आईस्क्रीम रेसिपी मराठी Ice Cream Recipe In Marathi

आईस्क्रीम रेसिपी मराठी Ice Cream Recipe In Marathi  आईस्क्रीम हा दुधापासून तयार केलेला एक थंड पदार्थ आहे.  जो खायाला एकदम स्वादिष्ट पदार्थ आहे.  यामध्ये वेग वेगळे प्रकार असतात, जसे व्हॅनिला, चॉकलेट, मँगो आईस्क्रीम हे सर्व प्रकार एकदम स्वादिष्ट आहेत.  लहान मुलांना आईस्क्रीम जास्त आवळते.  आईस्क्रीम बनवताना आपण वेग-वेगळा फ्लेवर टाकून वेग-वेगळी आईस्क्रीम बनवू शकतो.  आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले असेल खूप स्वादिष्ट आणि चवदार आईस्क्रीम खायाला मिळते.

आईस्क्रीम हा एक शुध्द शाकाहारी पदार्थ आहे.  काही लोकांना आईस्क्रीम खूप आवळते, पण त्याचा परिसरात स्वादिष्ट आईस्क्रीम मिळत नाही, आणि काही लोक बाहेर जाऊन खाऊ शकत नाही.  अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने स्वादिष्ट आईस्क्रीम कशी बनवतात यांची रेसिपी.  आता आपण आईस्क्रीम रेसिपी पाहणार आहोत.

Ice Cream Recipe In Marathi

आईस्क्रीम रेसिपी मराठी Ice Cream Recipe In Marathi

आईस्क्रीमचे प्रकार :

आईस्क्रीम हा एक थंड पदार्थ आहे, जो सर्वाना आवळतो.  आईस्क्रीम वेग-वेगळ्या प्रकारे बनवली जाते.  जसे व्हॅनिला आईस्क्रीम, चॉकलेट आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम, पिस्ता आईस्क्रीम, साधी आईस्क्रीम हे सर्व आईस्क्रीमचे प्रकार आहेत.  हे सर्व प्रकार खायाला एकदम स्वादिष्ट आहेत.

किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?

आईस्क्रीम ही रेसिपी आपण 7 व्यक्तिकरिता बनवणार आहे.

आईस्क्रिम पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :

आईस्क्रिम तयार करण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते.  व सर्व साहित्य एकत्र करावे लागते, यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

आईस्क्रीम कुकिंग करायला 4 तास वेळ लागतो.

टोटल टाईम :

आईस्क्रीम तयार करण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते, नंतर कुकिंग करावी लागते.  यासाठी आपल्याला टोटल टाईम 4 तास 20 मिनिट वेळ लागतो.

आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :

1) 1 लिटर दूध.

2) 1 वाटी साखर.

3) अर्धी वाटी कस्टर्ड पावडर.

4) 1 वाटी काजू, बदाम, पिस्ता तुकडे.

5) 1 चमचा व्हॅनिला इसेन्स.

6) 1 वाटी मलाई.

पाककृती :

  • सर्वात प्रथम एका खोल भांडे घ्या, त्यामध्ये 4 कप दूध आणि कस्टर्ड पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • हे मिश्रण चांगले मिक्स करून त्यातील गाठी फोडून एकदम पातळ बनवून घ्या.
  • आता एक खोल तळाचे भांडे घ्या, गॅस चालू करून मध्यम आसेवर गॅस वरती ठेवा.
  • या भांड्यात दूध टाका, आणि यासोबत कस्टर्ड पावडरचे पातळ तयार केलेले मिश्रण टाका.
  • पावडर मिक्स केलेले दूध गरम करा. आणि सतत ढवळत रहा.  यामुळे दुध खालून जळणार नाही.
  • दूध चांगले गरम झाले की, त्यामध्ये 1 वाटी साखर टाका, तुम्हाला जास्त गोड आईस्क्रीम आवळत असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता.
  • दूध थोडे घट्ट झाले की, गॅस बंद करा. आणि हे मिश्रण थंड होऊ द्या.
  • आता एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी मलाई आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून एकदा फिरवून घ्या.
  • आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवली आहे, तुम्ही यामध्ये दुसरे फ्लेवर टाकून वेग-वेगळी आईस्क्रीम बनवू शकतो.
  • आता ही मलाई थंड झालेल्या दुधात टाकून, व्यवस्थित मिक्स करा, ही मलाई दुधात पूर्ण एकजीव झाली पाहिजे.
  • नंतर एका हवाबंद डब्यात भरून झाकण बंद करा, आणि फ्रीजमध्ये हाॅय कोल्ड मोडवर 3 ते 4 तास ठेवा.
  • 3 ते 4 तासाने आईस्क्रीम एकदम घट्ट आणि थंड होणार, तेव्हा आपली आईस्क्रीम झाली समजावी.
  • आता आपली स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे.  एका छोट्या वाटीत घेऊन, त्यावर थोडे काजू, बदामचे तुकडे टाकून आपण आईस्क्रीम खाऊ शकतो.

आईस्क्रीममध्ये असणारे घटक :

आईस्क्रीम ही दुधा पासून बनवली जाते, यामध्ये विविध घटक असतात.  यामध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, प्रथिने, फॅट, चरबी असे अनेक पौष्टिक घटक आहेत.  हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

फायदे :

आईस्क्रीम ही दुधापासून बनलेली असते, त्यामुळे आपण जर ही जेवण झाल्यावर खाल्ली तर अन्न पचन करण्यास मदत होते.

यामध्ये असणारे घटक फॅट, चरबी, शुगर आपल्या शरीराची वाढ करतात, आणि शरीरावर चरबीचे प्रमाण वाढवतात.

यातील व्हिटॅमिन लोह आणि प्रथिने आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत.

तोटे :

आईस्क्रीम हा एक थंड पदार्थ आहे.  जो आपण जास्त प्रमाणात सेवन केला तर, आपल्याला दातदुखी होऊ शकते.

यामध्ये असणारे घटक आपण जास्त प्रमाणात सेवन केले तर आपण आजारी पडू शकतो.

म्हणून आईस्क्रीम आपण योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे, ज्यामुळे आपण निरोगी राहू.

तर मित्रांनो, तुम्हाला आईस्क्रीम रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment