीक म्हणून अनेक लोक आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटत असतात. त्यानंतर २१ दिवसानंतर अर्थात दिवाळीच्या दिवशी श्रीराम पुन्हा आपल्या कर्मभूमीमध्ये परतले होते, आणि या दिवशी देखील दिवाळी हा उत्सव साजरा केला जातो.
भगवान श्रीराम ज्यावेळी वनवासामध्ये होते, त्या वेळेला रावणाकडून माता सिता यांचे अपहरण करण्यात आले होते. ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्यावेळी भगवान श्रीराम यांच्या वनवासाची मर्यादा संपत आली होती. मात्र वनवासातून तसेच भगवान श्रीराम यांना लंकेला सीतामातांच्या रक्षणाकरता जावे लागले. रावणाविरुद्ध युद्ध करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी चंडी मातेचा मोठा यज्ञ केला होता.
जो नऊ दिवस चालला होता, म्हणून नवरात्र साजरी केली जाते. आणि या नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय प्राप्त केला होता. हा दिवस प्रत्येकाच्या लक्षात राहावा, म्हणून तिथून पुढे हा दिवस दसरा या नावाने रूढ झाला.
रावण हा अतिशय हुशार आणि मुत्सद्दी राजा होता. त्याला चारही वेदांचे चांगले ज्ञान होते. त्यांनी आपली संपूर्ण लंका नगरी सोन्याने बनवली होती. मात्र त्याचा एक अवगुण होता आणि तो म्हणजे तो प्रचंड अहंकारी होता. आणि या अहंकारामुळेच त्यांनी आपल्या बहिणीचा अर्थात शुर्पनखाचा बदला घेता यावा यासाठी प्रभू श्रीराम यांच्यासोबत वैर घेतले, आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
दसरा सण साजरा करण्याची पद्धत:
प्रत्येक सण साजरा करण्यासाठी त्याचे पुराण आणि साजरा करण्यामागे असणारा उद्देश या आधारावर विविध पद्धती ठरविल्या जातात. त्याचप्रमाणे दसरा देखील पौराणिक आधारावर साजरा केला जातो. ज्यावेळी दुर्गा किंवा चंडी यांचा उत्सव अर्थात नवरात्राचा नऊ दिवसांचा उत्सव संपतो, त्यानंतर दसरा हा सण साजरा केला जातो.
या दिवशी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर घरोघरी शस्त्रास्त्रांची पूजा करून, वाहने देखील पुजली जातात. एकमेकांना आपट्याचे झाड भेट देऊन आनंद उत्सव साजरा केला जातो. त्याच बरोबर अनेक ठिकाणी रामायणातील पात्रांचे नाटक सुद्धा साजरी केले जाते.
बदलत्या जीवनशैलीनुसार दसऱ्याचे बदलते स्वरूप:
आजकाल मानवाची जीवनशैली फार मोठ्या प्रमाणावर बदलत चाललेली आहे. त्यामुळे अनेक सण उत्सव साजरा करण्याच्या पद्धती देखील बदलत चाललेल्या आहेत. त्यामध्ये दसरा या सणाचा देखील समावेश होतो. पूर्वी एकमेकांच्या घरी जाऊन लोक दसरा या सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असत.
तसेच एकमेकांना सोने किंवा शमी ची पाने वाटून शुभेच्छा देखील देत असत. रावण दहन करण्यासाठी संपूर्ण समाज एकत्र येत असे, प्रत्येक जण आपल्या घरगुती पूजा मध्ये व्यस्त असतो. त्यामुळे संपूर्ण समाज या सणानिमित्ताने एकत्र येताना आपल्याला दिसत नाही.
पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार समाजाला आनंदाच्या क्षणांनी एकत्र आणण्याकरिता विविध सणांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आजकाल या उद्देशालाच तिलांजली देताना समाज दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे किंवा शेजारीपाजारी जाऊन असे सर्व सण उत्सव साजरे केले पाहिजेत.
निष्कर्ष:
भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणांची रेलचेल असते. हा प्रत्येक सण काहीतरी वेगळी वैशिष्ट्य घेऊन येत असतो. आणि योग्य हंगामानुसार किंवा ऋतूनुसार सणांना वेगवेगळे महत्त्व प्राप्त झालेले असते. असाच एक सण म्हणजे दसरा सण होय. हा सण एक ऐतिहासिक महत्त्व म्हणून साजरा केला जात असतो. आजच्या भागामध्ये आपण या सर्वांच्या आवडीच्या आणि प्रत्येक जण ज्याची आतुरतेने वाट पाहतो, असा दसरा सणाबद्दल माहिती बघितलेली आहे.
हा दसरा सण दिवाळीच्या आधी २१ दिवस साजरा केला जात असतो. आजच्या माहितीमध्ये आपण दसरा म्हणजे काय, दसरा सणाचे महत्त्व काय आहे, हा केव्हा व कशा प्रकारे साजरा केला जातो, त्याच बरोबर दसरा उत्सव मेळा म्हणजे काय, आजकाल बदलत्या जीवनशैलीनुसार दसऱ्याचे देखील स्वरूप कशा रीतीने बदलत आहे, इत्यादी माहिती बघितली आहे. सोबतच काही प्रश्न सुद्धा चर्चिले आहेत.
FAQ
गेल्या वर्षी दसरा कोणत्या दिवशी होता, व येत्या २०२४ या वर्षी दसरा कोणत्या तारखेला असणार आहे?
मागच्या वर्षी अर्थात २०२३ ला दसरा दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी होता, तर २०२४ या वर्षी दसरा १२ ऑक्टोबर २०२४ शनिवार या दिवशी असणार आहे.
दसरा हा सण कोणत्या गोष्टीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो?
ज्यावेळी भगवान श्रीराम यांनी रावणाचा पराभव करता यावा यासाठी चंडी पूजा आयोजित केली होती, त्या दिवसाची आठवण म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो.
दसरा सणाच्या आधी काय साजरी केली जाते?
घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस नवरात्रीच्या स्वरूपात देवीच्या आराधना केली जाते, व दहाव्या दिवशी दशहरा अर्थात दसरा साजरा केला जातो.
दसऱ्यानंतर येणारा मुख्य सण कोणता?
दसऱ्यानंतर दिवाळी हा संपूर्ण भारतीयांच्या आनंदाचा उत्सव साजरा केला जात असतो, दिवाळी व दसरा या दोन सणांमध्ये अवघे २१ दिवसांचे अंतर असते.
दसरा या सणाच्या दिवशी पूजा कशा स्वरूपात केली जाते?
दसरा हा सण खरे तर शस्त्रास्त्रांची पूजा करण्याचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरातील शस्त्रे पुजत असतो. त्याचबरोबर आपली वाहने इत्यादींची पूजा करत असतो. सोबतच एकमेकांना आपट्याची पाने अर्थात सोने वाटून हा उत्सव साजरा केला जात असतो.