मिरची भाजी रेसिपी मराठी Hirvya Mirchichi bhaji Recipe in Marathi हिरवी मिरची जेवणाची चव वाढवते, तसेच आपल्या आरोग्यासाठी देखील ती खूपच फायदेशीर असते. आपण पाहतो की, बरेच लोक हिरवी मिरची खाणे टाळतात; परंतु हिरवी मिरची अनेक रोगांवर उपयुक्त आहे. हिरव्या मिरचीची भाजी खाण्यासाठी अत्यंत चविष्ट व स्वादिष्ट लागते. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण वडापाव पोहे, समोसे, कचोरी, भजी इत्यादी चवदार पदार्थ खात असतो. परंतु ही सर्व पदार्थ बाहेर मिळत असल्यामुळे ते स्वच्छ असतातच असे नाही. म्हणून आपण आपल्या घरी स्वतः स्वच्छता राखून मिरचीची भजी, मिरचीची भाजी, मिरचीचा ठेचा इत्यादी पदार्थ बनवू शकतो. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी साठी लागणारी साहित्य व पाककृती.
मिरची भाजी रेसिपी मराठी Hirvya Mirchichi bhaji Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
मिरचीची भाजी ही कोरडी व ओली अशा दोन प्रकारे केली जाते या रेसिपी पालक आंबट चुका इत्यादी घालून ओली मिरचीची भाजी केली जाते. तर कोरडी मिरचीची भाजी करण्यासाठी बेसन आणि मिरची यांचा उपयोग केल्या जातो तर आपण येथे कोरड्या मिरचीच्या भाजी विषयी बोलणार आहोत. आजकाल दोन्हीही मिरचीच्या रेसिपीज हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये उपलब्ध आहेत. मिरचीच्या भाजी सोबत भाकरी छान लागतात. परंतु बाहेर महागडे रेट पाहता आपण आपल्या घरी स्वतः तयार करून खाल्ले तर अतिशय उत्तम प्रकारे ही रेसिपी बनवू शकतो. तर चला मग जाणून घेऊया रेसिपी विषयी सविस्तर माहिती.
ही रेसिपी किती व्यक्तींकरिता आहे?
ही रेसिपी आपण तीन व्यक्तींकरता तयार करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
हिरव्या मिरचीची भाजीच्या पूर्वतयारी करता आपल्याला पाच मिनिट एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
या रेसिपीच्या कुकिंग करण्याकरिता आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
हिरवी मिरची रेसिपी पूर्ण तयार करण्याकरता आपल्याला एकूण 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
साहित्य :
1) अर्धी वाटी बेसन
2) अर्धा चमचा हळद पावडर
3) अर्धा चमचा धनिया पावडर
4) अर्धा चमचा लाल तिखट
5) तेल
6) अर्धा चमचा मोहरी
7) अर्धा चमचा जिरे
8) अर्धा चमचा बडीशोप
9) अर्धा चमचा हिंग
10) चिरलेली हिरवी मिरची
11) चवीनुसार मीठ
12) एक चमचा साखर
13) बारीक चिरलेला कोथिंबीर
पाककृती :
- सर्वप्रथम मध्यम आचेवर एक तवा ठेवून त्यामध्ये बेसन पाच ते सहा मिनिटे छान असे भाजून घ्या.
- बेसन भाजल्यानंतर त्याचा छान सुगंध येतो नंतर त्यामध्ये हळद धने पावडर, लाल तिखट सर्व मिक्स करून घ्या.
- नंतर हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या नंतर एक कढई घ्या व त्यामध्ये तेल गरम करण्याकरता ठेवा तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी छान तडतडू द्या. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घाला. नंतर त्यामध्ये हिंग व बडीशोप घाला.
- नंतर मिरचीचे छोटे छोटे काप केलेले सर्वच मिरच्या छान तळून घ्या. नंतर भाजलेले बेसन व मीठ त्यामध्ये मिक्स करा.
- त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिटे छान शिजवून घ्या.
- नंतर त्यामध्ये चवीनुसार साखर घालून छान परतून घ्या तसेच वरून कोथिंबीर घाला.
- अशाप्रकारे मिरची बेसन भाजी तयार आहे. आता तुम्ही ही रेसिपी पोळी, भाकर, तंदुरी किंवा रोटी पराठा यांच्यासोबत सर्व्ह करू शकता.
- ही भाजी तुम्ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता.
पोषक घटक :
हिरव्या मिरचीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, विटामिन सी,लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते तसेच त्यामध्ये बीटा कॅरोटीन व क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीनचे प्रमाण जास्त असते.
फायदे :
हिरवी मिरची वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असण्याव्यतिरिक्त, त्यात कॅलरीज नसतात. हिरवी मिरची देखील चयापचयासाठी चांगली मानली जाते.
हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरातून उष्णता बाहेर पडते, वेदना कमी होतात. त्यात कॅप्सेसिन असते, जे नाकात रक्त प्रवाह सुरळीत करते. यामुळे आपल्याला सर्दीला लवकर आराम मिळतो.
थंडीच्या काळामध्ये मिरचीचे सेवन करणे खूपच फायदेशीर असते.
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे घटक असते, ज्यामुळे ते मसालेदार बनते. मिरची खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि नसांमध्ये रक्तप्रवाह जलद होतो. त्यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते.
तोटे :
हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह हा सामान्यपेक्षा कमी होतो. त्यामुळे मधुमेहाचे औषध घेत असलेल्या रुग्णांनी हिरव्या मिरचीचे जास्त सेवन करू नये अन्यथा त्यांना हानी होऊ शकते.
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन असते. जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर तुम्हाला त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.
हिरवी मिरचीमध्ये कॅप्सेसिनचे प्रमाण जास्त असल्याने मूळव्याधचा त्रास असलेल्यांनी जास्त प्रमाणात सेवन करू नये.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.