Holi Festival Information In Marathi होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येत असतो तसेच हा सण भारतामध्ये इतर सणांप्रमाणे साजरा केला जातो. हा सण विविध रंगांचा सण आहे, त्यामुळे मानवी जीवनामध्ये येणाऱ्या विविध पैलूंच्या उद्देशाने हा सण साजरा केला जातो. याला वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळी नावे सुद्धा आहेत. होळी सण असून विविध रंगांचा सण आहे, या दिवशी होलिका दहन सुद्धा केली जाते. हा सण लोक मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. होळी हा सण शिमगा या नावाने सुद्धा ओळखला जातो. याला हुताक्षणी महोत्सव, दोलायात्रा अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. कोकणामध्ये याला शिमगा म्हणतात.
होळी सणाची संपूर्ण माहिती Holi festival Information In Marathi
फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा सण साजरा करतात. हा सण वेगवेगळ्या जमातीतील लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात जसे भारतातील आदिवासी जमाती यांच्यामध्ये हा सण साजरा करताना स्त्रिया व पुरुष गुलाल उधळतात तसेच ढोल वाजवून नृत्य सुद्धा करतात.
महाराष्ट्रातील आदिवासी जमात थोडी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा गोडधोड पदार्थ, मासोळी, भात यांचा समावेश असतो तसेच त्यांच्या अंगावर वेगवेगळे दागिने घालून सुद्धा स्त्री पुरुष या सणांमध्ये सभाभागी होतात व वाद्यांच्या तालावर नाचतात.
होळी या सणाची प्रचलित कथा :
आपल्याला माहित आहे, हिंदू धर्मामध्ये अनेक सण साजरे केले जातात व त्यामागील प्रत्येक सणाची काही ना काही दंतकथा प्रचलित असतेच तसेच होळी या सणाची सुद्धा एक कथा प्रचलित आहे. ती कहाणी म्हणजे खूप प्राचीन काळामध्ये ही घडून गेली आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूपच बलवान समजत होता तसेच स्वतःच्या अहंकारामुळे तो इतर देवतांना तुच्छ समजत होता. त्याला देवाचा राग येत होता, तो देवांना हिणवत होता तसेच श्री भगवान विष्णू यांचे नाव ऐकणे त्याला पसंत नव्हते. त्याला एक पुत्र होता, त्याचे नाव प्रल्हाद होते.
तो मात्र भगवान विष्णूचा परम भक्त होता. हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते परंतु भक्त प्रल्हाद लहान असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करून त्याच्याकडून विष्णूची पूजा, उपासना करणे सोडून द्यावे. यासाठी त्याने विविध प्रयत्न केले परंतु प्रल्हाद यांनी कोणतीही भीती न बाळगता भगवान विष्णूच्या भक्तीमध्ये लिन होत असे. त्याने सर्व प्रयत्न करून पाहिले परंतु भक्त प्रल्हादने विष्णूची भक्ती थांबवत नव्हती. या सर्व प्रयत्नांना कंटाळून त्याची बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते, आगीवर विजय प्राप्त करू शकते, त्यामुळे तिला आगीपासून कोणतेही नुकसान होणार नव्हते.
राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन आगीमध्ये बसली. भक्त प्रल्हाद सुद्धा आपल्या आत्याच्या मांडीवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला थोड्याच वेळात होलिका जळायला सुरुवात झाली. एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होलीकेला आठवले की, तिला वरदानात असे सांगितले होते की, ज्यावेळेस ती तिच्या वर्तनाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल.
भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही. मात्र होलीका अग्नीमध्ये जोडून भस्म झाली. त्या दिवसपासून लोक आनंदाने उत्सवाने हा सण होळी दहन कार्यक्रम सुद्धा करतात. दुसऱ्या दिवशी मात्र रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
होळी या सणामागील उद्देश :
या सणामागील उद्देश एवढाच आहे की, वाईट प्रवृत्तीचे लोक अमंगल बिचारी लोक यांचा नाश करून चांगली बुद्धी चांगली विचार अंगी बाळगावी व इतरांचे भले व्हावे. यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे. सत्याचाच नेहमी विजय होतो. होळी या सणाला पुरणपोळी केली जाते तसेच पुरणपोळीचा नैवेद्य देवाला व होळीला दाखविला जातो. होळी ज्या ठिकाणी दहन होते, त्या ठिकाणी लोक पूजा करतात.
होळी या सणाचे महत्त्व :
होळी या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. भारत हा देश कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणाचे महत्त्व म्हणजे वाईट रूढी परंपरा किंवा ज्या लोकांचे मन वाईट असते, त्यांना सद्बुद्धी येवो. इतर गुण सुद्धा आपल्या अंगी यावे व दुसऱ्यांचे भले हो यासाठी प्रयत्न करणे हे महत्व आहे. आणखीन एक महत्त्व म्हणजे लहान मुलांना त्रास देणाऱ्या महिलांच्या राक्षसी वृत्तीला तळा जावो यानुसार होळीचे दहन केल्या जाते.
तसेच रंगपंचमी हा सण राधाकृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन असलेले आपल्याला दिसून येते. कारण गर्भसंहिता या ग्रंथांमध्ये श्रीकृष्णाने होळी साजरी केल्याचे उल्लेख आहेत असे मानले जाते. श्रीकृष्ण रंग उधळून राधा गोपी यांच्यासह सण साजरा करतात अशी प्रचलित कथा आहे.
होळी हा एक प्राचीन हिंदू सण आहे, त्यामुळे हा सण साजरा केला जातो व हा उत्सव रंगाचा, उत्सव प्रेमाचा उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो.
होळी हा सण कसा साजरा केला जातो?
हा सण प्राचीन काळापासून साजरा करत आले आहेत. हा सण वसंत ऋतुच्या आगमनाच्या वेळी साजरा केला जातो, त्यामुळे हा एक शेतकरी सण म्हणून साजरा केला जातो. होळी या सणाची प्रचलित कथा तर आपल्याला माहीतच आहे. हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तसेच हा सण काही प्रदेशात दोन दिवस तर कोठे तीन दिवस साजरा केला जातो.
पहिला दिवस : होळी या सणाचा पहिला दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस असतो. या दिवशी या दिवसात पितळी भांड्यामध्ये रंग पाण्यामध्ये मिक्स केली जाते व उत्सवाची सुरुवात जेष्ठ पुरुषांकडून होते. आपल्या कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती इतर सदस्यांच्या अंगावर हे पाणी शिंपडतात.
दुसरा दिवस. : होळीचा दुसरा दिवस म्हणजे पुनो या नावाने ओळखला जातो. या दिवशी होलिकाची प्रतिमा जाळल्या जातात तसेच याला होलिका दहन सुद्धा म्हणतात. येथे भक्त प्रल्हादची कहाणी लक्षात येते. जेथे छोट्या मुलांना होलिका ही आपल्या मांडीवर घेऊन अग्नी देवाच्या आशीर्वादाने मुलाला जाळण्यासाठी बसली होती परंतु त्यामध्ये तीच जळून राख झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी होलिका दहन केले जाते.
तिसरा दिवस : होळीचा तिसरा दिवस हा पर्व म्हणून ओळखला जातो. होळी साजरी करण्याचा हा शेवटचा दिवस असतो, त्यामुळे या दिवशी एकमेकांवर रंग उडवले जातात. पाणी फेकले जाते, राधा आणि कृष्णदेवतांची पूजा करून हा रंग खेळला जातो, गाणी म्हणतात तसेच वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये रंगपंचमी या नावाने सुद्धा हा खेळ ओळखला जातो.
FAQ
होळी सण कधी साजरा करतात?
होळी हा सण फाल्गुन महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो.
रंगपंचमी हा सण कधी साजरा केला जातो?
होळीच्या तिसऱ्या दिवशी.
होळी या सणाविषयी कोणती कथा प्रचलित आहे?
होलिका व भक्त प्रल्हाद.
होळी हा सण का साजरा केला जातो?
वाईट प्रकारची मनोवृत्ती नष्ट होऊन चांगली भावना तयार व्हावी या उद्देशाने होळी हा सण साजरा केला जाते.
होळी या सणाला दुसरे नाव कोणते आहे?
शिमगा.