Hyderabad Mukti Sangram Information In Marathi कुटुंब असो, राज्य असो, किंवा देश असो. आपण बाह्य शक्तींशी सहजरित्या दोन हात करू शकतो. मात्र अंतर्गत कलह असेल, तर तो खूपच अवघड जात असतो. या अंतर्गत कलहाला लवकरच थांबवले नाही तर ते अतिशय उग्र स्वरूप धारण करत असते, आणि न भरून निघणारी हानी यामुळे होत असते. असेच एक भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला लागलेली वाळवी म्हणून हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या निमित्ताने हैदराबाद संस्थानाला ओळखले जाते.
हैदराबाद मुक्ति संग्रामाची संपूर्ण माहिती Hyderabad Mukti Sangram Information In Marathi
भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्व संस्थाने भारतामध्ये विलीन होण्याची प्रक्रिया पार पाडली गेली. मात्र तेलंगाना, उत्तर कर्नाटक, मराठवाडा, आणि विदर्भ या ठिकाणांचा समावेश असलेले हैदराबाद राज्य भारतामध्ये सामील होण्यासाठी तयार नव्हते. तेथील शासक निजाम हा स्वतंत्र राज्याची मागणी करत होता, किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा तरी त्याचा मानस होता.
मात्र भारताने पोलीस कारवाई अंतर्गत त्याचा हा मनसोबा उधळून लावला. आणि हैदराबादला भारतामध्ये विलीन करून घेतले. त्यामुळे भारताची अखंडता अबाधित राखण्यास मदत झाली. या दिवसाचे अवचित्य साधून दरवर्षी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन देखील साजरा केला जातो.
आजच्या भागामध्ये आपण या हैदराबाद मुक्तिसंग्रामाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. जेणेकरून आपल्या ऐतिहासिक घटनांबद्दल आपल्याला समजण्यास मदत होईल…
भारत स्वतंत्र झाला तरी देखील काही संस्थांने भारतामध्ये समाविष्ट झाली नव्हती. त्यासाठी वल्लभभाई पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दूरदर्शी कृत्य करत या सर्व संस्थांनांना भारतामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये तीन संस्थाने सामील होण्यासाठी नकार देत होती. यातिल दोन संस्थांनांना देखील सहजरित्या भारतामध्ये सामील करून घेतले गेले.
मात्र हैदराबाद संस्थान काहीही केल्या भारतामध्ये सामील होण्यासाठी ऐकत नव्हते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या अधिपत्याखाली एक योजना आखली, आणि ऑपरेशन पोलो अंतर्गत दिनांक १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान या ठिकाणी कारवाई केली.
त्यानंतर हा हैदराबादचा निजाम पाकिस्तानला पळून गेला, आणि हैदराबाद संस्थानाला भारतामध्ये सहभागी करून घेतले गेले. मात्र स्वातंत्र्यानंतर सुमारे १३ महिने आणि दोन दिवस एवढ्या मोठ्या कालावधीसाठी तेथील जनतेला या निजामाच्या अधिपत्याखाली राहावे लागले होते.
या नागरिकांच्या अर्थाने खऱ्या स्वरूपात १७ सप्टेंबर १९४८ हेच स्वातंत्र्य दिन समजले जाते. आणि त्यानंतर हैदराबाद मुक्त झाल्यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन या दिवशी साजरा केला जातो. या हैदराबाद संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागाचा देखील समावेश असल्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून देखील या दिवसाला ओळखले जाते.
जर सरदार वल्लभाई पटेल यांनी त्यावेळी दूरदर्शी दृष्टिकोनातून या हैदराबाद संस्थानाला भारतामध्ये सहभागी करून घेतले नसते, तर आज भारताचा नकाशा काहीसा वेगळा बघायला मिळाला असता. आणि भारताच्या एकजुटीला त्यामुळे नक्कीच धोका निर्माण झाला असता.
महाराष्ट्राचा देखील या संग्रामामध्ये मोलाचा वाटा असून, महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेशात असणारी नांदेड, जालना, हिंगोली, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, आणि परभणी यांसारखे अनेक जिल्हे या हैदराबाद संस्थानाच्या अधिपत्याखाली होते. जे १७ सप्टेंबर रोजी मुक्त झाले. म्हणून हा दिन महाराष्ट्रात देखील फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ज्याला मराठवाडा मुक्ती दिन म्हणून ओळखले जाते.
तेरा महिन्यांचा संघर्ष:
ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा लगेचच निजामाने आपले स्वतंत्र राज्य घोषित केले होते, आणि त्यांनी आपली हुकमी राजवट सुरू केली. मात्र येथील जनतेला हे मान्य नव्हते. दीडशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर येथील नागरिकांना देखील स्वातंत्र्य हवे होते, लोकशाही पद्धती हवी होती. मात्र निजाम येथे बेबंध शाही राबवत होता. आणि त्यांनी पाकिस्तान सोबत हात मिळवणी करण्याची बोलणी देखील सुरू केली होती.
जर आपण पाकिस्तान मध्ये गेलो, तर आपल्याला देखील खूप त्रास भोगावा लागेल, यामुळे येथील नागरिकांनी सशस्त्र उठाव करणे पसंत केले. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग फार मोलाचा होता.
शेतकऱ्यांनी आपल्या भूमीला पाकिस्तानच्या ताब्यामध्ये जाऊ न देण्यासाठी तब्बल १३ महिने संघर्ष केला. यामध्ये शेवटी पोलिसांनी देखील हस्तक्षेप केल्यामुळे या नागरिकांचे बळ अजूनच वाढले. आणि शेवटी निजाम हार पत्करून पाकिस्तानला पळून गेला. आणि अशा रीतीने हैदराबाद भारतामध्ये सामील होत, येथील जनता खऱ्या अर्थाने स्वतंत्र व मुक्त झाली.
हैदराबाद मुक्तिसंग्राम सुरू करण्यामध्ये रामानंद तीर्थ यांचा फार मोलाचा वाटा होता. त्यांनीच ही क्रांती सुरू केली होती. त्यांना निजामशाह भारतामध्ये नको होता. यासाठी त्यांनी तेथील नागरिकांना एकत्र करून सुसज्ज अशी सशस्त्र क्रांती सुरू केली. ज्या लोकांवर अत्याचार झाले, त्या लोकांनी यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवला.
त्यामुळे या लढ्याची व्याप्ती अल्पावधीतच फार मोठी झाली. या मुक्तिसंग्रामामध्ये भाऊसाहेब वैश्यपायन, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे, गोविंद भाई श्रॉफ, आणि देवीसिंग चव्हाण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांनी नेतृत्व करत या लढ्याला व्यापक स्वरूप मिळवून दिले होते.
त्याचबरोबर दगडाबाई शेळके, काशिनाथ कुलकर्णी, गोविंदराव पानसरे, हरिश्चंद्र जाधव, सूर्यभान पवार, जयंतराव पाटील, विश्वनाथ भिसे, शंकरराव जाधव, जनार्दन होरटीकर, श्रीधर वर्तक यांसारख्या अनेक लोकांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवत हैदराबाद मुक्ती संग्रामाला यश मिळवून दिले होते.
निष्कर्ष:
भारत हा एक अखंड देश असून यामध्ये सर्वजण गुण गोविंदाने नांदत असले, तरी देखील पूर्वीच्या काळी हा भारत देश छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेला होता. स्वातंत्र्यानंतर एकतेचे व अखंडतेचे महत्त्व अनेकांना लक्षात आले असले, तरी देखील काही अशी संस्थांने होती, ज्यांना स्वतंत्र राहणे पसंत होते.
मात्र भारताला मजबूत बनवण्यासाठी आणि भारताची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी त्यांना भारतामध्ये सहभागी करून घेणे फारच गरजेचे होते. ज्या संस्थानांनी सहजासहजी भारतामध्ये विलीन होण्यास मंजुरी दिली, त्यांना सामील करून घेतले गेले.
मात्र हैदराबाद सारख्या काही संस्थांनांनी त्याला विरोध दर्शविला. त्यामुळे सशस्त्र कारवाई करून या संस्थानांना भारतामध्ये सहभागी करून घेण्याची प्रक्रिया राबवली गेली. ज्यामुळे शेवटी नमुन या संस्थानाने भारतामध्ये विलीन होण्यास सहमती दर्शवली, आणि अशा रीतीने एक अखंड भारताची निर्मिती झाली.
पुढील काळामध्ये भारताला विविध राज्यांमध्ये विभागले गेले असले, तरी देखील भारताच्या अखंडतेला कुठेही धक्का पोहोचला नाही. आजच्या भागामध्ये आपण हैदराबाद मुक्तिसंग्राम याबद्दल माहिती बघितली असून, हा मुक्तिसंग्राम कशासाठी होता, त्याला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते, हा संघर्ष किती दिवस चालला इत्यादी गोष्टीबद्दल माहिती बघितली आहे.
FAQ
हैदराबाद मुक्ती संग्रामालाच अजून कोणत्या नावाने ओळखले जाते?
हैदराबाद मुक्ती संग्रामाला मराठवाडा मुक्ती दिन म्हणून देखील ओळखले जाते. कारण हैदराबाद संस्थांमध्ये मराठवाडा या महाराष्ट्राच्या भागाचा देखील समावेश होता.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन किंवा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन हा दिनांक १७ सप्टेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो. कारण या दिवशी हैदराबाद संस्थानाला भारतामध्ये विलीन करण्यात आले होते.
हैदराबाद संस्थानामध्ये कोणकोणत्या प्रदेशांचा समावेश होता?
हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटकचा उत्तर भाग, आणि विदर्भ इत्यादी प्रदेशांचा समावेश होता.
हैदराबाद संस्थान तेथील निजामाच्या ताब्यामध्ये कोणत्या कालावधीसाठी होते?
हैदराबाद संस्थान तेथील निजामाच्या ताब्यामध्ये इसवी सन १७२४ ते १९४८ दरम्यान होते.
हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी करण्यात आलेल्या कारवाईचे नाव काय होते?
हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी करण्यात आलेल्या कारवाईचे नाव ऑपरेशन पोलो, किंवा पोलीस कारवाई असे होते.