ई-कॉमर्स म्हणजे काय? | Ecommerce information in marathi

ecommerce information in marathi ई-कॉमर्स म्हणजे ecommerce meaning in marathi इलेक्ट्रॉनिक कॉमर्स किंवा इंटरनेट कॉमर्स. ऑनलाइन पद्धतीने इंटरनेटवरून कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री करणे म्हणजे इ कॉमर्स होय. साधारणत: आठ ते दहा वर्षांपूर्वी आपल्याला एखादी वस्तू जसे की मोबाईल, पुस्तक, इत्यादी. घ्यायचे असेल तर बाजारात जाऊन कित्येक दुकानांमध्ये त्या वस्तू विषयी चौकशी करायला लागायची, तरीदेखील आपल्याला पाहिजे तीच वस्तू भेटेल याची खात्री नव्हती आणि काही कारणास्तव जर आपण खरेदी केलेली वस्तू परत करायला गेलो तर दुकानदार ती वस्तू परत घेत नव्हते.

ecommerce information in marathi
ecommerce information in marathi

ई-कॉमर्स म्हणजे काय? | Ecommerce information in marathi

सध्याच्या या आधुनिक काळात ई-कॉमर्स मुळे आपण घरी बसल्या आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करू शकतो. तसेच काही कारणास्तव जर ती वस्तू परत करायची असेल तर ती परत देखील करू शकतो आणि त्या बदल्यात आपण दिलेले पैसे परत मिळवू शकतो. आणि याशिवाय इ कॉमर्स ecommerce in marathi चा एक खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे यावरून खरेदी केलेल्या वस्तू डायरेक्ट आपल्याला घरपोहोच मिळतात.

इ कॉमर्स चे प्रकार (types of ecommerce information in marathi)

१. Business to consumer (B 2 C) :

ई-कॉमर्स च्या इतर मॉडेलच्या मॉडेल्स पेक्षा B 2 C हे मॉडेल खूप जास्त लोकप्रिय आहे. B 2 C मोडेल म्हणजे एखाद्या व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामध्ये होणाऱ्या वस्तूंचा व्यवहार किंवा देवाण-घेवाण होय. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ऑनलाइन विक्रेत्यांकडून ग्राहकाने खरेदी केलेला मोबाईल.

२. Business to Business (B 2 B) :

b2b प्रकारच्या ई-कॉमर्स म्हणजे दोन व्यवसाय यांमधील होणारी वेगळ्या प्रकारची देवाण-घेवाण. यामध्ये एक व्यवसाय करणारी कंपनी दुसरा कंपनीला काही सेवा देते या सेवांमध्ये मुख्यतः कच्चामाल, काही सॉफ्टवेअर्स किंवा इतर काही प्रकारचा तयार झालेला माल विक्रीसाठी होलसेलरला दिला जातो. b2b प्रकारच्या इ कॉमर्स मध्ये व्यवसाय कंपनीचे ग्राहकाशी थेट संबंध येत नाही. काही वेळेस व्यवसाय कंपनी किरकोळ विक्रेत्यांना देखील थेट माल विकते.

३. Direct to consumer (D 2 C):

ई-कॉमर्सचे D2C मॉडेल हे खूप नवीन मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये एखादी वस्तू डायरेक निर्माता कंपनीकडून ते ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये डिस्ट्रीब्यूटर, होलसेलर किंवा रिटेलर यांचा कुठल्याही प्रकारचा समावेश होत नाही. त्यामुळे ग्राहकाला ही वस्तू स्वस्तात मिळते आणि याच कारणामुळे हे मॉडेल सध्या खूप लोकप्रिय होत चालले आहे. D2C मॉडेल मध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट यांसारख्या समाज माध्यमांचा खूप मोठा वाटा आहे.

४. Consumer to Consumer (C2C):

ग्राहक ते ग्राहक या प्रकारच्या एक कॉमर्स मध्ये वस्तूंची देवाणघेवाण ग्राहकांमध्ये होते. यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसायिकाचा, होलसेलर , रिटेलर्स कोणाचाही संबंध येत नाही. एखादी वस्तू एका ग्राहकाकडून थेट दुसऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचवली जाते.

५. Consumer to Business (C2B) :

कंजूमर टू बिजनेस ई-कॉमर्स मध्यमान एखादा व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या सेवा किंवा वस्तू थेट एखाद्या व्यवसायिक कंपनीला किंवा संस्थेला विकतो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे फोटोग्राफर किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणारे व्यक्ती.

नक्की वाचा :कि बोर्डची माहिती

इ कॉमर्स चे फायदे

१. वेळेचे बंधन नाही
ई-कॉमर्स वेबसाइट दिवसातील 24 तास आणि आठवड्यातील सातही दिवस सुरू असल्याने आपण आपल्या सोयीनुसार कधीही,कुठेही आणि कोणत्याही वेळेला खरेदी-विक्री करू शकतो.
२. वापरण्यास सोप्पे
ई-कॉमर्स वेबसाइट हाताळण्यासाठी खूप सोपे असतात. कोणतीही व्यक्ती या वेबसाईट सहज हाताळू शकते आणि ऑनलाइन वस्तूंची खरेदी करू शकते.
३. Quick delivey
ई-कॉमर्स वापरून खरेदी केलेल्या वस्तू लवकरात लवकर आपल्या घरापर्यंत पोहोच केल्या जातात.
४. Easy returns
ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू जर खराब असतील किंवा इतर काही कारणास्तव जर आपल्याला त्या वस्तू परत करायच्या असतील, तर खूप सोप्या पद्धतीने आपण त्या वस्तू परत करू शकतो आणि त्या बदल्यात आपण आपले पैसे किंवा दुसरी चांगली वस्तू मागू शकतो.
५. जागतिक बाजारपेठ
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ऑनलाइन असल्याकारणाने आपण जगातील कुठलेही कानाकोपर्‍यातून वस्तूंची खरेदी-विक्री करू शकतो.
६. कमी गुंतवणूक
ई-कॉमर्स च्या माध्यमातून वस्तूंची विक्री करण्यासाठी आपल्याला खूप कमीत कमी गुंतवणूक करून चांगल्या प्रकारचा व्यवसाय चालू करता येतो.
इ कॉमर्स चे तोटे
१. नेटवर्क प्रॉब्लेम
जर आपल्या इंटरनेट नेटवर्क ला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या वेळेस आपण ई-कॉमर्स च्या मदतीने खरेदी-विक्री करू शकत नाही.
२. वेबसाईट प्रॉब्लेम
काही अपडेट्स किंवा मेंटेनन्स च्या कामासाठी जर वेबसाईट बंद असेल तर त्या वेळेस देखील आपल्याला खरेदी विक्री साठी अडचणी येतात.
३. सेक्युरिटी
काही वेळेस इ कॉमर्स वेबसाईटवर आपल्याला वस्तूंसाठी ऑनलाइन पेमेंट करावे लागते तर त्यावेळेस काही वेबसाइट्स वर आपल्याला सिक्युरिटी चा खूप मोठा धोका असतो.
४. वस्तूची उपयोगिता
ऑनलाइन खरेदी करतेवेळी आपण एखाद्या वस्तूचा फक्त फोटो पाहूनच त्याची खरेदी करतो. पण ज्यावेळेस ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवली जाते तर त्या वेळेस कदाचित ती वस्तू दाखवलेल्या फोटो पेक्षा जरा वेगळीच असते. ज्यामुळे आपल्याला त्या वस्तूचा काही उपयोग होत नाही. परिणामी आपल्याला ती वस्तू परत करावी लागते .हे एक खुप मोठे कारण आहे की ज्यामुळे लोक ऑनलाईन खरेदी करत नाही.
५. तीव्र स्पर्धा
ई-कॉमर्स कंपन्यां कायमच वस्तूची गुणवत्ता वस्तूंची डिलिव्हरी टाईम वस्तूंची उपलब्धता यांसारख्या अनेक कारणांनी एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात.

Leave a Comment