गुलाब जामुन रेसिपी मराठी Gulab Jamun Recipe In Marathi

Gulab Jamun Recipe In Marathi गुलाब जामुन हा एक गोड पदार्थ आहे. जो सर्वाचा आवडतो. भारतात तसेच इतर राज्यात गुलाब जामुन हा पदार्थ मिष्ठान म्हणून वापरला जातो. हा अतिशय गोड आणि शुध्द शाकाहारी पदार्थ आहे, जो दुधापासून तयार केलेल्या खव्या पासून बनवला जातो. आपण गुलाब जामुन दोन प्रकारे तयार करू शकतो, एक खवा आणि मैदा मिळून, व दुसरे दूध पावडर व मैदा मिळून. खव्या पासून तयार केलेले गुलाब जामुन एकदम स्वादिष्ट व नरम तयार होतात. हा एक लोकप्रीय पदार्थ मानला जातो.

Gulab Jamun Recipe In Marathi

गुलाब जामुन रेसिपी मराठी Gulab Jamun Recipe In Marathi

आपण हॉटेल किंवा बेकरीमध्ये एकदम स्वादिष्ट व गोड गुलाब जामुन खाल्ले असतील. काही लोकांना गुलाब जामुन खावसे वाटतात, पण त्यांना रेसिपी माहीत नाही. काही लोक बाहेर जाऊन खाऊ शकत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही एकदम सोप्या व सहज पद्धतीने हॉटेल सारखे गुलाब जामुन कसे तयार करावे यांची रेसिपी घेऊन आलो आहे. आता आपण गुलाब जामुन रेसिपी पाहणार आहोत.

गुलाब जामुनच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

गुलाब जामुन तयार करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. यासाठी लागणारे साहित्य एकत्र करावे लागते, यामुळे आपण लवकर रेसिपी तयार करू शकतो. पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

गुलाब जामुन आपल्याला कुकिंग करण्यासाठी 1 तास वेळ लागतो.

टोटल टाईम :

गुलाब जामुन रेसिपीसाठी आपल्याला पूर्वतयारी करणे महत्वाचे आहे. यासाठी आपल्याला 20 मिनिट लागतात. व कुकिंग करण्यासाठी 1 तास लागतो, असा टोटल टाईम आपल्याला एकूण 1 तास 20 मिनिट लागतो.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

गुलाब जामुन ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

गुलाब जामुनचे प्रकार :

गुलाब जामुन हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. जो भारतात वेग वेगळ्या प्रकारे बनवला जातो. काही लोक गुलाब जामुन हे मैदा आणि दूध पावडर मिळून बनवत, तर काही खवा वापरून बनवतात. यामध्ये गुलाब जामुन, कोरडे गुलाब जामुन, काळा जामुन, ब्रेड गुलाब जामुन असे अनेक प्रकार यामध्ये आढळून येतात. हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.

गुलाब जामुनसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 पाव खवा. किंवा दूध पावडर.
2) 1 पाव साखर.
3) 50 ग्रॅम मैदा.
4) 4 ते 5 इलायची.
5) तेल.
6) 1 चिमूट केसर.
7) थोडे तूप.

पाककृती :

 • सर्वात प्रथम एक मोठी प्लेट घ्या, त्यामध्ये खवा टाका, आणि व्यवस्थित मळून घ्या.
 • नंतर यामध्ये मैदा, 2 चम्मच तूप व थोडे दूध टाका, यामुळे गुलाब जामुन स्वादिष्ट तयार होतात.
 • नंतर यांचे पूर्ण मिश्रण करा, व मळून एकजीव असा नरम गोळा तयार करा, आणि 15 मिनिट व्यवस्थित झाकून बाजूला ठेऊन द्या.
 • यामुळे मैदा हा व्यवस्थित खव्यामध्ये मिक्स होतो. तो पर्यत आपण गुलाब जामुनसाठी लागणारा गोड पाक तयार करूया.
 • एक खोल तळाचे भांडे किंवा पॅन घ्या, त्यामध्ये 1 पाव साखर आणि एक ग्लास पाणी टाका. आणि गॅस चालू करून हे गॅस वरती ठेवा. साखर पूर्ण विरघळत नाही तो पर्यत ढवळत राहा.
 • नंतर यामध्ये इलायची पावडर टाका, आणि एक चिमूट केसर टाकून चांगले मिक्स करून घ्या.
 • पाकाचे थोडे तार तुटतील असा घट्ट पाक तयार करा. नंतर गॅस बंद करून पाक थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
 • आता आपण तयार केलेला खवा आणि मैद्याच्या गोळा घ्या, आणि त्याचे व्यवस्थित छोटे छोटे मध्यम गोळे तयार करा.
 • गोळे तयार करून झाले की, एक खोल तळाची कढई गॅसवर ठेवा. त्यात तेल टाका आणि गॅस चालू करा.
 • तेल पूर्ण गरम झालं की गॅस मध्यम आशेवरती ठेवा, आणि गोळे तेलात टाकताना. तेल अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी.
 • नंतर एक एक करून तयार केलेले गोळे तेलात तळून घ्या, जेवढे मावतील तेवढेच गोळे टाका.
 • गोळे पूर्ण लालसर आणि तपकीरी रंगाचे तयार होईपर्यत तळा, नंतर एका पेपरवरती काढा, म्हणजे शिल्लक तेल निघून जाईल.
 • अशा प्रकारे सर्व गोळे तळून घ्यावे, आणि थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवा.
 • आता हे गोळे थोडे थंड झाले की पाकात टाका, आणि एकदम हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करा.
 • नंतर 30 मिनिट बाजूला ठेऊन द्या. यामुळे हे गोळे व्यवस्थित पाक ओढतील आणि नरम तयार होतील.
 • 30 मिनिट नंतर गोळे थोडे फुगतील आणि एकदम स्वादिष्ट तयार होतील. नंतर आपण एक चम्मच व छोटी वाटी घेऊन त्यांना खाऊ शकतो.

गुलाब जामुनमध्ये असणारे घटक :

गुलाब जामुन हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. जो तूप आणि दुधापासून बनवलेल्या खव्यापासून बनवले जातात. यामध्ये विविध घटक असतात, जसे कॅलरी, कर्बोदके, प्रथिने, चरबी, संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल, सोडियम, पोटॅशियम, फायबर, शुगर, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, लोह असे अनेक घटक यामध्ये आहेत. जे मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे घटक आहेत.

फायदे :

गुलाब जामुन हा गोड पदार्थ असल्यामुळे सर्वाना आवडतो. यामध्ये शुगर जास्त प्रमाणात असते, जे आपला शरीरासाठी आवश्यक आहे.

यामध्ये प्रथिने, चरबी, संतृप्त चरबी, कोलेस्टेरॉल, सोडियम, पोटॅशियम, फायबर, शुगर, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, यासारखे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

गुलाब जामुन हा गोड पदार्थ असल्यामुळे यात जास्त प्रमाणात शुगर असते. आपण जर हे जास्त प्रमाणात सेवन केले तर आपल्याला मळ मळ व उलटी होऊ शकते.

यामध्ये विविध घटक आहेत, जे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात झाले तर, आपण आजारी पडू शकतो, व आपल्याला पोट दुखी होऊ शकते.

म्हणून हा पदार्थ आपण आवश्यक तेवढाच खाल्ला पाहिजे. यामुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही.

तर मित्रांनो, तुम्हाला गुलाब जामुन रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment