मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारे गोरगरीब कुटुंबांसाठी घरकुल योजना लागू करत आहेत, ज्यामध्ये त्यांना स्वतःचे पक्के घर असावे यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा उद्देश गरीब आणि वंचित नागरिकांना घर उपलब्ध करणे आहे. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जात आहे. चला 2025 मध्ये घरकुल योजना कशी कार्यरत आहे, कागदपत्रे, अनुदान, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल अधिक जाणून घेऊ.
घरकुल योजना – आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) राशन कार्ड
3) ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र
4) जॉब कार्ड
5) बॅंक पासबुक
6) उत्पन्न प्रमाणपत्र
7) पासपोर्ट साइज फोटो
तुम्हाला आणखी काही कागदपत्रांची मागणी होऊ शकते, जी स्थानिक ग्रामपंचायती किंवा संबंधित कार्यालयातून सूचना दिली जातील.
घरकुल योजनेत 2025 मध्ये किती अनुदान मिळते?
2025 मध्ये घरकुल योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण 1,20,000 रुपये अनुदान दिले जात आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे, परंतु याबाबत सध्यातरी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा?
घरकुल योजनेसाठी अर्ज दोन पद्धतींनी करता येऊ शकतो.
1) ऑफलाईन अर्ज – तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये प्रत्यक्ष जाऊन अर्ज दाखल करू शकता.
ग्रामपंचायत अर्ज स्वीकारत नसेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देखील आहे.
2)ऑनलाईन अर्ज – घरकुल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वापरू शकता.https://pmaymis.gov.in/
घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहे?
घरकुल योजनेचा लाभ घेताना काही पात्रतेचे निकष ठेवले गेले आहेत. त्यानुसार, निवडले गेलेले लाभार्थी कुटुंबे गरीब आणि निम्नवर्गीय असावे लागतात. याव्यतिरिक्त, त्यांच्या कुटुंबाला पक्के घर नसावे आणि त्यांना शासकीय योजना किंवा अनुदानाचा लाभ न मिळालेला असावा.