गौतम बुद्ध यांची संपूर्ण माहिती Gautam Buddha Information In Marathi

Gautam Buddha Information In Marathi गौतम बुद्ध हे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आहे. तसेच ते भारतीय तत्त्वज्ञानी, अध्यात्मिक शिक्षक व समाज सुधारक सुद्धा होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्यांना कोणी गौतम बुद्ध, शाक्यमुनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम तर सम्यक समास बुद्ध असे नावाने त्यांना ओळखले जाते. बुद्ध या नावातच ज्ञान लपलेले आहे कारण बुद्ध म्हणजे ज्ञानाची उपाधी बुद्ध या शब्दाचा अर्थ आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवले आहे.

Gautam Buddha Information In Marathi

गौतम बुद्ध यांची संपूर्ण माहिती Gautam Buddha Information In Marathi

जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये गौतम बुद्ध हे श्रेष्ठ मानले जातात. बुद्धाच्या धम्माला बौद्ध धर्म किंवा बुद्धिझम असे सुद्धा म्हटले जाते. त्यांच्या बुद्धांचा अनुयायांमध्ये दोन भाग पडतात. एक म्हणजे बौद्ध भिक्खूंचा आणि दुसरा म्हणजे बौद्ध उपासक उपासिकांचा बौद्ध धर्माच्या अनुयायांना बौद्ध किंवा बुद्धिस्ट असे म्हणतात.

सर्व खंडांमध्ये देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत तसेच आशिया खंडात बौद्ध धर्म हा एक महत्त्वाचा धर्म आहे व आशिया खंडाची जवळपास 49 टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या 180 कोटी ते 210 कोटी एवढी आहे. गौतम बुद्धांनी समाजातील लोकांना ज्ञान व सुखाचे मार्ग सांगितले आहे.

गौतम बुद्ध यांचा जन्म व बालपण :

गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सनपूर्व 563 मध्ये मध्ये नेपाळमधील लूनबिनी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हे शुद्धोधनअसे होते तर त्यांच्या आईचे नाव माया देवी होती. त्यांचा जन्म हा शक्य वनांच्या कुटुंबात झाला होता. हे कुटुंब भारतामधील होते, त्यांच्या लहानपणी त्यांना सिद्धार्थ नावाने ओळखले जात होते. तसेच कपिल वस्तू राज्यांमध्ये त्यांचे वडील शाक्य वंशाचे एक राजा होते.

त्यांची आई ही शेजारील असलेल्या राज्य म्हणजे कोशल राज्याची एक राजकुमारी होती. त्यांची आई राणी होती. तिचे नाव महामाया असे होते. तिने सिद्धार्थ या बाळाला जन्म दिल्यानंतर सात दिवस झाले तसेच तिचा मृत्यू झाला. त्यांच्या आईची छोटी बहीण महाप्रजापती गौतमी यांनी गौतम बुद्धाचा सांभाळ केला.

गौतम बुद्ध यांची वैयक्तिक जीवन :

गौतम बुद्ध हे सुरुवातीपासून दयाळू स्वरूपाची व्यक्ती होते तसेच त्यांचे मन त्यांच्या वडिलांनी शिक्षणात घातले तसेच त्यांनी विश्व मित्रांकडून शिक्षण घेतले. गौतम बुद्धांना वेद, उपनिषदांसह त्यांनी युद्ध कौशल्यात सुद्धा पारंगत केले. सिद्धार्थ नाव असलेले गौतम बुद्ध लहानपणापासूनच घोडेस्वारी करत होते.

त्यांना धनुष्यबाण आणि रथाचा वापर करणाऱ्या सारथीमध्ये सुद्धा त्यांची कोणीही स्पर्धा करू शकत नव्हते. त्यांच्या वडिलांनी सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह यशोधराशी करुन दिला व त्यांची मनगृहस्थाश्रमामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या करिता सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्या दोघांना एक मुलगा झाला ज्याचे नाव राहुल ठेवले होते यशोधरा आणि राहुल दोघेही पुढे बुद्ध शिष्य बनले.

गौतम बुद्ध यांची जीवन कथा :

गौतम बुद्धांचा जन्म झाला तेव्हा एका ऋषीने त्यांचे भविष्य सांगितले होते. त्यांनी म्हटले होते, एक तर हा मुलगा चक्रवर्ती व पराक्रमी सम्राट होईल किंवा महानयोगी व विरक्त स्वभावाचा होईल त्यामुळे राजाच्या घरी जन्माला आल्यामुळे वैभवशाली आयुष्य लाभलेला सिद्धार्थ सुखामध्ये लहानचा मोठा होत. मातेचे छत्र हरवले, त्यानंतर त्याचे पालन पोषण त्याच्या मावशीने स्वतःच्या पोराप्रमाणे केले.

त्यांना आवश्यक ते ज्ञान सुद्धा त्यांना देण्यात आले. वडील शुध्दोधन यांनी सिद्धार्थला चक्रवर्ती राजाच बनविण्याचा असे ठरवले होते. त्यांना धन्य दुखतात त्रास वेदना यांचा सिद्धार्थला वारा सुद्धा लागू नये त्यामुळे धार्मिक व आध्यात्मिक विचार वैराग्य यापासून त्यांना दूर ठेवले गेले लहानपणापासूनच सिद्धार्थला आवलौकिक अशी बुद्धिमत्ता प्राप्त झाली होती तो गंभीर चिंतनशील वृत्तीचा असल्यामुळे त्यांच्या बालपणी ध्यान धरण्याची धारणा त्यांच्यामध्ये निर्माण झाली.

एके दिवशी गावातून फेरफटका मारण्यासाठी ते रथातून निघाले असताना, त्यावेळी त्यांना ज्या गोष्टींपासून त्यांना दूर ठेवण्यात आले होते तेच त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांच्या मनाला ती दृश्य पहायला मिळाल्यामुळे त्यांच्या मनावर त्याचा खूप परिणाम झाला.

रोगाने पछाडलेला जीर्ण शरीराचा रुग्ण तसेच अर्ध वाक्याने वाकलेला असा एक म्हातारा एक प्रेत यात्रा त्यांना रस्त्यावर दिसली. घरभरून उरलेले दारिद्र्य त्यांनी पाहिले या सगळ्या गोष्टी पाहून ते सुन्न झाले तसेच आपले सुख अपवाद आहे आणि त्यांना कळाले की, जग हे दुःखामध्ये बुडून गेले आहेत. त्यांना सुख आणि दुःख काय आहे हे कळले पाहिजे?

गौतम बुद्ध यांनी एका संन्याशी माणसाला जाताना पाहले. त्यावेळी त्यांचे मन कशातच रमेनासे झाले त्यांना कळून चुकले की, सगळ्यांपासून सुटका मिळवायची असेल तर आपल्याला संसाराचा त्याग करायला पाहिजे तसेच संन्याशी हाच सर्वोत्तम मार्ग आहे. त्यांनी त्यांच्या ऐन तारुण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजेच जेव्हा ते 29 वर्षाचे होते, तेव्हा त्यांची पत्नी यशोधरा व त्यांचा प्रिय पुत्र राहुल या दोघांनाही शेवटचे भेटून ते राजवाड्यातून बाहेर पडले.

गौतम बुद्धांची तपश्चर्या व ज्ञानप्राप्ती :

गौतम बुद्ध यांनी सर्व राजवैभव पत्नी मुलांचा त्याग करून ते मानवतेच्या कल्याणासाठी जगभर फिरत राहिले तसेच त्यांनी सुखाचा परिपूर्ण त्याग केला, ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी चिंतन केले, कठोर तपश्चर्या या केली. ज्ञानाच्या शोधात त्यांनी दोन गुरूंचे शिष्यत्व सुद्धा पत्करले होते. दोघांनीही आपला वारसा चालवण्यासाठी गौतम बुद्ध यांनाच निवडले होते; परंतु जगाच्या उद्धारासाठी सिद्धार्थाने त्यांना मात्र नकार दिला होता.

बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठीत ते पिंपळाच्या झाडाखाली अखंड 49 वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली. याच वृक्षाला बोधी वृक्ष म्हणून सुद्धा ओळखले जाते. ध्यानप्राप्तीनंतर सर्वजण सिद्धार्थला बुद्ध या नावाने ओळखू लागले. बुद्ध विज्ञानाची उपाधी असून बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञान असणारा मनुष्य असा त्याचा अर्थ होतो.

बुद्धांनी दिलेल्या सारणात येथील पहिल्या प्रवचनाला धम्मचक्र परिवर्तक किंवा धम्मचकपवत्तन असे म्हणतात. त्यामध्ये गौतम बुद्धांनी महत्त्वाची तीन मूलभूत तत्वे सांगितले आहे. मनुष्य प्राणी दुःख धन्य दारिद्र्य यामध्ये भरडला जातो. हे सर्व दुःख नाहीसे करणे हाच धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग हा गौतम बुद्ध यांनी रचलेल्या धम्माचा पाया आहे असे मानले जाते.

बौद्ध धर्माची शिकवण :

गौतम बुद्ध यांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगातील दुःख दूर करण्याचे महत्त्वाचे शिकवण दिली आहे. त्यांनी पाली भाषेमध्ये लोकांना अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने बुद्ध धर्माची शिकवण आचरण सांगितले आहेत. त्यांची शिकवण व आचरण यासाठी त्यांनी चार आर्यसत्य, अष्टांग मार्ग आणि पंचशील तत्त्वे सांगितले आहे.

गौतम बुद्धांचे परिनिर्वाण :

गौतम बुद्धांनी त्यांच्या वयाच्या 80 व्या वर्षी निर्माण घोषित केले होते. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगून समाधी घेतली तसेच त्यांच्या अनुयायांनी पुढे बौद्ध धर्माचा प्रसार केला तसेच त्यांच्या शिष्यांनी त्यांनी सांगितलेल्या आचरणाप्रमाणे तसेच त्यांची शिकवण हीच सामान्य जनमानसांपर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न केले. भारताशिवाय त्यांनी चीन, थायलंड, जपान, मंगोलिया, ब्रह्मदेश इत्यादी देशांमध्ये प्रसार केला.

FAQ

गौतम बुद्ध यांचा जन्म कधी झाला?

गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 ला झाला.

गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माचा कोणता ग्रंथ लिहिला?

बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ त्रिपीटक लिहिला.

बुद्ध या शब्दाचा अर्थ काय आहे?

बुद्ध म्हणजे आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी.

गौतम बुद्धाचे खरे नाव काय होते?

सिद्धार्थ.

गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते?

महामाया.

Leave a Comment