Gurupurnima Festival Information In Marathi प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गुरु असतो. सर्वांचा पहिला गुरु म्हणजे आपली आई असते. प्रत्येकाला जीवनाचा आधार म्हणून गुरुची गरज भासते. प्रत्येकाच्या जीवनात एक ना एक गुरु असतोच चांगल्या मार्गावर नेण्यासाठी तो धडपडत असतो. कोणाची आई वडील हेच त्यांचे गुरु असतात तर कोणाचे शिक्षक हेच त्यांचे गुरु असतात. कोणाचे कोच गुरु असतात तर कोणाचे मित्र सुद्धा गुरु असतात.
गुरुपौर्णिमा सणाची संपूर्ण माहिती Gurupurnima Festival Information In Marathi
हिंदू धर्मातील अनेक कथांमध्ये प्रत्येकाचे कोणी ना कोणी गुरु आहेत असे आपण वाचले असेल. महाभारतामध्ये सुद्धा द्रोणाचार्य बद्दल तुम्ही ऐकलेच असेल त्यांनी आपल्या गुरुसाठी आपला अंगठा दान केला होता. त्यामुळे गुरु शिष्य यांची उदाहरण आपल्या समोर आहे. प्रत्येकाच्या आयुष्याला जीवनाला आकार देण्यासाठी महत्त्वाचा असा एक व्यक्ती असतो.
तोच त्यांच्या आयुष्यातील गुरु असतो. आपण बऱ्याचदा ऐकले असेल गुरु विना कोण दाखवील वाट… त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये गुरु करावा आणि आपल्या गुरुजी मनोभावे सेवा करावी. तसेच गुरूंचे सेवा केल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून ज्ञान सुद्धा प्राप्त होते आणि हे ज्ञान अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात म्हणजेच त्यामध्ये आपण आई-वडील शिक्षक इतर जे आपल्याला ज्ञान संपादन करतात. ते सर्वच आपल्यासाठी गुरु असतात मग त्यामध्ये लहान असो किंवा मोठा तो त्याला गुरुचे पद देण्यास काही हरकत नाही.
उदाहरणार्थ चांगदेवाचे गुरु मुक्ताबाई ह्या होत्या. भारतात प्राचीन युगापासून गुरूला खूप महत्त्व दिले जाते. तसेच गुरुजी आज्ञा आणि त्यांची पूजा व मनोभावे सेवा सुद्धा केली जाते. गुरुचे आज्ञा शिष्य शेवटपर्यंत पाळतात. गुरु हा आपल्या अज्ञानाकडून ध्यानाकडे नेणारी व्यक्ती असतो. तो शिष्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो व त्याचे आयुष्य सुंदर बनवतो. गुरूंचा आदर, सत्कार तसेच त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा दिवस साजरा केला जातो.
गुरु पौर्णिमेचा इतिहास :
महर्षी व्यास हे एक भारतीय संस्कृतीचे मुलाधार आहेत. त्यांनी भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना करून ठेवले आहे. व्यासांनी वेदाचे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद हे एकच होते, त्यामुळे व्यास ऋषींनी त्याचे चार भागात विभाजन केले. व्यासांनी महाभारत लिहिले, जगातील सर्वश्रेष्ठ व अवलोकिक असा हा ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, व्यवहार शास्त्र आणि मानसशास्त्र आहे. त्यांचा येथील कथेशी जवळचा संबंध आहे.
महान ऋषी पराशर यांच्या सहवासात मत्स्यगंधेला पुत्रप्राप्ती झाली त्यांनाच आपण वेद व्यास ऋषी या नावाने ओळखतो. मत्स्यगंधा पुढे हसतानापुर राज्याची राजा शंतनू यांची पत्नी झाली. त्यांना आपण सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कुमारी अवस्थेत झालेला हा पुत्र म्हणजेच व्यास आहे.
गुरुपौर्णिमा हा दिवस व्यासपोर्णिमा म्हणून ओळखला जातो. या दिवशी व्यास ऋषीचा जन्म झाला होता. व्यास हे आपल्या प्राचीन भारतामधील एक प्रसिद्ध गुरु पैकी एक आहेत. त्यांनी महाभारताचे महाकाव्य रचले आहेत तसेच चार वेदांची म्हणजेच ऋग्वेद, सामवेत, यजुर्वेद व अथर्ववेद याची रचना केली तसेच हिंदूंच्या पुरणाची रचना त्यांनी केली आणि अशा प्रकारे त्यांनी भारताच्या अज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात भर पाडली म्हणून त्यांना एक प्रसिद्ध गुरु सुद्धा मानले जाते. त्यांच्या जन्मदिवसाच्या आठवण म्हणून गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमा हा सण का साजरा केला जातो?
गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागे एक विशेष कारण आहे. जी म्हणजे आपल्या जीवनातील गुरु त्यांच्या शिष्याला चांगले वाटचाल मदत करतात. त्यांचे ऋण किंवा कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा हा दिवस भारतामध्ये व्यासपौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखला जातो. या दिवशी व्यासांचा जन्म दिवस म्हणूनही साजरा केला करतात.
गुरु पौर्णिमा हा दिवस आषाढ महिन्यामध्ये येणारा शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी गुरुचे पूजन करून गुरूंना शुभेच्छा दिल्या जातात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचे शिष्याकडून पाय धुवून पूजा केली जाते. गुरूला फळ, फुल देऊन शिष्य त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. हा दिवस शाळेमध्ये वेगवेगळ्या संप्रदायामध्ये तसेच कॉलेजमध्ये व इतर क्षेत्रात सुद्धा साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमा हा दिवस हिंदू, जैन व बौद्ध धर्माच्या सोबतच भारतामध्ये अनेक लोक साजरा करत असतात तसेच हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. गुरुपौर्णिमा हा दिवस जणू काही शिष्याचा आणि गुरुच्या प्रेमाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी शिष्याकडून गुरुचे पूजन पूजा केली जाते. तरीसुद्धा शिष्य आपल्या गुरूंच्या सर्व आज्ञांचे पालन करतो गुरूंना काही भेट देत असतो.
गुरु शिष्याचे अनोखे उदाहरण :
गुरु आणि शिष्य यांचे एखादे उदाहरण आपल्याला द्यायचे म्हटले तर आपल्यासमोर द्रोणाचार्य आणि एकलव्य यांचे चित्र उभे राहते कारण आपण लहानपणी गुरु शिष्याची ही कथा ऐकली असेलच. ज्यावेळी गुरु द्रोणाचार्य पांडवांना धनुर्विद्या शिकवत होते, त्यावेळी एकलव्याने ही विद्या लांबून पाहिली आणि त्याचा सराव केला तेव्हा या कलेमध्ये तो अतिशय पारंगत झाला.
त्यावेळी त्याने आपली धनुर्विद्येची कला गुरू द्रोणाचार्य यांच्यासमोर सादर केली आणि धनुर्विद्येतील अनेक कौशल्य पाहून गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्यला विचारले की, “तुझा गुरु कोण आहे?” त्यावेळी एकलव्याने द्रोणाचार्यचे नाव सांगितले, त्यावेळी गुरु द्रोणाचार्य म्हणाले ” ते कसे काय?” त्यावेळी एकलव्याने, ” तुम्ही ज्यावेळी पांडवांना ही विद्या शिकवत होता, त्यावेळी मी ही कला अवगत केली” असे सांगितले. गुरु द्रोणाचार्य यांनी त्यावेळी गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याचा अंगठा मागितला. त्यावेळी एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून आपल्या हाताचा अंगठा दिला होता.
खरा गुरु कोण असतो?
गुरु हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा एक व्यक्ती असतो. गुरु आपल्या जवळचे संपूर्ण ज्ञान शिष्याला देऊन त्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी वाट दाखवतो. जर एखादा शिष्य चुकत असेल तर त्याला बरोबर काय आहे किंवा चुकीचे काय आहे. हे सांगून त्याला योग्य मार्गदर्शन किंवा मदत करणारा व्यक्ती हा गुरु असतो. गुरुच्या मनामध्ये आपल्या शिष्याचे कल्याण व्हावे. हा उद्देश असतो.
गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?
गुरुपौर्णिमा हा एक खूप प्राचीन काळापासून साजरा करत आलेला मोठा सण आहे. जो गुरूंसाठी एक आदर्श सत्कार प्रदर्शित करतो. या दिवशी गुरुकडे शिष्य आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे पूजन करतो, त्यांना भेट देतात. आधी गुरुजी वंदावे मग साधा साधन साधावे… गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतात गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो, महेश्वरा….गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः अशाप्रकारे गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जातात.
FAQ
गुरु पौर्णिमा म्हणजे काय?
हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी महर्षी वेद ऋषींचा जन्म झाला होता आणि तोच आपण साजरा करतो.
गुरु आणि शिष्याचे उत्तम उदाहरण कोणाची देता येईल?
गुरु आणि शिष्याचे उत्तम उदाहरण एकलव्य आणि गुरु महर्षी व्यास ऋषी यांचे देता येईल.
गुरु पोर्णिमा आणखीन कोणत्या नावाने ओळखली जाते?
व्यास पौर्णिमा
गुरुपौर्णिमा कोण साजरी करतात?
गुरुपौर्णिमा ही हिंदू, जैन, बौद्ध आणि इतर लोक सुद्धा साजरे करतात.
गुरु शिष्यांना काय सांगतात?
गुरु शिष्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे जीवन चांगल्या वाटेवर नेण्यास मदत करतात आणि योग्य असे ज्ञान त्यांना प्रदान करतात.