फ्राईड राईस रेसिपी मराठी Fried Rice Recipe in Marathi

फ्राईड राईस रेसिपी मराठी Fried Rice Recipe in Marathi सला तरी तो भारतामध्ये सर्वत्र दिसतो.  हॉटेल रेस्टॉरंट सारख्या ठिकाणी तर टेस्टी व चवदार असा फ्राईड राईस मिळतो.  तसेच फ्राईड राईस खाणाऱ्यांची संख्या देखील भरपूर आहे.  बऱ्याच लोकांची लोकप्रिय रेसिपी आहे.  परंतु आपल्याला जर फ्राईड राईस ही रेसिपी आपल्या घरच्या घरी बनवायची असेल तर आपण ते अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने व हॉटेल, रेस्टॉरंट सारखीच चविष्ट अशी रेसिपी बनवू शकतो.  तर चला मग जाणून घेऊया ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारी साहित्य व पाककृती.

Fried Rice

फ्राईड राईस रेसिपी मराठी Fried Rice Recipe in Marathi

रेसिपी प्रकार   :

फ्राईड राईस रेसिपी चायनीज रेसिपी आहे.  ही रेसिपी बनवण्याच्या विविध पद्धती आहे.  आपण भातापासून वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो.  जसे  जीरा राईस, मटन बिर्याणी, मसाले भात,  नारळी भात अशा प्रकारचे बनवू शकतो.  परंतु फ्राईड राईस रेसिपी त्यापेक्षा थोडी वेगळी आहे.  फ्राईड राईस रेसिपीमध्ये व्हेज फ्राईड राईस, शेजवान फ्राईड राईस,

एग्ज फ्राईड राईस आणि चिकन फ्राईड राईस अशा विविध पद्धतीने बनवला जातो तर चला मग जाणून घेऊया फ्राईड राईस रेसिपी कशी बनवायची.

ही रेसिपी किती व्यक्ती करता आहे?

ही रेसिपी आपण 4 व्यक्तींकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करता लागणारा वेळ :

फ्राईड राईस च्या पूर्ण तयारी करता 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम  :

फ्राईड राईस कुकिंग करण्याकरता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

फ्राईड राईस रेसिपी पूर्ण करण्याकरता आपल्याला एकूण 35 मिनिटे एवढा वेळ लागतो.

फ्राईड राईस रेसिपी बनवण्याकरता लागणारे साहित्य :

1) एक वाटी बासमती तांदूळ

2) 2 ढोबळी मिरची बारीक चिरलेली

3) एक वाटी चिरलेली कोबी

4) पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात

5) अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर

6)  आलं लसूण पेस्ट 2 चमचे

7) दोन बारीक चिरलेल्या मिरच्या

8) एक चमचा व्हिनेगर

9) दोन चमचे सोया सॉस

10) दोन चमचे तेल

11) पाव चमचा काळीमिरी पावडर

12) मीठ गरजेनुसार.

पाककृती  :

 • झुणका रेसिपी मराठी
 • सर्वप्रथम आपल्याला मिरची, कांदा बारीक कापून घ्यायचा आहे.
 • एक मध्यम आकाराची कढई घ्या.  ज्यामध्ये आपण घेतलेले तांदूळ बसतील एवढी कढई घ्यायची आहे.  आता त्यामध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवा.
 • ते मध्यम आचेवर गरम करून घ्या.  नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरच्या, आले लसूण पेस्ट टाका.  हे सर्व व्यवस्थित भाजून घ्या.  हे मिश्रण जळता कामा नये.
 • आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोबी, बारीक चिरलेला गाजर टाकून ते चांगले परतून घ्या.  त्या सर्वांमधील कच्चेपणा निघून गेला पाहिजे एवढे परतून घ्यायचे आहे.
 • नंतर त्यामध्ये दोन चमचे सोया सॉस, पाव चमचा काळीमिरी पावडर व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण चांगले एकत्रित करून घ्या.
 • नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या.  व थोडा वेळ भिजवून घ्या.  नंतर एका भांड्यात 5 कप पाणी घालून एक चमचा तेल व अर्धा चमचा मीठ घालून घ्या.
 • हे पाणी गरम झाले की,  त्यामध्ये तांदूळ टाका व ते व्यवस्थित हलवून घ्या.
 • हे पाणी  गरम झाले की, त्यामध्ये तांदूळ पूर्ण शिजवून घ्या.  ते पाणी गाळून तांदूळ एकत्र करा शिजलेल्या तांदळाला एकदा थंड पाण्याने पुन्हा धुवून घ्या.  म्हणजे ते तांदूळ एकमेकांना चिटकणार नाहीत.
 • आता हे तांदूळ आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये घाला व सर्व मिश्रण एकत्रित करा.  थोडा वेळ गॅसवर परतून घ्या.  आपण व्हेज मंचुरियन करण्यासाठी जशी ग्रेव्ही करतो, त्याचप्रमाणे ही रेसिपी आहे.
 • अशाप्रकारे गरमागरम फ्राईड राईस रेसिपी तयार आहे.  आता एका डिशमध्ये काढून तुम्ही त्यावर कोथिंबीर घालून टोमॅटो सॉस सहित सर्व्ह करू शकता.

पोषक घटक  :

फ्राईड राईस ही रेसिपी खाण्यासाठी पौष्टिक आहे.  त्यामध्ये विविध भाज्यांचा उपयोग केलेला असून  तांदळामधील प्रोटीन, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके,  कॅल्शियम, लोह, कॅलरीज व तंतुमय पदार्थ असतात.  जे पचण्यासाठी हलके असतात.

फायदे  :

राईस खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.  कारण त्यामध्ये चरबी आणि फॅटचे प्रमाण खूपच कमी प्रमाणात असते, तसेच नैसर्गिक स्वरूपातील साखर देखील कमी प्रमाणात असते.  त्यामुळे शरीरात इन्सुलिनचा स्त्राव संतुलित राहतो.

फ्राईड राईस खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते.  पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे फ्राईड राईस खाणे आरोग्यासाठी देखील चांगले आहे.

तांदुळामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते.  यामुळे पोषक घटकांमुळे शरीराचे वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

तोटे   :

राईस खाल्ल्यामुळे शरीराला कोणतेही अपाय होत नाहीत.  परंतु त्याचे प्रमाण निश्चित करावे लागते आपण जास्त प्रमाणात तांदूळ खाल्ला तर त्यापासून आपल्या शरीराला जास्त विटामिन्स मिळत नाही.

राईस खात असताना त्यासोबत डाळ राईस किंवा इतर भाजी सोबतच तो खायला पाहिजे.

फ्राईड राईसमध्ये आपण सॉसचा उपयोग केलेला आहे.  त्यामुळे सॉस जास्त खाणे हानिकारक आहे मर्यादितच ही रेसिपी खायला पाहिजे.

तर मित्रांनो, फ्राईड राईस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment