गंगा नदीची संपूर्ण माहिती Ganga River Information In Marathi

Ganga River Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आज आपण भारतातील सर्वात लांब असणारी गंगा नदी ची माहिती पाहणार आहोत. भारत देशातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नद्यांपैकी एक नदी म्हणजे गंगा नदी !!! गंगा नदी ही एक पूर्ववाहिनी नदी असून  गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत.

Ganga River Information In Marathi

गंगा नदीची संपूर्ण माहिती Ganga River Information In Marathi

भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते . अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात. गंगा नदी भारतात उगम पावून समोर बांगलादेश मध्ये सुद्धा वाहत जाते तेथे तिला पद्मा नावाने संबोधले जाते.

गंगा नदी ही नदी उत्तराखंडमध्ये उगम पावते पुढे उत्तर प्रदेश ,बिहार, पश्‍चिम बंगाल आणि शेवटी बांगलादेशात प्रवेश करून बंगालच्या उपसागरास मिळते. तेथे सुंदर्बन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदर बनात बरेच दुर्मिळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.

गंगा नदीची मुख्य शाखा भागीरथी आहे, ही गढवाल मधील हिमालयातील गौमुख नावाच्या ठिकाणी गंगोत्री हिमनदी (गुरुकुल) पासून उगम पावते. या गंगेच्या उगमस्थानाची-गौमुखाची उंची समुद्रसपाटीपासून ३१४० मीटर आहे. येथे गंगेचे मंदिर आहे. शहराच्या उत्तरेस १९ कि.मी. उंचीवर गंगोत्री तीर्थ हा हिमनदीचा उगम ३८९२ मी. उंचीवर आहे.

हा हिमनग २५ किमी लांब, ४ किमी रुंद आणि सुमारे ४० मीटर उंच आहे. या हिमनदीतून भागीरथी छोट्या लेण्यासारख्या मुखातून अवतरते. या पाण्याचा स्रोत ५००० मीटर उंचीवर वसलेले खोरे आहे.

या खोऱ्याचे मूळ पश्चिम उतारातील संतोपंत शिखरावर आहे. गौमुखकडे जाणाऱ्या मार्गावर, चिरबासा गावातून ३७०० मीटर उंच विशाल गौमुख हिमनदीचे दृश्य दिसते. या हिमनदीत नंदा देवी, कामत पर्वत आणि त्रिशूल पर्वत येथील हिम वितळतो.

गंगा नदी चे ऐतिहासिक महत्व

गंगा नदीला हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते. तिची देवी म्हणून पूजन केले जाते. असे म्हणले जाते की भागिरथ राजाने अथक प्रयत्नाने गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले. प्राचीन काळापासून वेद व पुराणांमध्ये तसेच रामायण व महाभारतात देखील गंगा नदीचा उल्लेख आहे.

गंगा नदी जेव्हा स्वर्गातून पृथ्वीवर आली तेव्हा ती सरळ पृथ्वीवर न येता ती महादेवाच्या जटांमध्ये विराजमान झाली व तेथून पृथ्वीवर वाहत आली. गंगेत आंघोळ केल्यामुळे सर्व पापे नाहीसे होतात अशी लोकांची श्रद्धा आहे.

भौगोलिक महत्त्व गंगा नदी व तिच्या उपनद्या मुळे 11 राज्‍यांमध्‍ये नदीचे खोरे निर्माण झाले आहे या खोऱ्यात मुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे तसेच सिंचनासाठी देखील या पाण्याचा वापर केला जातो व व मासेमारीमुळे काही लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे गंगेचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग केला जातो गंगा नदीवर पाच मोठे जलविद्युत प्रकल्प उदाहरणे उभारलेले आहेत.

यमुना जल विद्युत प्रकल्प (हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड)

चंबळ जल विद्युत प्रकल्प (मध्य प्रदेश आणि राजस्थान)

राजघाट जल विद्युत प्रकल्प

मातातीला जल विद्युत प्रकल्प

रीहंद जल विद्युत प्रकल्प

ज्या मुळे मोठ्या प्रमाणावर विजेची निर्मिती केली जाते. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होऊन जवळपासच्या गावांना व शहरांना वीज पुरविल्या जाते.

गंगा नदीची लांबी व क्षेत्रफळ

या नदीचे जलसंधारण क्षेत्र अत्यंत विस्तृत म्हणजे 8,61,404 चौरस किलोमीटर असून तीने भारताचा एक चतुर्थांश भाग व्यापला आहे गंगा नदीची लांबी 2,510 किलोमीटर आहे.

गंगा नदीच्या उपनद्या दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या ए

१)यमुना नदी :-

ही गंगेची सर्वात लांब व महत्त्वाची उपनदी असून हिचे जले संग्राहक क्षेत्र सुमारे 3,66,223 चौरस किलोमीटर असून भारतात दुसरा क्रमांक आहे.गढवाल(उत्तराखंड) येथे बंदरपुंच शिखरावर समुद्रसपाटीपासून 6330 मीटर उंचीवर यमुनोत्री या हिमनदी तून उगम पावते व तिला तोस ही उत्तरेकडुन येणारी नदी मिळते.

कालसी गावाच्या पुढे ती डुन  खोऱ्यातून वाहते .उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात फैजाबाद या गावाजवळ ती मैदानी प्रदेशात प्रवेश करते. कधीकधी या भागात तिची रुंदी बरीच वाढलेली दिसते. यानंतर मुजफ्फराबाद ,दिल्ली व मथुरा या शहरांतुन वाहते व पुढे अलाहाबाद शहरा जवळ गंगेस मिळते.

२) सोन नदी:-

या नदीची लांबी 784 किलोमीटर असून अमरकंटक च्या उंच भागात (समुद्रसपाटीपासून जवळपास 600 मीटर) उगम पावते. तिचा उगम नर्मदा नदीच्या उगमाजवळ आहे. उगमापासून काही अंतर गेल्यावर ती अमरकंटक च्या पठारावरून खाली उतरते व बिलासपुर आणि रेवा जिल्ह्यातून वाहते.

उत्तर प्रदेशातील मिर्जापुर जिल्ह्यातून वाहत असताना तिने रुंद व खोल दरी तयार केलेली आहे .काही ठिकाणी तिची दरी घळीच्या स्वरूपात आढळते. बिहार राज्यात आल्यावर दिनाजपुर शहराच्या उत्तरेस 48 किलो मीटर अंतरावर गंगेला मिळते.

३) दामोदर नदी:-

या नदीची लांबी 541 किलोमीटर असून तिचे जलसंधारण क्षेत्र 25,820 चौरस किलोमीटर इतके आहे. ही गंगा नदीच्या हुगळी शाखेची उपनदी आहे.

झारखंड राज्याच्या दक्षिण भागात छोटा नागपूर पठारावरून दोन प्रवाहाच्या स्वरूपात तिचा उगम होतो आणि पालमू आणि पालमाऊ जिल्ह्यातील तोरी  परगण्यात दक्षिणेकडील प्रवाह हजारीबाग च्या वायव्येस उत्तरेकडील प्रवाह उगम पावतो.

या पैकी दक्षिणेकडील प्रवाह अगदी महत्वाचा आहे. सुमारे 42 किलोमीटर अंतर गेल्यावर हजारीबाग जवळ या हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात हा संयुक्त प्रवाह दामोदर या नावाने ओळखला जातो.

उत्तरेकडून येणारे उपनद्या:

राम गंगा नदी :

या नदीचा उगम गढवाल जिल्ह्यातील हिमालयातील बर्फाच्छादित प्रदेशात थोड्या दक्षिणेस समुद्रसपाटीपासून सुमारे तीन 3110 मीटर उंचीवर होतो. सुरवातीचा 144 किमी लांबीचा प्रवाहमार्ग गढवाल व कुमाऊ प्रदेशात असून येथे नदीच्या प्रवाह मार्गात अनेक धावत्या आहेत. बिजनोर जिल्हा कालघर येथे ही नदी मैदानी प्रदेशात प्रवेशते. तिथे तिच्या पात्राचा विस्तार झालेला आहे. रामगंगा नदीच्या प्रवाह मार्गाची लांबी 596 किमी इतकी आहे.

गोमती नदी:

उत्तर प्रदेशांत उत्तरेकडे पिलिभित शहराच्या पूर्वेस 32 किमी अंतरावर या नदीचा उगम होतो. या नदीच्या सुरुवातीचा 20 किमी लांबीचा प्रवाह फारच लहान असून कोरडा पडतो; परंतु गइहाई नावाची एक लहानशी उपनदी येऊन मिळाल्यावर हा प्रवास बराचसा रुंद होतो.

पुढे तिला जोकनाई नदी येऊन मिळते. गोमतीचा प्रवाह वर्षभर वाहतो. यानंतरच्या भागात नदी वळणे घेत घेत वाहते. 800 किमी लांबीनन्तर ही नदी गाझिपूर जिल्ह्यातील सेदपूर गावाजवळ गंगा नदीला येऊन मिळते.

घागरा नदी:

तिबेटमध्ये मानसरोवरच्या दक्षिण गुर्ला मंधाता शिखराजवल उगम पावणारी ही नदी नेपाळमधून भारतात प्रवेश करते. पश्चिम नेपाळमध्ये ही ‘कर्नाली’ या नावाने ओळखली जाते. सारद्द, राप्ती व सारजू नदी या घागरा नदीच्या प्रमुख उपनदया होत.

घागरा नदीच्या प्रवाहमार्गाची लांबी 1080 किमी इतकी आहे अयोध्या शहराजवळून ती गोरखपूर जिल्ह्यत येते; नंतर बिहारच्या सिमेजवळ छाप्रा येथे नदी ती गंगा नदीला येऊन मिळते.

अयोध्या प्रदेशातील ही सर्वात मोठी नदी असून तिच्यापासून काही प्रमाणात दळण वळणं ही चालते. घागरा नदिसच शरयू नदी म्हणून ही ओळखले जाते.

गंडक नदी:

ही नदी नेपाळ हिमालयात उगम पावते व नैऋत्य दिशीने वाहत भारतात येते. तिच्यामुळे उत्तर प्रदेश व बिहार राज्यांच्या सीमा तयार झाल्या आहेत. हाजीपुर (बिहार) येथे ती गंगेला येऊन मिलते.

या नदीचा उगम 7620 मिटर उंचीवर बर्फाच्छादित शिखरातून होत असल्यामुळे ती बारमाही वाहणारी तर आहेच परंतु तिला वारंवार पुरही येतात. या नदीची भारतातील एकूण लांबी 425 किमी इतकी आहे.

कोसी नदी:

हीचा उगम पूर्व नेपाळमध्ये सप्त कौशिक प्रदेशात होतो. सात वेगवेगळ्या प्रवाहापासून या नदीचा उगम झाल्यामुळे तिला ‘सप्तकोशीकी’ असेही म्हणतात. हीचा सुरवातीचा 96 किमी लांबीचा प्रवाहमार्ग नैऋतु दिशेने , तर नंतरचा 256 किमी लांबीचा प्रवाह मार्ग आगनेया दिशेने आहे. छत्र शहराजवळ गेल्यावर ती डोंगराळ भाग सोडते व काही अंतर प्रवास करून भागलपूर जिल्यात प्रवेशते. येथे तिचे पात्र बरेच रुंद झाले आहे.

बिहार राज्यात 134 किमी अंतर वाहत गेल्यावर ती पुरनिया जिल्ह्यत गंगा नदीला मिळते. वेगवान प्रवाह, वारंवार बदलेले जाणारे पात्र आणि मोठेमोठे पूर यामुले कोसी नदी बिहारचे दुःखाश्रु म्हणून कुप्रसिद्ध आहे.

गंगा नदीच्या काठावर वसलेली शहरे

भारतातील कनोज, कलकत्ता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटलीपुत्र (पाटणा), प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.

ज्या गंगानदीला आपण पवित्र मानतो व जी ची आपण देवता म्हणून पूजा करतो आज त्या गंगा नदीचे पावित्र्य आज धोक्यात आहे. त्याचे कारण असे कि आज गंगेचे खूप जास्त प्रमाणावर प्रदूषण होत आहे. नदीत टाकले जाणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी, औद्योगिक कचरा, शेतीचा वाहून जाणारा भाग, अंत्यसंस्कारातून अर्धवट जळालेले किंवा न जळलेल्या मृतदेहांचे अवशेष आणि प्राण्यांचे शव हे सर्व गंगा प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरतात. रोगास कारणीभूत ठरणारे जीवाणू आणि विषारी पदार्थांचे प्रमाणही गंगेत आढळून आले आहे.

ते कमी करण्यासाठी सरकारने ठोक पाऊले सुद्धा उचलेली आहेत.त्यापैकी एक म्हणजे ‘नमामि गंगे योजना’. या योजने अंतर्गत केंद्र सरकारने एका विशेष रक्कमेचे नियोजन नदीच्या सफाई करिता केले आहे.

डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगेतिल डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत. गंगा नदीमधील विरघळलेला प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहो त्यामुळे जलचर धोक्यात आले आहेत. नदीतील पाण्यातील वाढते प्रदूषण त्याचे मुख्य कारण आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment