हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Hingoli Information In Marathi

Hingoli Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत जो महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील औरंगाबाद या प्रशासकीय विभागातील एक जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा.

Hingoli Information In Marathi

हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Hingoli Information In Marathi

हिंगोली हा जिल्हा राज्यातील अगदी अलीकडच्या काळात म्हणजे १९९९ साली अस्तित्त्वात आलेला हा जिल्हा असून, संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेल्या “पहिल्या ज्ञानेश्वर चरित्रकाराचा” म्हणजे संत नामदेवांचा हा जिल्हा प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय आहे.

औंढा नागनाथाचे ज्योतिर्लिंग मंदिर हे या जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २०११ नुसार ११,७७,३४५ एवढी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ ४,८२७ चौ. किमी. आहे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सु. १.५७% क्षेत्र व लोकसंख्येच्या १.०७% लोकसंख्या हिंगोली जिल्ह्यात आहे.

जिल्ह्याच्या उत्तरेस बुलढाणा आणिवाशिम, पूर्वेस यवतमाळ आणि नांदेड, दक्षिणेस नांदेड आणि परभणी, तर पश्चिमेस परभणी या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमा आहेत.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत (बसमथ) असे पाच तालुके आहेत. हिंगोली हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. महाभारत काळात हिंगोलीचे नाव एकचक्रा नगरी असे होते. ज्वारी व कापूस ही जिल्ह्याची मुख्य पिके आहेत.

हिंगोली जिल्ह्याची स्थापना

आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला.मराव सत्तेच्या काळात हिंगोली जिल्ह्याच्या भूमीवर सन १८०३ या वर्षी टिपू सुलतान व मराठा यांच्यातील युद्ध चांगलेच गाजले.

मराठवाड्यातील हिंगोली हे निझामाच्या लष्कराचे महत्वाचे ठाणे असल्यामुळे, हैदराबाद संस्थानात हिंगोली निझामशाहीचा महत्त्वपूर्ण घटक मानला जात असे.

स्वातंत्र्योत्तर काळात सन १९५६ च्या राज्यपुनर्रचना कायद्यानुसार हा जिल्हा मराठवाड्याबरोबर मुंबई प्रांताच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर १९६० मध्ये हा भाग परभणी जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. पुढे १ मे १९९९ रोजी परभणीचे विभाजन करून हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला.

हिंगोली जिल्ह्याचा इतिहास

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हिंगोली जिल्ह्याचा भाग हा हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यातील हैद्राबात मुक्तिसंग्रामात हिंगोली, बामणी इत्यादी गावे आघाडीवर होती. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात मराठवाड्यात वसलेला हा या विभागातील आठवा जिल्हा ठरला.

इतिहासात हिंगोलीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे शहर स्वातंत्र्याआधी निजामाच्या अधिपत्याखाली होते. विदर्भाच्या सीमेवरील ठिकाण असल्यामुळे, निजामाचा महत्त्वाचा लष्करी तळ या जिल्ह्यात होता. त्या काळात सैन्यदलाला व पशुंना वैद्यकीय सेवा ह्या हिंगोलीतून कार्यरत होत्या.

हिंगोलीने दोन मोठी युद्धे अनुभवली आहेत, पहिले १८०३ साली टिपू सुलतान व मराठा यांच्यातील युद्ध तर दुसरे १८५७ साली नागपूरकर व भोसले यांच्यातील युद्ध होय.

लष्करी ठाणे असल्यामुळे, हैद्राबाद राज्यातील हिंगोली हा भाग महत्त्वपूर्ण घटक मानला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात हा जिल्हा मुंबई प्रांताच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर १९६० मध्ये हा भाग परभणी जिल्ह्यात समाविष्ट होतो.तर ३९ वर्षांनंतर म्हनजे १ मे,१९९९ मध्ये हा स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला.

भौगोलिक माहिती

महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.

राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. देशातील सर्वांत मोठे शहर, मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे महत्वाचे राज्य आहे.

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे. महाराष्ट्रातील खूप मोठे क्षेत्र पठारी भागात मोडते. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात.

कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.

महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत. पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर व अमरावती हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.

नद्या धरणे

जिल्ह्यात कयाधू, पूर्णा, पैनगंगा व असना या प्रमुख नद्या वाहतात. या जिल्ह्यातील पूर्णा नदीवर सन १९५७ मध्ये येलदरी धरण प्रकल्प उभारण्यात आला आहे व याठिकाणी जलविद्युत केंद्र उभारण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील दुसरे प्रमुख धरण म्हणजे औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण होय. अप्पर पैनगंगा धरणाचा उपयोग कळमनुरी तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी होतो.

हवामान

पठारावरील स्थानामुळे जिल्ह्यातील हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे. हा प्रदेश उष्णकटिबंधात मोडत असल्यामुळे येथील उन्हाळा कडक असतो. येथील उच्चतम तापमान सरासरी ४१.९⁰से. असते. उन्हाळ्यात कधीकधी तापमानात वाढ होऊन ते ४४⁰ते ४५⁰से. पर्यंत वाढते.

हिवाळ्यातील तापमान कमी असते. या वेळी सरासरी किमान तापमान १२.६⁰से. असते. हिवाळ्यात उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे येथील तापमान ५⁰से. ते ६⁰से.पर्यंत खाली येते. हिंगोली जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ९५ सेंमी. आहे. जिल्ह्यात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याखेरीज ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत ईशान्येकडील परतीचा पाऊस पडतो. त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होतो.

प्रमुख पिके

हिंगोली जिल्ह्यातील ज्वारी प्रमुख अन्नधान्याचे पीक असून, हे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांत घेतले जाते. या जिल्ह्यातील वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी पीक या जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक आहे. ज्या तालुक्यात सिंचनाच्या सोयी आहेत, त्या तालुक्यांमध्ये उसाची लागवड वाढत आहे. या जिल्ह्यातील काही भागातील जमीन ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे रब्बी हंगामातसुद्धा पिके घेतली जातात.

शेतीव्यवसाय

जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीत्या येथील ८३% लोक शेतीवर व शेती आधारित व्यवसायांवर अवलंबून आहेत. त्यांमध्ये ४५% शेतकरी व ३८% शेतमजूर यांचा समावेश होतो.

जिल्ह्याच्या एकूण उत्पादनात कृषी उत्पादनाचा वाटा ३०% आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके घेतली जातात. एकूण शेतीक्षेत्राच्या २८% भागावर सोयाबीनचे, तर २२% क्षेत्रात कापसाचे पीक घेतले जाते. ज्वारी, तूर, हरभरा, तांदूळ, सूर्यफूल ही पिकेही येथे घेतली जातात.

जिल्ह्यात शेतीयोग्य क्षेत्र ४,४६,९०५ हे. असून त्यांपैकी केवळ ६४,२४९ हे. क्षेत्र सिंचनाखाली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत वसमत व कळमनुरी या तालुक्यांत सिंचनक्षेत्र अधिक आहे.

ज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे.

कापूस हे नगदी आणि जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, हिंगोली, वसमत व सेनगाव या तालुक्यांत कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. केळी, द्राक्षे, मिरची व लसूण ही पिकेसुद्धा हिंगोलीत काही प्रमाणात घेतली जातात, तसंच जिल्ह्यात ऊसाची लागवड ही वाढत आहे.

वसमत व कळमनुरी तालुक्यात सिंचनाची सोय असल्याने या तालुक्यांमध्ये हे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते.हिंगोलीतील मोठे क्षेत्र डोंगराळ असून या भागातील जमीन मध्यम व हलक्या प्रतीची आहे. नदीखोर्‍यातील जमीन मात्र कसदार आहे.

जिल्ह्यातील काही भागातील जमीन ओलावा टिकवून ठेवणारी आहे. त्यामुळे रब्बी हंगामात ही जमीन (मृदा) उपयुक्त ठरते.जिल्ह्यातील विहिरींची मोठी संख्या व येलदरी आणि सिद्धेश्वर ह्या धरणांमुळे हिंगोली या शेतीप्रधान जिल्ह्याची सिंचनाची गरज काही प्रमाणात भागते.

मृदा

या जिल्ह्यातील मृदा काळी, कसदार व बारीक पोताची आहे. ती रेगूर नावाने ओळखली जाते.

वर्गीकरणानुसार येथील जमिनीचे खरवड, मध्यम काळी आणि चोपणी असे प्रकार आढळतात. खरवड जमीन जिल्ह्याच्या उत्तर भागातील डोंगर उताराच्या भागात असून त्यातून पाण्याचा निचरा लवकर होतो.

जिल्ह्यातील नदी-खोऱ्यांतील सखल प्रदेशांत मध्यम व काळी मृदा असून तिची ओलावा धारण करण्याची क्षमता अधिक असल्याने ती सुपीक म्हणून गणली जाते. या मृदेमध्ये चुनखडी, मॅग्नेशियम, लोह, अल्कली अशी पोषकद्रव्ये आढळतात.

खनिजे

आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची खनिजे जिल्ह्यात आढळून येत नाहीत. इमारतींच्या बांधकामासाठी लागणारा दगड व रस्त्यासाठी लागणारी खडी हेच मुख्यतः खाणींतून मिळतात.

लोकसंख्या

भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याच्या ११,७७,३४५ या एकूण लोकसंख्येत ६,०६,२९४ पुरुषव ५,७१,०५१ स्त्रिया होत्या. लिंग गुणोत्तर दर हजारी ९४२ आहे. राज्यातील सिंधुदुर्ग व गडचिरोली जिल्ह्यांखालोखाल हा तिसऱ्याक्रमांकाचा कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे.

लोकसंख्येची घनता दरचौ.किमी.स २४४ व्यक्ती अशी आहे. २००१–११ या दशकातीललोकसंख्या वाढीचा दर १९.२७% होता. नागरी लोकसंख्या १५.१८% आहे. सरासरी साक्षरता ७८.१७% असून त्यात पुरुषांची साक्षरता ८६.९४%, तर स्त्रियांची साक्षरता ६८.९५% आहेत. मराठा समाजाबरोबरच बंजारा समाजाचे लोकही येथे पुष्कळ आढळतात.

उद्योग व्यवसाय

या जिल्ह्यात हिंगोली व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे मेंढीच्या लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा उद्योग, कातडी कमावून त्यापासून वस्तू तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.कळमनुरी येथील हातमाग उद्योग व वसमत तालुक्यात रेशीमकिडे जोपासण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.

हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर कारखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर कारखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना असे मिळून 4 साखर कारखाने आहेत.

हिंगोली जिल्ह्यात अनेक छोटे उद्योग असून त्यातील काही महत्त्वाचे :

हिंगोली येथील मेंढीच्या लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा उद्योग, कातडी कमावून त्यापासून वस्तू तयार करण्याचा उद्योग व त्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र, सिंचनासाठी लागणार्‍या नळ्यांचा (पाईप्सचा) कारखाना, कळमनुरी येथील हातमाग उद्योग, वसमत तालुक्यातील रेशीम किडे जोपासण्याचा उद्योग, प्लायवूड तयार करण्याचा उद्योग, औंढा-नागनाथ येथील जिनिंग-प्रेसिंग व्यवसाय चालतात. त्याचप्रममाणे गूळ तयार करणे, पशु व कुक्कुटपालन या सारखे अनेक शेतीप्रधान व्यवसायही जिल्ह्यात सुरु आहेत.

दळणवळण सोयी

नांदेड-अकोला, परभणी-यवतमाळ व जिंतूर-नांदेड हे महत्त्वाचे राज्यमार्ग (रस्ते)हिंगोली जिल्ह्यातनं जात असून जिल्ह्याच्या मध्यभागातून अकोला-पूर्णा हा लोहमार्ग जातो.

पर्यटनस्थळे

भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे.

३०० वर्षांपूर्वीचे मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर जिल्ह्यात शिरड-शहापूर येथे आहे. तर नरसी येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिद्ध आहे. नरसी हेच संत नामदेवांचे जन्मगाव असल्याचे मानले जाते. तर जवळच बामणी येथील अन्नपूर्णा व सरस्वती देवीची देऊळंही प्रेक्षणीय आहेत.

नामवंत व्यक्तीमत्वे

हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. संत नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या जिल्ह्यात होते.

हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. संत नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या जिल्ह्यात होते.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment