जाणून घ्या संगणकाचा इतिहास | history of computer in marathi

History of computer in marathi : मित्रांनो आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत. या शतकात जगत असताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हे शतक संपूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. ह्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे संगणक ज्याला इंग्लिश मध्ये आपण कॉम्प्युटर म्हणतो.

संगणक हि जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. सुरुवातीला फक्त मोठ्या कंपन्यांमध्ये दिसणारा हा संगणक आज प्रत्येक घरात सहज दिसतो. अगदी तळहाता एवढा सुद्धा असणारा हा संगणक सुरुवातीपासून एवढाच होता का ? आज आपण जसा संगणकाचा उपयोग करतो तसाच आधी पासून करत होतो का ? नाही माहित. चला तर मग बघुया या लेखातून संगणकाचा इतिहास (history of computer in marathi).

संगणकाचा इतिहास | history of computer in marathi

संगणकाचा सर्वात साधा आणि सोपा उपयोग हा गणिती क्रियांचे आकडेमोड करण्यासाठी केला जात असे. त्यामुळे संगणकाचा उगम म्हंटला तर तर तो Abacus यातून आल्याचे समजते.

Abacus

Abacus चा उगम हा चीनमधे इसवी सन पूर्व पंधराशे ते तीन हजार वर्षांपूर्वी झाल्याची मान्यता आहे. यामध्ये एक लाकडी बॉक्स असतो. त्यामध्ये तार लावलेले असतात आणि त्या तारांमध्ये काही मनी अडकवलेल्या असतात. ह्या मण्यांचा उपयोग करून आकडेमोड केली जात असे. ह्याला चीन मध्ये ” Suanpan” म्हणजेच ” calculating pan “असे म्हंटले जात असे.

Napier’s bones

आजपासून जवळपास तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी म्हटलं तरी इसवी सन १६१७ मध्ये स्कॉटलांड या देशात राहणाऱ्या जॉन नेपियर या व्यक्तीने एक यंत्र बनवले. हे यंत्र गणिती आकड्यांची बेरीज, वजाबाकी, दशांश यांचा गुणाकार देखील करत असे. पुढे जाऊन या यंत्राला कॅल्क्युलेटर असे म्हटले जाऊ लागले. ” Napier’s bones” चा आविष्कार असे म्हंटले जात असे.


यात हाडांपासून किंवा लाकडापासून बनवलेला एक ठोकळा असे व त्या वर अंक छापलेली असत. याचा उपयोग युरोपातील लोकांनी सुंदर पद्धतीने केला. यामुळे Napier हे Logarithms च्या संशोधनासाठी देखील प्रसिद्ध झाले.

Pascline

त्यानंतर जवळपास वीस वर्षांनी म्हणजेच १६२१ मध्ये फ्रांस मध्ये राहणाऱ्या blase pascal या गणित तज्ञाने एक पूर्णपणे यांत्रिक पद्धतीचे म्हणजे मानवी हस्तक्षेप नसलेले असे जगातील पहिले मेकॅनिकल कॅल्क्युलेटर बनवले. त्याला pascline असे नाव देण्यात आले. त्याचे दुसरे नाव adding machine असे होते. हे यंत्र घड्याळ आणि ओडोमीटर या सिद्धांतावर काम करत असे यामध्ये खूप सारे दात युक्त चक्र लागलेली असे. ह्या चक्रांवर ० -९ अंक टाकलेली असत. हे चक्र जेव्हा फिरत असे त्याद्वारे गणना केली जात असे.

Difference engine

इसवीसन १८२२ मध्ये इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणारे तसेच केंब्रिज विद्यापीठात प्राध्यापक असणारे गणितज्ञ चार्ल्स बॅबेज यांनी Difference engine नावाचे यंत्र शोधून काढले परंतु ते पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाही. हे स्वतः counting करणारे यंत्र होते. याला जगातील पहिले यांत्रिक कॉम्प्युटर ( First mechanical computer ) च्या रुपात बघितले जात होते.

Analytical engine

पुढे १८३७ मध्ये Difference engine वर काम करून त्याचा विकास करून बॅबेज यांनी analytic engine हे नवीन यंत्र तयार केले त्यात ते संपूर्ण यशस्वी झाले तेव्हा त्या यंत्राला त्यांनी प्रोसेस युनिट लावले. यात पितळ धातूचा गिअर बनवण्यासाठी वापर केला गेला.


त्याचे चार भाग भाग भाग होते ज्याच्यात मुख्यतः Mil, Store, Reader आणि printer यांचा सहभाग होता.
Mil ची जागा CPU ने घेतली आहे तर , store ची जागा memory ने. सोबत च reader आणि printer ची नावे बदलून ती आता Input device आणि output device अशी झाली आहेत.

जोडलेल्या प्रोसेस युनिट चे प्रोग्रामिंग होत असे. हा बाबेझ यांनी बनवलेला हा संगणक त्यांनी दिल्या गेलेल्या निर्देशांकावर काम करत असे. हा anlaytical engine संगणकाला जगाचा पहिला प्रोग्रामिंग संगणक म्हटला जाऊ लागले. तसेच या संगणकाला आधुनिक संगणकाचा पाया असे संबोधले जाऊ लागले.

ह्या संगणकाचा प्रोग्रॅम करण्याचा मान हा प्रसिद्ध कवी लॉर्ड बायर्न यांच्या मुलीला Ada Lovelace ह्यांना मिळाला. त्यांनी अतिशय उत्तम अशी प्रोग्रामिंग केली. Ada Lovelace ह्यांना जगातील पहिली कॉम्पुटर प्रोग्रामर ( First computer programme ) हि उपाधी दिली गेली.


Charles Babbage ह्यांना कॉम्प्युटरचा जनक असे संबोधले जाऊ लागले. कॉम्प्युटर हे नाव देखील प्रथम त्यांनीच दिले व पुढे तेच प्रचलित झाले. कॉम्प्युटर हे नाव ग्रीक भाषेतील असून पुढे ते इंग्लिश भाषेत आले व त्याचा अर्थ गणना करणारे यंत्र असा होतो.

Tabulating Machine

१८८० च्या दरम्यान न्यूयॉर्क स्थित एक इंजिनियर herman Hollerith ह्यांनी एक electro mechanical machine निर्माण केलं. हे इतक विकसित असं होत की ज्याचा उपयोग अमेरिकेमध्ये जनगणना करण्यासाठी केला गेला. ज्या जनगणनेला सात वर्षांचा कालावधी लागणार होता तो या संगणकाच्या मदतीने फक्त तीन महिन्यांमध्ये पूर्ण केली गेली.

Electro mechanical computer चा इतिहास (history of electro mechanical computer)

१९३७ मध्ये हावर्ड युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होवर्ड ( Howard H. Aiken ) यांनी गणितातील क्लिष्ट अवघड अशा समस्या सोडविण्यासाठी पहिला इलेक्ट्रो मेकॅनिकल कॉम्प्युटर ( Mark – 1) वर काम करण्यास सुरुवात केली या कामासाठी त्यांना शेवटी IBM (international business machine ) यांनी पैशांची आर्थिक मदत केली.

ह्या संगणकाला automatic sequence computer असे नामकरण करण्यात आले . याची लांबी ५५ फूट तर उंची ८ फूट होती. तर वजन जवळपास ५ टन एवढा होते. तसेच ह्या संगणकचा उपयोग अमेरिका नौदला कडून दुसऱ्या जागतिक विश्व युद्धात केला गेला.

आधुनिक संगणकाची सूरवात

Alon turing कडूनच आधुनिक संगणकाचा पाया घातला गेला आहे. त्यांनी एक universal turing machine बनवली. ती सर्व गोष्टींची गणना करण्यासाठी सक्षम होती. पुढे याच आधारावर संगणकाचा निरंतर असा विकास होत राहिला.


आज आपण जे संगणक बघतो त्याची सुरुवात जवळपास 1950 पासून झाली. विल्यम जोन्स चा यांनी मिळून Transistor चा चा शोध लावला आणि संगणकाच्या प्रगतीत मानाचा तुरा रोवला गेला गेला. या आधी Vaccum tube चा वापर होत असे ज्याच्या खूप मर्यादा होत्या.

Transistor हे आकाराने अतिशय लहान असे होते. Transistor च्या वापरामुळे संगणकाचा आकार सुद्धा लहान लहान होत गेला. आधीच्या तुलनेत आताचे संगणक हे संगणक हे अतिशय वेगवान लहान आणि कुशल झाले आहेत.


१९५३ मध्ये संगणकाची पहिली भाषा COBOL अस्तित्वात आली. Cobol चा शोध ग्रेस हॉपर यांनी लावला. त्यानंतर संगणकाच्या नवीन अनेक भाषांचा शोध लागत गेला. १९५९ मध्ये Integrated circuit chip ( IC चिप ) चा शोध लागला. IC चिप मुले कॅपॅसिटर, रजिस्टर, ट्रांजिस्टर आपापसात जोडले जाऊ लागले. IC चीप मुळे PC , Laptop, Mobile फोन सारखे उपकरण तयार होऊ लागले आणि संगणक अजून लहान लहान होत गेला.

निष्कर्ष

संगणकाचा इतिहास या लेखात आपण पहिले संगणकाचा उगम व संगणकाचा इतिहास (history of computer in marathi) हा आकडेमोड करण्यासाठी झाला असला तरी प्रत्येक दिवसागणिक त्यात बदल होत जाऊन नवीन तंत्रज्ञानाचा जन्म होत गेला आहे. आता त्याचा उपयोग फक्त आकडेमोड करण्यासाठी राहिला नसून संगणक हा प्रत्येक क्षेत्राचा अग्रगण्य भाग बनला आहे. ५ टना पासून ५०० ग्रॅम पर्यंत वाजनाचा हा प्रवास आहे. काळानुरूप अजून त्यात बदल होतच राहील.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तूमच्या social media वर नक्की शेअर करावा.

Leave a Comment