If I Were A Prime Minister Essay In Marathi जर मी भारताचे पंतप्रधान झालो तर मी भारताला एक बळकट देश बनविण्याचा प्रयत्न करेन. मी भारतीय सैन्यांना जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यबळ बनवल्याचा प्रयत्न करेन. तसेच मला भारतातून दारिद्र्य, आणि बेरोजगारी हटवायचे आहे, याशिवाय, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे मी शेती सुधारण्याच्या दृष्टीने योग्यपणे पावले उचलणार, जेणेकरून कोणताही शेतकरी दारिद्र्य मध्ये राहणार नाही. मी गरीब लोकांना पेन्शन व बेरोजगारी भत्ता देईल.
मी पंतप्रधान झालो तर… मराठी निबंध If I Were A Prime Minister Essay In Marathi
माझी इच्छा आहे की मी भारताचा पंतप्रधान आल्याने माझ्या नंबर स्वभावाच्या मदतीने देशाची सेवा करावी. देशाचे कल्याण करण्यासाठी मी सर्वप्रथम प्रयत्न करेल. दिवसेंदिवस आपल्या देशात गरीब आणि दडपलेल्या जनतेचा विचार करेन.
माझ्या अगदी लहानपणापासून मी पंतप्रधान बनण्याचे स्वप्न होते. माझ्याकडे काही कल्पना आणि आदर्श आहेत ज्या मी पंतप्रधान झाल्यानंतर करू इच्छिते. मला भारत देश एक उत्कृष्ट देश बनवायचा आहे ,आणि सर्व वाईट गोष्टींपासून भारताला मुक्त करायचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी प्रशासनाला आकर्षण ठरलेल्या भ्रष्टाचार तपासून घेईन.
भारतात असे काही विषय नोकरदार वर्ग आहे किंवा राजकीय नेते आहेत मोठ्या पदावर असलेले राजकीय नेते , आपल्या भारत देशाला व जनतेला लुटून खातात त्यामुळे जीवनातील नैतिक मूल्यांमध्ये घट होत आहे. देशाच्या विकासाच्या या व प्रगतीच्या मार्गामध्ये हा खूप मोठा अडथळा आहे.
त्याचबरोबर देशातील विविध भागात मी लघुउद्योग स्थापित करीन. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणारा काळाबाजार बंद करेल. तसेच जे भ्रष्टाचार करतात त्यांच्यावर कडक निर्बंध व शिस्त लावेल. मग तो मंत्री असो वा साधारण व्यक्ती सरकारच्या देशाची मैत्री करून शांतता प्रस्थापित करेल.
गरिबी भारतासाठी फार मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकानंतरही आपल्या भागातील नागरिकांना पुरेशा अशा कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे श्रीमंत व्यक्ती ही अजून श्रीमंत होत चालले आहे आणि गरीब अजून गरीब होत चालले आहे. भारत देश हा जगातील सर्वात गरीब देश आहे ही गोष्ट आमच्यासाठी खूप लाजिरवाणी आहे.
आता संख्येने लोकांना अन्न शिवाय झोपावे लागते. उन्हाळ्यामध्ये अति दुर्गम भागांमध्ये पिण्याची पाण्याची खूप टंचाई उद्भवते. तेथील स्थानिक लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी खूप मैल दूर जावे लागते. त्यामुळे मी या भागात पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर सुरू करेल.
आपल्या भारतासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे आपल्या देशातील निरक्षरता आहे. आपल्या भारतात सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या अशिक्षित आहे त्यांना कसे लिहायचे आणि काय लिहायचे ते अजूनही माहित नाही. त्यामुळे निरक्षरता आणि दारिद्र्य बऱ्याच सामाजिक दुष्कर्म वाढीसाठी एक मोठे कारण होऊ शकते देशाच्या प्रगतीमध्ये खंड आणणाऱ्या अशा गोष्टी मी हटवण्याचा प्रयत्न करेल.
मी पंतप्रधान झाल्यास शिक्षणाच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम घेईल. मी सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य करेन. भारत देश प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे .लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांहून अधिक लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत, तसं पाहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल कि भारतातील शेती मागासलेली आहे ,आणि जास्तीत जास्त ठिकाणी केली जाणारी शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
येथे पाऊस अनिश्चित आणि अवकाळी आहे .एकूणच मागासलेपणा आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यास कारणीभूत ठरणारा हा एक मुख्य घटक आहे .याशिवाय ,पंतप्रधान म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे सक्षम आणि स्थिर मंत्रिमंडळ तयार करणे असेल मी कॅबिनेट मंत्र्यांच्या कर्तव्याच्या वितरणाला अधिक प्राधान्य देईल.
भारतातील दिवसेंदिवस वाढत असणारी लोकसंख्या नियंत्रण करण्याकडे विशेष भर देईन त्यानंतर कृषी, उद्योग ,तेल ,उत्पादन ,खाणकाम ,निर्यातीत वाढ इत्यादी महत्त्वाच्या आणि उत्पादन क्षेत्रामध्ये लक्ष देऊन त्यांच्या विकासात भर होण्यासाठी विशेष योजना देखील राबवेल.
गरीब जनतेला सरकारी दवाखाना यांचा लाभ घेता येईल असे धोरण ठेवील म्हणजेच गरीब जनता कमीत कमी पैशात कोणत्याही बिमारी चा इलाज सहजतेने करू शकते .मानव जातीच्या कल्याणासाठी मी आपल्या रीतीने सर्वांना रोजगार उपलब्ध करून देईल.
मी पंतप्रधान झाले तर ‘सामान्य माणसाला सुखी करणे व देशाचा विकास साधणे’ या दोन गोष्टी सतत माझ्या दृष्टीसमोर ठेवते देशाच्या कल्याणासाठी कोणतेही धोरण ठरवताना व ते कार्य निर्मित करताना त्या धोरणाच्या संबंधित विषयावर अभ्यास करणाऱ्या विद्वानांची तसेच संबंधित खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चर्चा करेन आणि योजनेफायदे- तोटे लक्षात घेईन.
मी प्रत्येक मंत्र्याचे ज्ञान व अनुभव लक्षात घेऊन खाते वाटप करेल अशा पद्धतीने में पंतप्रधान झाले तर भारताचा राज्यकारभार सुरळीत पणे चालविण्याचा प्रयत्न करेल आणि भारत देशाला उच्च स्तरावर नेण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे.