हलासन आसनाची संपूर्ण माहिती Halasan Asana Information In Marathi

Halasan Asana Information In Marathi प्रत्येकाला सुदृढ व निरोगी शरीर हवे असते परंतु आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये कोणाकडे वेळच नाही. योगा व्यायाम नियमित केल्यामुळे शरीर निरोगी राहते. योगाचे अनेक प्रकार आहेत तसेच व्यायामाचे सुद्धा अनेक प्रकार आहे. त्यामधील हलासन तुम्ही नियमित केले तर या आसनापासून तुम्हाला अनेक फायदे आहेत. तसेच हे आसन करत असताना तुम्हाला काही खबरदारी सुद्धा ठेवायच्या असतात. पूर्वीच्या काळी शेतामध्ये अनेक प्रकारची कामे केली जात असत.

Halasan Asana Information In Marathi

हलासन आसनाची संपूर्ण माहिती Halasan Asana Information In Marathi

त्यामध्येच लोकांचा व्यायाम होऊन जात असे. या आसनामध्ये सुद्धा शेतातील वापरल्या जाणाऱ्या नांगरासारखे आपले शरीर होते. त्यामुळे याला हलासन असे नाव देण्यात आले आहे. हलासन नेहमी एखाद्या योगा मार्गदर्शकाच्या खालीच केले पाहिजे.

हलासन आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे.शरीराचा लठ्ठपणा पोटाची घेर कमी करण्यासाठी हलासनाचा तुम्ही पुरेपूर फायदा सुद्धा घेऊ शकता तसेच हलासन मधुमेह, थायरॉईड यांसारखे रोग जडलेल्या व्यक्तींच्या शरीर प्रकृतीसाठी सुद्धा बरेच फायदेशीर ठरते. हलासन या आसनाला हलवा पोज योग असे सुद्धा म्हटले जाते. या आसना विषयी माहिती पाहणार आहोत.

हलासन म्हणजे काय?

हलासन हा शब्द हल आणि आसन या दोन हिंदी शब्दापासून तयार झालेला आहे. हा योग करत असताना शरीराची मुद्रा हे शेतामध्ये नागरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या नांगरा सारखी होत असते म्हणून त्याला हल असे हिंदीमध्ये म्हटले जाते. या योगाचे अनेक फायदे आहेत. हा योग करत असताना आपले शरीर मजबूत होते, वजन सुद्धा कमी होते. तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात. हलासन हे एक कठीण योगा आहे परंतु त्याच्या दररोजच्या सरावामुळे तुम्हाला ते हळूहळू जमू शकते.

हलासन हे आसन करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तसेच हे असं पाहिजे तेवढे सोपे सुद्धा नाही. बऱ्याचदा हे आसन करण्यासाठी अनेक व्यक्ती असमर्थ असतात किंवा त्यांना हे आसन जमत नाही. ज्यांना पूर्ण हलासन जमत नाही त्यांनी अर्ध हलासन केले तरी चालेल. याचबरोबर सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी ह्याला सणाचा सराव करणे योग्य राहतो.

आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले सुद्धा राहते जर तुम्हाला सकाळी काही कामांमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही हे आसन संध्याकाळी सुद्धा करू शकता परंतु प्रत्येक व्यक्तीने हे आसन करत असताना लक्षात ठेवायचे आहे की, या आसनाचा सराव करण्यापूर्वी आपण आपले पोट साफ करून घेणे आवश्यक आहे. जर हलासनाच्या सरावाच्या साधारणता चार ते सहा तास आधी हलक्या स्वरूपाचे अन्न खाल्ले तर चालेल.

हलासनाचे फायदे :

 • हलासन हे एक प्रकारचे आसन आहे तसेच हा प्रकार योगाच्या इतर आसनांमध्ये येतो आणि हे आसन सर्वात उत्कृष्ट योग आहे.
 • हे आसन केल्यामुळे आपल्या पचन व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो तसेच बद्धकोष्ठता अपचन पोटदुखी आणि इतर पोटाशी संबंधित असलेले आजार यापासून तुम्हाला मुक्तता मिळते.
 • हे आसन नियमित केल्यामुळे तुमची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा वाढते. हलासन केल्यानंतर आपल्या आरोग्यावर किती सकारात्मक परिणाम होतो.
 • मला सहन केल्यामुळे शारीरिक तसेच मानसिक व भावनिक फायदे सुद्धा मिळतात.
 • तसेच सर्व स्तरातील योगांमध्ये हे एक लोकप्रिय योग आसन आहे. याचा सराव जर तुम्ही नियमित केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो.
 • हलासन केल्यामुळे पाठीचा कणा ताणला जातो, त्यामुळे मान पाठीवरचा भाग पाठीच्या खालचा भाग यामध्ये कडकपणा आणि तणाव सुद्धा कमी होतो तसेच जर तुम्हाला पाठ दुखीचा त्रास असेल तर तो कमी होतो.
 • हलासन केल्यामुळे पाय आणि नितीन जमिनीवर उचलून आणि दीर्घकाळपर्यंत पोज ठेवण्यासाठी पोटाच्या मजबूत स्नायूंची गरज भासते. हे मुख्य स्नायूंना टोन करण्यासाठी एकूण ताकद आणि स्थिरता सुधारण्यास सुद्धा मदत करते.
 • थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते, हलासन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. जे शरीरातील चयापचय आणि ऊर्जा पातळी सुद्धा नियंत्रित करते.
 • ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच पचन संस्था सुधारण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य व निरोगी शरीर राहण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.
 • हे आसन केल्यामुळे मन शांत राहते तसेच ध्यान मुद्रा सुद्धा तुम्ही करू शकता. हे शरीरामध्ये विश्रांती आणि कायाकल्पाची भावना सुद्धा वाढवते.

हलासन कसे करावे ?

 • हलासन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जमीनीवर पाठीवर झोपायचे आहे.
 • त्यानंतर दोन्ही हात शरीराला समांतर ठेवायचे आहेत व हाताचे तळवे जमिनीला लागून ठेवायचे आहेत.
 • नंतर दोन्ही पाय एकमेकांना लागून सरळ रेषेत ताट ठेवा.
 • आता एक श्वास हळूहळू घेत दोन्ही पाय एक सात वर उचलायचे आहेत.
 • श्वास घेण्याची आणि पाय उचलण्याची क्रिया सोबतच झाली पाहिजे.
 • नंतर ही क्रिया करत असतानाच गुडघ्यामध्ये पाय वाकणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत.
 • ही क्रिया करत असताना हात आणि पाठ जमिनीला चिटकून राहू द्यायचे आहेत.
 • आता पाय 90 अंशाच्या कोणामध्ये आल्यावर एक श्वास सोडायचा आहे व पाय डोक्याकडे नेण्याची क्रिया चालू करायचे आहे.
 • त्यानंतर डोक्याकडे असलेले पाय हळूहळू चवीला टेकवण्याचा प्रयत्न करा.
 • हे क्रिया करत असताना पाय जुळलेलेच पाहिजे.
 • पाय गुडघ्यात वाकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे.
 • पायाचे अंगठे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा.
 • सुरुवातीला असे करता येणार नाही परंतु हळूहळू सरावानंतर ही क्रिया तुम्हाला सहज जमेल.
 • आता श्वासास चालू ठेवा परंतु तोंडाने श्वास घेऊ नका.
 • नंतर शेवटच्या स्थितीमध्ये हनोटी गळ्यात चिटकवणे आवश्यक असते.
 • या स्थितीत आठ ते दहा सेकंदानंतर हळूहळू पाय लांब रेषेत आणून शरीराला हिसका बसू देता, पाय जमिनीवर आणायचे आहेत.
 • अशाप्रकारे तुम्ही चार ते पाच मिनिटे आसन करू शकता. नियमित सराव झाल्यानंतर तुम्ही तुमचा वेळ वाढवून सुद्धा शकता.

हलासन करताना घ्यावयाची काळजी :

 • हे आसन करण्यासाठी तुम्हाला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
 • जर तुम्हाला जुलाब तसेच तुमच्या मानेला दुखापत झालेली असेल तर तुम्ही हा आसन करू नये.
 • जर तुम्ही हाय बीपी किंवा दम्याचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी हे आसन धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे आसन करावे.
 • हे आसन करीत असताना तुम्हाला सुरुवातीला मानेवर खूप ताण जाणवू शकतो. त्यामुळे हे आसन हळूहळू करावे.
 • जर तुम्ही हे आसन करताना नवीन असाल तर प्रशिक्षकाच्या देखरेखे खालीच या आसनाचा सराव करावा.
 • हलासन करत असताना कोणत्याही जोर जबरदस्ती लावून ही क्रिया करू नका.
 • व्यायाम किंवा योगा हा शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा आणि योग्य मार्ग आहे. त्यामुळे त्याचा नियमित सराव केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो.

FAQ

हलासन केल्यामुळे कोणते फायदे होतात?

हलासन केल्यामुळे पाठदुखी पोटदुखीचा त्रास कमी होतो तसेच पोटावरची चरबी कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हलासन कोणी करू नये?

हलासन हे गर्भवती महिला तसेच मानेचा त्रास असल्यास व बीपीचा त्रास असलेल्या रुग्णांनी करू नये.

हलासन याची दुसरे नाव काय आहे?

हलासन याचे दूसरे नाव नांगरपोज असे आहे.

हलासन संध्याकाळी करता येईल का?

जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर तुम्ही हे आसन संध्याकाळी केले तरी चालेल.

हलासन करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

हलासन करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा संध्याकाळी आहे.

Leave a Comment