फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती Football Game Information In Marathi

Football Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण फुटबॉल या खेळाविषयी माहिती पाहणार आहोत. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे हा खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोल झाडा चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडू चे मुख्य उद्दिष्ट असते.

Football Game Information In Marathi

फुटबॉल खेळाची संपूर्ण माहिती Football Game Information In Marathi

हा खेळ भारतासह अनेक देशात खेळला जातो परंतु ब्राझील स्पेन फ्रान्स अर्जेंटिना इत्यादी देशात या खेळाविषयी विशेष आकर्षण दिसून येत आहे .फुटबॉल हा खेळ अमेरिका आणि कॅनडा या देशात विशेष लोकप्रिय आहे फुटबॉल या खेळाला  सॉकर या नावाने देखील ओळखले जाते.

तसेच फुटबॉलला मराठी भाषेत पायचेंडू असेही म्हणतात फुटबॉल हा खेळ मैदानावर खेळला जाणारा एक खेळ आहे फुटबॉल खेळाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात ते म्हणजे ,

१)असोसिएशन फुटबॉल ऑफ सॉकर

२)रग्बी

हा एक चांगला शारीरिक  व्यायाम सुद्धा आहे जो आपल्याला सद्भाव अनुशासन आणि खेळ भावना या विषयी शिकवतो कौशल्य व एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी ही मदत करतो .

फुटबॉल हा खेळ आपल्याला अनुशासन आणि टीम बरोबर काम कसं करावं हे शिकवतो हा अत्यंत आनंदाचा आणि आश्चर्याचा खेळ आहे.या खेळांमध्ये पाया बरोबर बॉलला ठोकर मारली जाते त्यामुळे याला फुटबॉल असे म्हणतात.

फुटबॉल चा प्रथम विश्वचषक उरुग्वे या देशाने जिंकला होता व आतापर्यंत सर्वात जास्त 5 फुटबॉल विश्व चषक जिंकणारा देश ब्राझील आहे.

विश्वचषकात फक्त 32 संघ देश भाग घेतात तर जगभरातील 211 देशांमध्ये फुटबॉल खेळले जाते.जगभरातून फुटबॉल विश्वचषक 100 करोड पेक्षा जास्त लोक पाहतात.

फुटबॉल खेळादरम्यान एक खेळाडू जवळपास 15 किलोमीटर पर्यंतची दौड लावतो.

फुटबॉल हा खेळ प्राचीन ग्रीक हा हर्पास्टॉन च्या रूपामध्ये मध्ये मानला जातो. या खेळाची सुरुवात बाराव्या शतकामध्ये झाली होती आणि याला सर्वात पहिल्यांदा इंग्लंड मध्ये खेळल्या होतं असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यासाठी नियम 1800 मध्ये आले होते. फुटबॉल खेळाची सुरुवात चीन मध्ये झाली आहे.

ऐतिहासिक रूपाने फुटबॉल खेळ 700-800 वर्ष जुना आहे. परंतु पूर्ण जगामध्ये 100 वर्षा पेक्षा जास्त काळापासून याला सर्वात जास्त पसंद केलं जातं. याला खेळण्याची सुरुवात 1863 मध्ये इंग्लंड मध्ये झाली होती. या खेळाला नियंत्रित करण्यासाठी फुटबॉल असोसिएशन ची इंग्लंड मध्ये स्थापना करण्यात आली.

आहेफुटबॉलचे आंतरराष्ट्रीय संघटन फिफा च्या माहितीनुसार फुटबॉल हा चिनी खेळ सुजू चे विकसित रूप आहे. हा खेळ चीनमध्ये हूण वंशाच्या काळात विकसित झाला होता. फुटबॉल खेळायला जपानमध्ये असुका वंशाच्या शासन काळात खेळले जायचे. त्यानंतर इसवीसन 1586 मध्ये जॉन डेविस नावाच्या एका जहाज कप्तान द्वारे हा खेळ ग्रीनलँड मध्ये खेळला गेला.

१५ व्या शतकात हा खेळ फुटबॉलच्या नावाखाली स्कॉटलंडमध्ये खेळला गेला. अशाप्रकारे, फुटबॉल या शब्दाचे मूळ सांगितले गेले आहे.म्हणजेच फुटबॉल पूर्वी खूप खेळला गेला होता परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असे.

आधी सांगितल्याप्रमाणे की यापूर्वी फुटबॉल खेळ खेळला गेला, परंतु नंतर त्याचे नाव फुटबॉल ठेवले गेले.ब्रिटनचा राजकुमार हेनरी चौथा इ.स. १४०८ मध्ये इंग्रजीमध्ये फुटबॉल हा शब्द वापरला.

१५२६ मध्ये इंग्लंडचा राजा हेनरी आठवा यांनी फुटबॉल खेळण्यात रस दाखवला आणि एक खास प्रकारचे बूट बनविला. सर फिलिप सिडनी यांनी १५८० मध्ये एका कवितेत महिला फुटबॉल खेळताना वर्णन केले होते.

१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १७ व्या शतकाच्या प्रारंभात प्रथमच गोलची कल्पना विकसित झाली.याचामुळे फुटबॉल खेळामध्ये स्पर्धेची भावना निर्माण झाली.खेळाडूंनी शेताच्या दोन विरुद्ध बाजूस झाडे लावून गोलपोस्ट बांधले. १७ व्या शतकात ८ किंवा १२ गोलांचा सामना खेळला जात असे.

फुटबॉल क्लबची सुरूवात एडिबर्गमध्ये १८२४ मध्ये झाली होती. सुरवातीला क्लबची स्थापना विद्यार्थ्यांनी केली.त्यातील एक शेफील्ड फुटबॉल क्लब आहे जो एक इंग्रजी फुटबॉल क्लब आहे.त्याची स्थापना २४ ऑक्टोबर १८५७ रोजी झाली.

हा जगातील सर्वात जुना सक्रिय फुटबॉल क्लब आहे. इंग्लिश क्लब नोट्स काउंटी १८६२ मध्ये स्थापन झाला.खेळाचा प्रसार होऊ लागला आणि व्यापाऱ्यांनी फुटबॉलमध्ये रस दर्शविला.

प्रथम फुटबॉल स्पर्धा १८७२ मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात खेळली गेली होती.हा खेळ पाहण्यासाठी ४००० लोक आले होते. गेम 0-0 च्या बरोबरीत झाला.१८८३ मध्ये जगातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला, ज्यात आयर्लंड, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्सच्या संघांनी भाग घेतला.

अशाप्रकारे इंग्लंडमध्ये फुटबॉल हा खे खुप लोकप्रिय झाला आणि लवकरच युरोपियन खंडात ती पसरली. हा खेळ सर्वप्रथम अर्जेंटिनामध्ये युरोपच्या बाहेर खेळला गेला.

भारतामध्ये फुटबॉल हा खेळ पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्यांचे नाव ‘नागेन्द्र प्रसाद सर्वाधिकारी’ आहे. त्यांना ‘भारतीय फुटबॉल चे जनक’ म्हणूनही संबोधले जाते.

नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. नंतर त्यांनी सर्वप्रथम शाळेमधील मैदानावर हा खेळ सुरू केला लोक या खेळाला पसंत करत आहेत हे नागेंद्र प्रसाद यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बॉईज फुटबॉल क्लब ची स्थापना केली त्यानंतर जशीजशी या खेळाची लोकप्रियता वाढू लागली आणि 1950 मध्ये कोलकत्ता या शहरात अनेक फुटबॉल क्लब तयार झाले.

त्यानंतर भारताने विश्वचषक मध्ये जाण्याची पात्रता साधली पण त्यावेळी भारताकडे विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तेवढे पैसे नव्हते म्हणून भारताने ऑलिंपिक कडे आपले लक्ष केंद्रित केले भारताची फुटबॉल टीम 1956 आणि 1958 मध्ये ऑलम्पिक मध्ये चार स्थान मिळवले आणि येथूनच भारतीय फुटबॉलचा सुवर्ण काळ सुरू झाला.

सुरुवातीच्या काळात फुटबॉल प्राण्यांच्या मूत्राशया पासून बनवण्यात यायचा. परंतु नंतरच्या काळात यात प्राण्यांची चामडी वापरली जाऊ लागली, ज्यामुळे फुटबॉलच्या आकार निश्चित झाला.

आधुनिक काळात विज्ञान विकसित झाल्याने बऱ्याच नावाजलेल्या फुटबॉल कंपन्या स्थापित झाल्या आहेत या कंपन्या खेळाडूंचे वय मैदान कोणते इत्यादी  गोष्टीं लक्षात घेऊन फुटबॉल ची निर्मिती करीत आहेत  सामान्यता फुटबॉलचा परीघ 58 सेंटीमीटर पासून 61 सेंटीमीटर पर्यंत असतो

फुटबॉल खेळाच्या दोन टीम असतात प्रत्येक टीम मध्ये 11-11 खेळाडू असतात. एक सामना 90 मिनिटांचा असतो. यादरम्यान 45 मिनिटांवर एक 15 मिनिटांचा ब्रेक घेतला जातो.

प्रत्येक टीम चे एक गोल पोस्ट असते आणि खेळताना फुटबॉल ला पायाने मारून दोघीही टीम चा उद्देश विरुद्ध पक्षाच्या पोस्टमध्ये जास्तीत जास्त गोल करणे हा असतो. जर खेळादरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याला ‘इंजरी टाईम’ म्हणून काही वेळ खेळ थांबवण्यात येतो.

फुटबॉल चे मैदान 100 मी, 64 मी पासून तर 110 मी, 75 मी पर्यंत चे आयताकार मैदान असते. मैदानाच्या लांबीला ‘साइड लाइन’ तर रुंदीला ‘गोल लाईन’ म्हटले जाते. मैदानाच्या मधोमध एक रेघ असते ही रेघ मैदानाला दोन भागात विभाजित करते. दोघी मैदानांच्या शेवटी 7.32 मीटर रुंद गोल क्षेत्र असतात.

आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळपट्टीची लांबी ११० मीटर आणि रुंदी ६४ ते ७५ मीटर असतं.तर इतर खेळांमध्ये त्याची लांबी ९१ ते १२० मीटर आणि रुंदी ४५-९१ मीटर असतं. सहसा जाळे गोलच्या मागे ठेवले जाते.परंतु असे कोणते नियम नाही.

आतापर्यंत आपण फुटबॉल, फुटबॉलचे मैदान, फुटबॉलचा इतिहास, फुटबॉल कसा खेळला जातो हे सर्व पाहिले आता आपण सर्वात महत्त्वाचे फुटबॉल खेळाचे नियम पाहूयात.

फुटबॉल सामना दोन संघांदरम्यान खेळला जातो. ज्यामध्ये दोन्ही संघात ११-११ खेळाडू असतात.एकूण ९० मिनिटांचा हा खेळ असतो.हा गेम गोल करणे आणि विरुद्ध संघ काढून गोल वाचवणे असा रीतीने खेळला जातो.ज्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळात पंच असतात, त्याचप्रमाणे फुटबॉलमध्येही सर्व अधिकार रेफरीकडे असतात.

रेफरीचा निर्णय वैध असतो. रेफरीबरोबर सहाय्यक रेफरी असतो जो रेफरीला सहाय्य करतो.नाणेफेक खेळ सुरू होण्यापूर्वी केला जातो ज्यामध्ये विजयी कर्णधार असा निर्णय घेतो की त्याच्या टीमला गोलपोस्टवर अटॅक करायचा आहे. किंवा चेंडूला किक ऑफ मारायची आहे.

फुटबॉल गेममधील सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा सामन्यात गोल होते तेव्हा चेंडू पुन्हा मध्य रेषेवर ठेवला जातो व सामना पुढे खेळला जातो.फुटबॉलच्या गेममध्ये एक स्ट्रायकर असतो ज्याचे काम हे गोल करणे असतं. विरुद्ध संघातील जे खेळाडू समोरच्याल गोल करण्यापासून रोखतात त्यांना डिफेंडर्स म्हणतात.

जो खेळाडू विरोधी संघाकडून चेंडू पायाने खेचून घेतो आणि आपल्या सह खेळाडूंना चेंडू पास करतो त्यांना मिडफिल्डर्स म्हणतातगोलकीपरचे काम हे गोल होण्यापासून रोखणे असतं.हे काम गोल पोस्टसमोर उभे राहून करावे लागते.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment