Festival Information In Marathi भारत देश आणि सण यांचे एक अतूट असे नाते आहे. भारतामध्ये असा एकही महिना बघायला मिळणार नाही की ज्यामध्ये किमान दोन ते तीन सण येत नसतील. मित्रांनो, भारत हा संस्कृती आणि परंपरा जपणारा अतिशय जुनी संस्कृती असणारा देश आहे. भारतामध्ये सर्वात प्राचीन समजला जाणारा सनातन धर्म अतिशय गुण्यागोविंदाने नांदतो, त्यामुळे भारतीयांच्या सणावारांना आणि संस्कृतीला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या सर्वांमुळेच भारताला सणांचा देश म्हणून देखील ओळखले जाते.
सणाची संपूर्ण माहिती Festival Information In Marathi
आपण अनेक ठिकाणी ऐकले किंवा वाचले असेल की भारत हा विविधतेमध्ये एकता दर्शविणारा देश आहे. भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुन्या गोविंदाने नांदतात. प्रत्येक जाती धर्माचे सण हे वेगवेगळे असल्याकारणाने येथे सणांचा जणू मेळाच भरलेला असतो.
त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक जाती धर्माची लोक एकमेकांचे सण अगदी उत्साहात साजरी करताना दिसतात. त्यामुळे भारतामध्ये बाराही महिने अगदी उत्साहाचे वातावरण या सणांमुळे बघायला मिळते. या कार्यक्रमांमध्ये पुरुषांपेक्षा महिला आणि मुले एका वेगळ्याच उत्साहात बघायला मिळतात. त्यामुळे घरामध्ये आनंद आणि चैतन्य अगदी पोतपोत भरून जाते.
आजच्या भागामध्ये आपण भारतीय सणाविषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत…
१. दिवाळी / दीपावली:
भारतीय संस्कृतीतील सर्वात प्रमुख सण म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो. हा सण कुठल्या एका राज्याचा नसून भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये साजरा केला जातो. दरवर्षी कार्तिक अमावस्येला हा सण साजरा केला जातो, जो की इंग्रजी वर्षानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये येत असतो. दिवाळीला दिव्यांचा सण म्हणून दीपावली असे नाव आहे. दीपावलीचा अर्थ दिव्यांची ओळ असा होतो.
या दिवशी संपूर्ण भारत देश दिव्यांच्या प्रकाशात न्हाहून निघतो. विविध आरास केली जाते, भारतातील प्रत्येक घरी गोड गोड नैवेद्य बनवला जातो, फराळाचे पदार्थ केले जातात, लहान मुले अगदी आनंदून फटाके वाजवत असतात, घरातील प्रत्येक सदस्याला नवीन पोशाख घेतला जातो, सगळीकडे कसा आनंदी आनंद भरलेला असतो. अशी ही दिवाळी माझ्यासह प्रत्येक भारतीयाची आवडती आहे.
खरे म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय हे प्रतीक घेऊन येणारी दिवाळी विजयासाठी दिव्यांना समर्पित करते. पुराणांमध्ये कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र आणि माता सीता दोघेही वनवास संपवून परतले होते, वनवासाच्या शेवटच्या कालावधीमध्ये त्यांनी बंधू लक्ष्मणासोबत मिळून राक्षसांचा राजा असणारा रावण याचा वध करून वाईट प्रवृत्तीला नष्ट केली होती. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी मध्ये दिव्यांच्या रांगांनी आरास केली होती, म्हणूनच तेव्हापासून हा दीपावली सण साजरा केला जातो.
२. होळी:
होळी माहित नाही असे कोणीही या जगात सापडणार नाही. कुठलेही भान न ठेवता अगदी आनंदात प्रत्येक जण एकमेकांवर रंगांची आणि धुळवडीची उधळण करत असतो. त्याचप्रमाणे होलिका पेटवून वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याची शपथ देखील घेत असतो. होळी हा रंगांनी भरलेला अगदी रंगीबेरंगी असा सण आहे.
शाळकरी मुलांचा तर हा सण अत्यंत आवडीचा आहे. त्या दिवशी प्रत्येक जण एकमेकांना रंग लावताना समोरच्या प्रती आपला बंधुभाव आणि आपुलकी देखील दाखवत असतो. हा सण प्रत्येक वर्षाच्या फाल्गुन महिन्यामध्ये साजरा केला जातो. जो इंग्रजी महिन्यानुसार मार्च महिन्यामध्ये येतो. विशेष म्हणजे भारतासह हा सण नेपाळ या देशांमध्ये देखील साजरा केला जातो हे विशेष.
३. महाशिवरात्री:
भोलेनाथ हे भारतातील जवळपास प्रत्येकाचेच आराध्य दैवत आहेत. हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. महिलांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वपूर्ण असतो, कारण आपल्याला देखील माता-पार्वतीप्रमाणे शंकरासारखा सांब सदाशिव पती मिळावा अशी प्रत्येक महिलेची मनोमन इच्छा असते, आणि त्यासाठी कुमारीका मुली सुद्धा उपवास करत असतात. या दिवशी सर्वत्र अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच जवळपास सर्वच लोक या दिवशी व्रत उपवास करतात.
४. कृष्ण जन्माष्टमी:
कोणत्या स्थितीमध्ये आपण कसे वागले पाहिजे, हे शिकवणारी देवता म्हणजे भगवान श्रीकृष्ण होय. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेमध्ये मानवाच्या उभ्या जीवनाचे सार दिलेले आहे. अशा या भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून कृष्ण जन्माष्टमी हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.
हा सण प्रत्येक वर्षी भाद्रपद कृष्ण पक्षाच्या अष्टमीला येतो. या सणाचे महत्त्व अगदी परदेशातही पोहोचलेले आहे. परदेशात देखील अनेक ठिकाणी हा सण मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. त्यादिवशी विविध भजनांचा कार्यक्रम आयोजित केला जातो, आणि मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर भक्त आपले उपवास सोडतात.
निष्कर्ष:
सण म्हटलं की भारतीयांचे रक्त कसे सळसळ करते. अगदी दोन-चार वर्षाच्या लहान बालकापासून ८० वर्षाच्या वृद्धापर्यंत सुद्धा प्रत्येक जण सणाच्या आनंदाने हर्षुन जातो. विशेष म्हणजे भारताचे प्रत्येक सण हे निसर्गानुसार मांडलेले आहेत. म्हणजेच तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत नववर्षाचे स्वागत करणारा संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातच का साजरा केला जातो, याचे कारण म्हणजे तेव्हा थंडीचे दिवस संपून उष्णतेला सुरुवात होणार असते, दिवस देखील तिळाप्रमाणे तीळ तीळ वाढणार असतो, त्यामुळे हा सण साजरा केला जातो. अगदी तसेच प्रत्येक सणाचे निसर्गाशी नाते जोडलेले आहे.
कापणीच्या हंगामात कापणीचे सण साजरे केले जातात. उन्हाळ्यामध्ये सर्व लोक निवांत असल्याने यात्रेसारखे सण साजरे केले जातात.
भारत भूमीवर हा तुझा सण आणि हा माझा सण असे कोणीही म्हणताना दिसत नाही, कारण भारत देश हा सर्व संस्कृती एकमेकांत मिसळून भारतीय संस्कृती म्हणून उदयास आलेला आहे. मित्रांनो भारतातील कोणाला देखील सणाच्या दिवशी आनंदी व्हायला सांगावे लागत नाही, कारण सण आणि आनंद हे नेहमी सोबतच येतात.
FAQ
भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण कोणता आहे?
भारतामध्ये अनेक संस्कृतींचे मिश्रण झालेले आहे, त्यामुळे प्रत्येक समुदायासाठी वेगवेगळे सण महत्त्वाचे असतात. मात्र असे असले तरी देखील दिवाळी हा असा सण आहे जो प्रत्येक जाती धर्माचे लोक अगदी उत्साहाने साजरा करतात, म्हणून भारतामध्ये दिवाळी सर्वात प्रसिद्ध सण आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो.
भारतामध्ये किती प्रकारचे सण साजरे केले जातात?
मित्रांनो, भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. या सर्वांचे मिळून वर्षभरात किमान ५० ते ७० सण साजरे केले जातात, मात्र त्यांची नेमकी यादी नाही, कारण वेगवेगळ्या प्रदेशात साजरे केले जाणारे सण वेगवेगळे असतात.
भारताचे राष्ट्रीय सण कोणते आहेत?
भारताचे राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आहेत.
भारतातील सर्वात मोठा कापणीचा सण म्हणून कोणता सण साजरा केला जातो?
बैसाखी हा सण भारतातील प्रमुख कापणीचा सण आहे, जो एप्रिल महिन्यामध्ये साजरा केला जातो. या दिवशी गव्हाच्या पिकाची कापणी सुरू होते.
रक्षाबंधन हा सण केव्हा साजरा केला जातो?
रक्षाबंधन हा प्रत्येक श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच श्रावण महिन्याच्या प्रथम पक्षाच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो.
आजच्या भागामध्ये आपण भारतीय सणाविषयी इत्यंभूत माहिती पाहिली, ही माहिती तुम्हाला निबंध लेखन करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरू शकते. त्यामुळे आपल्या विद्यार्थी दशेतील मित्र मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हा पर्यंत कमेंट द्वारे पोहोचवा.
धन्यवाद…