गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती Gudipadwa Festival Information In Marathi

Gudipadwa Festival Information In Marathi गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मामध्ये पूजा विधी नुसार पाळला जातो. हा चैत्र महिन्यामध्ये येत असतो तसेच सनातन धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वाचा हा सण आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडव्याचा हा सण मोठ्या उत्साहाने लोक साजरा करतात. मराठी समाजासाठी गुढीपाडवा हा एक अनन्यसाधारण महत्त्व देणारा सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या आनंदामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा विशिष्ट महत्त्व देऊन जातो.

Gudipadwa Festival Information In Marathi

गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती Gudipadwa Festival Information In Marathi

गुढीपाडवा या विषयी माहिती :

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो, यामध्ये गुढी म्हणजे हा एक प्रकारचा विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथे म्हणजेच गुढीपाडवा असा सण होतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरामध्ये विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते.

त्या गुढीला सर्वप्रथम सजवले जाते आणि ती दारावर किंवा आपल्या घराच्यावर लावली जाते. हा उत्सव सर्वच घरामध्ये मोठ्या उत्साहाने केल्या जाते. या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभाराने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रू वर विजय मिळवला होता, त्यामुळे या दिवशी शालिवाहन दिवस सुद्धा सुरू होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजी यांनी विश्वाची निर्मिती सुद्धा केली होती अशी एक अख्यायिका सुद्धा आहे. या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचे सुद्धा मानले जाते. अनेक पौराणिक कथांमध्ये याचा उल्लेख आहे की, गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीरामने बलीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशती पासून व त्रासापासून मुक्त केले, त्यामुळे तेथील लोक आनंदाने राहू लागले व घरोघरी विजयाचा झेंडा फडकवला यालाच गुढी या नावाने ओळखली जाते.

तसेच हा सण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्ती प्रगट झाल्यामुळे या दिवशी गणित तज्ञ भास्कराचार्य यांनी तिथे वार नक्षत्र योग आणि करण यांच्या आधारे पंचांग असल्याचे सांगितले जाते.

गुढीपाडवा या सणाचे महत्त्व :

गुढीपाडवा या सणाला सांस्कृतिक तसेच नैसर्गिक दृष्ट्या बरेच महत्त्व आपल्याला दिसते. हा सण चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुच्या आगमनाला सुद्धा सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो तेव्हा येतो. जुनी वाळलेली पाने गळून पडतात व झाडांना नवी पालवी फुटते तसेच आंब्याला मोहर येतो.

या नैसर्गिक बदलांचे स्वागत करण्याची एक पद्धत म्हणून हा सण साजरा केला जातो. गुढीला सजवण्यासाठी प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे. वातावरणामध्ये वाढलेल्या उन्हाचे झळ कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात. तर या दिवशी कडुलिंबाची पोळी पाने बऱ्याच ठिकाणी खाण्याची प्रथा सुद्धा आहे.

असे म्हणतात की, या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेतल्यास आपल्याला कोणतीही बिमारी होत नाही तसेच कडुलिंबाची कोवळी पाने, फुले चघळण्याची व भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध हा प्रसाद तयार केला जातो कारण होळी नंतर वातावरणामध्ये उष्णता वाढायला लागते व वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी पडश्यासारखे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राहण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करावी अशी ही प्रथा आहे.

सामाजिक महत्त्व :

गुढीपाडवा या दिवशी पाण्याने भरलेल्या घड्याचे दान करावे असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी आपण केलेले दान हे मंगलमय असते तसेच विविध ठिकाणी सकाळच्या वेळेला सांस्कृतिक मैफली उत्साहाने आयोजित कराव्यात. हा दिवस म्हणजे प्रतिसाद वाढवणारा असतो. नववर्ष पहाट गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष असतो.

या दिवशी हिंदू संस्कृतीची झलक आपल्याला पाहायला सुद्धा मिळते, बऱ्याच ठिकाणी मिरवणूक सुद्धा काढले जातात. या मिरवणुकीमध्ये पुरुष महिला लहान मुले हे पारंपारिक पोशाखांमध्ये मिरवणुकीत सहभागी झाल्याचे आपल्याला दिसते. भारतामध्ये वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ होतो व विविध रूढी असलेल्या महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाची सुरुवात होते.

गुढी कशी उभारावी?

गुढीपाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला सर्व घरातील मंडळी सकाळी लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरच्या प्रवेशद्वारे उंचावर गुढी उभारतात दाराला तोरणे लावतात. गुढी ही उभारताना एक उंच काठी बांबू पासून तयार केली जाते.

या काठीला स्वच्छ धुऊन घेतात, त्यानंतर त्या काठीच्या वरच्या भागाला एक रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळली जाते. काठीला कडूलिंबाची डहाडी आंब्याचे पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा हा पितळी किंवा चांदीचे गळू तसेच फुलपात्र सजवले जाते.

ज्या भागाला गुढी उभारायचे आहे, तिथली जागा स्वच्छ करून धुवून पुसून घेतात. त्यावर रांगोळी काढून पाठ ठेवून गुढीची काठी ठेवली जाते, तयार केलेली गुढी ही दारामध्ये उंच गच्चीवर गॅलरीमध्ये लावली जाते. गुढीची काठी नीट बांधून काठाला गंध, फुले, अक्षदा वाहतात तसेच गुढीची पूजा करतात. तसेच एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सुद्धा देतात.

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये गौतमी पुत्राची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिवस म्हणून हा साजरा केला जातो. तसेच तेथे पाडवा उगादी अशा नावांनी या सणाला ओळखले जाते; परंतु महाराष्ट्रामध्ये हा सण गुढीपाडवा म्हणूनच ओळखला जातो. सिंधी लोक या सणाला चेटीचंड या नावाने ओळखतात.

गुढीपाडवा पूजा विधि :

गुढी उभारल्यानंतर तिला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहून गुडीची पूजा केली जाते व ताटामध्ये दिवा, अगरबत्ती घेऊन तसेच दूध, साखर, पेढ्यांचा नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला गोड धोड पदार्थाचा नैवेद्य देतात व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून ही गुढी उतरवली राहिली जाते.

गुढीपाडवा हा सण कोठे साजरा केला जातो?

गुढीपाडवा हा सण विविध समुदायांमध्ये प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. म्हणजेच काठीपूजा हा उत्सव खूप प्राचीन आहे असे मानले जाते. भारतीय उपखंडात हा सण नेपाळ, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओरिसा या ठिकाणी साजरा केला जातो. नेपाळमध्ये तर मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. तसेच आसाममध्ये काही समुदाय हे वैशाख महिन्यात बास पूजा साजरी करतात.

FAQ

गुढीपाडवा हा सण कधी साजरा करतात?

चैत्र महिन्याच्या प्रतिपदा तिथीला

गुढी हे कशाचे प्रतीक आहे?

विजय ध्वज.

गुढी कधी उतरवतात?

संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गुढीची हळद, कुंकू, फुले वाहून पूजा केली जाते व नंतर गुढी उतरवण्याची प्रथा आहे.

गुढी कधी उभारली जाते?

गुडी पाडवा या सणाच्या दिवशी सकाळी मुहूर्तावर गुढी उभारतात.

गुढीपाडवा हा इतर राज्यात सुद्धा साजरा केला जातो का?

होय.

Leave a Comment