Ice Cream Information In Marathi आईस्क्रीम कोणाला आवडत नाही? उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या आईस्क्रीमचे सेवन केले जात असले, तरी देखील आज-काल थंडीच्या दिवसांमध्ये देखील तुम्हाला दुकानांमध्ये आईस्क्रीम उपलब्ध असते. मात्र योग्य वेळी व योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला आराम देणारी ही आईस्क्रीम अति प्रमाणात खाल्यास नुकसानदाएक देखील ठरु शकते. आईस्क्रीमच्या सेवनामुळे लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, अपचन इत्यादी विकार जाणू शकतात.
आईस्क्रीम ची संपूर्ण माहिती Ice Cream Information In Marathi
या आईस्क्रीम मध्ये दूध, चॉकलेट, चांगले घटक असले तरी देखील मोठ्या प्रमाणावर याचे सेवन करणे घातक ठरते. आठवड्यातून एकदा आईस्क्रीम खाणे चांगले आहे. मात्र प्रत्येक दिवशी आईस्क्रीम खाण्याची सवय असेल तर तुम्ही नक्कीच ही थांबवायला हवी. आजच्या भागामध्ये आपण आईस्क्रीम या सर्वांच्या आवडीच्या पदार्थाविषयी सखोल माहिती बघणार आहोत…
नाव | आईस्क्रीम |
प्रकार | खाद्यपदार्थ |
घटक | दूध, चॉकलेट, ड्रायफ्रूट, पाणी |
तापमान | थंड |
उपयोग | उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्याकरिता |
फायदे | रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, काम वासना वाढणे, मूड ठीक करणे |
आईस्क्रीम म्हणजे काय:
आईस्क्रीम म्हणजे बर्फाच्छादित केलेली क्रीम होय. यामध्ये दूध, साखर, विविध प्रकारचे फ्लेवर, आणि चव वाढवणाऱ्या पदार्थांना योग्य प्रमाणामध्ये एकत्र केले जाते. यापासून एक घट्ट क्रीम बनवली जाते. या क्रीमला फ्रीजरच्या साह्याने थंड केले जाते, व त्याचे बर्फामध्ये रूपांतर केले जाते. या क्रीमला बर्फाचे किंवा आईस चे स्वरूप दिल्यामुळे, याला आईस्क्रीम असे नाव देण्यात आलेले आहे. जो एक अमेरिकन पदार्थ आहे.
आईस्क्रीम खाल्ल्यामुळे होणारे फायदे:
अतिप्रमाणामध्ये आईस्क्रीम खाणे हानिकारक असते, असे आपण नेहमीच ऐकतो. मात्र ज्या वेळेला हा पदार्थ बनवला गेला त्यावेळी त्याचे आरोग्यदायी फायदे लक्षात ठेवूनच बनवण्यात आला होता. योग्य प्रमाणात खाल्ला तरी देखील आज सुद्धा या पदार्थापासून मोठे फायदे होतात.
या आईस्क्रीम मध्ये दुधाचे प्रमाण असल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या अनेक पोषक तत्व खायला मिळू शकतात. ज्या लोकांना दूध खाणे आवडत नाही, त्यांच्यासाठी आईस्क्रीम हा एक पर्याय ठरू शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम ऑफ फॉस्फरस असते, ज्यामुळे हाडांना देखील मोठा फायदा होत असतो.
त्याबरोबरच आईस्क्रीम मध्ये विटामिन बी असते, त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढविणे, पेशींचा झपाट्याने विस्तार करणे, नवीन उती तयार करणे, इत्यादी फायदे होत असतात. या आईस्क्रीम मध्ये आढळणारे विटामिन के किंवा जीवनसत्व क हे रक्तदाब नियंत्रित करणे, रक्त गोठण्याची प्रणाली योग्य रीतीने चालविणे, इत्यादी गोष्टींमध्ये फायदेशीर ठरत असते.
वजन कमी करण्याच्या कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आईस्क्रीम चा वापर केला जातो, कारण आईस्क्रीम खाल्ल्यामुळे व्यक्तीला भूक कमी लागत असते. त्यामुळे शरीरात जाणाऱ्या कॅलरीचे प्रमाण कमी होत असते. आणि उपलब्ध कॅलरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. मात्र केवळ दहा किलो वजन कमी करायचे म्हणून डब्याचे डब्बे आईस्क्रीम खाणे देखील चांगले नाही.
अनेक जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या त्रास देत असते. हार्वर्ड विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार आईस्क्रीम खाल्ल्यामुळे वंध्यत्वाच्या समस्येवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. त्यांनी सुमारे १८,००० महिलांवर हा प्रयोग करून असा निष्कर्ष काढला होता.
आईस्क्रीम मध्ये असणारे विविध घटक आणि जीवनसत्व शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य करत असतात. त्यामुळे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्हाला एनर्जेटिक वाटण्यास मदत मिळू शकते. साधारणपणे एक कप आईस्क्रीम पासून तुम्हाला १३७ कॅलरी ऊर्जा मिळत असते.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर सर्दी होते हे आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत. मात्र आईस्क्रीम खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होण्यास मदत होते. कारण नेहमी आईस्क्रीम खाल्ल्यामुळे काही कालावधीनंतर सर्दी होण्याचे प्रमाण घटते, हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचे किंवा मजबूत झाल्याचेच लक्षण असते. अगदी विषाणूपासून बचाव करण्यासाठी देखील आईस्क्रीम मुळे रोगप्रतिकारक शक्ती तयार होत असते.
आईस्क्रीम खाण्यामुळे होणारे तोटे:
मित्रांनो, अधिक प्रमाणावर आईस्क्रीम खाल्ली तर काही तोटे देखील होत असतात. ज्यामध्ये शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते, परिणामी रक्तामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात. आणि हृदयविकाराचा धोका देखील वाढू शकतो. आईस्क्रीमच्या कप मध्ये सुमारे २५ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आढळून येत असते.
आईस्क्रीमला गोडवा अन्यायाकरिता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शर्करा युक्त पदार्थांचे मिश्रण करण्यात येत असते, त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी हा धोका वाढू शकतो.
आईस्क्रीम चे सेवन मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे वृद्ध लोकांमध्ये मानसिक रित्या मंदपणा जाणवू शकतो. आईस्क्रीमचे फ्लेवरनुसार वेगवेगळे रंग आढळतात यापैकी जांभळा, लाल, किंवा गुलाबी रंगांची आईस्क्रीम खाल्ल्यामुळे काही लोकांना एलर्जी देखील जाणवू शकते.
निष्कर्ष:
पूर्वीच्या काळी कुल्फी हा प्रकार सर्रास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बघायला मिळत असे. या कुल्फीचा व्यवसाय करणारे लोक उन्हाळा वगळता इतर ऋतूमध्ये दुसरे काम करण्यास प्राधान्य देत असत. मात्र आजकाल दुकानांमध्ये अगदी कोणत्याही ऋतूमध्ये आईस्क्रीम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.
लहान मुलांना देखील अगदी लहानपणापासूनच या आईस्क्रीमची इतकी सवय लागते, की आईस्क्रीम खाण्याकरिता वेळ व ऋतू देखील बघितला जात नाही. आजच्या भागामध्ये आपण या आईस्क्रीम बद्दल विशेष माहिती बघितलेली आहे.
त्यामध्ये आईस्क्रीम म्हणजे काय, आईस्क्रीम खाण्यामुळे होणारे विविध फायदे, यामध्ये वजन कमी करणे, वंध्यत्वावर उपाय, एनर्जी लेव्हल वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, मूड चांगला बनविणे, मेंदूसाठी फायदेशीर, यासारखे फायदे बघितले आहेत.
त्याचबरोबर आईस्क्रीम खाण्यामुळे काही तोटे देखील होतात, त्यांची देखील माहिती घेतली आहे. यासोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरलेली असेल, त्यामुळे तुम्ही आईस्क्रीमचे सेवन मर्यादेमध्ये करण्यास सुरुवात कराल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
FAQ
आईस्क्रीमच्या नावाचा इतिहास काय आहे?
आईस्क्रीम हा शब्द सर्वात आधी अमेरिकेतल्या वसाहतवादी लोकांनी वापरला होता. त्यावेळी आईस्क्रीम ऐवजी आईस्ड क्रीम असा तो शब्दोल्लेख केला जाई. आईस टी या प्रकारावरून या नावाची प्रेरणा मिळाली असावी, असे देखील सांगितले जाते. क्रीम ला बर्फाच्या स्वरूपात करणे म्हणजे आईस्क्रीम असे ओळखले जाते.
आईस्क्रीम शरीरासाठी चांगली आहे का, व असेल तर त्याचे महत्त्व काय आहे?
योग्य प्रमाणामध्ये खाल्ल्यास आईस्क्रीम ही शरीरासाठी अतिशय चांगली ठरू शकते. योग्य प्रमाणात खाल्ल्यास आईस्क्रीम मधून आपल्याला कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळत असते. त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणे हे पचनास मदत करत असते. त्याचबरोबर शरीराला मजबूत ठेवणे, व शरीराला ऊर्जा देणे इत्यादी गोष्टींमध्ये देखील आईस्क्रीम चा फायदा आहे. त्याचबरोबर शरीराला थंडावा प्रदान करण्याचे कार्य देखील आईस्क्रीम द्वारे केले जाते.
आईस्क्रीम म्हणजे काय?
आईस्क्रीम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, दुधामध्ये क्रीम, साखर विविध फ्लेवर आणि बटर फॅट इत्यादी योग्य प्रमाणामध्ये एकत्र करून त्याला गोठविणे म्हणजे आईस्क्रीम होय. हा एक दुग्धजन्य प्रकारचा पदार्थ असून, आजकाल मात्र इतर पदार्थांपासून देखील आईस्क्रीमची निर्मिती केली जाते. आज आईस्क्रीम मध्ये चॉकलेट, स्ट्रॉबेरी, आणि व्हॅनिला हे सर्वात लोकप्रिय फ्लेवर असून, या व्यतिरिक्त देखील हजारो फ्लेवर्स आपल्याला उपलब्ध असतात.
आजच्या भागामध्ये आपण सर्वांची आवडीची असणारी गोष्ट किंवा पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आईस्क्रीम बद्दल माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडले असेल, याबाबत आम्हाला खात्री आहे. या माहितीतून तुम्ही काय बोध घेतला हे जाणून घेण्यास आम्ही फार उत्सुक असून, त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये लिहायच्या आहेत. सोबतच सारखे आईस्क्रीम खाणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांची आईस्क्रीम खाण्याची सवय देखील मर्यादा मध्ये येण्यास मदत होईल.