मी मुख्याध्यापक झालो तर…मराठी निबंध If I were Headmaster Essay in Marathi

If I were Headmaster Essay in Marathi आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हे योग्य आणि प्रतिभाशाली व्यक्ती आहेत त्यांच्या कामात ते खूपच काटेकोर आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचा मान सन्मान केला जातो त्यांना पाहिलं की माझ्या मनात विचार येतो की मी मोठा होऊन या शाळेचे मुख्याध्यापक पद मिळाले तर मी या आमच्या शाळेचा मुख्याध्यापक झालो तर.

If I were Headmaster Essay in Marathi

मी मुख्याध्यापक झालो तर…मराठी निबंध If I were Headmaster Essay in Marathi

खरंच, मी मुख्याध्यापक झालो तर आमच्या शाळेला या शहरातील एक सर्वात चांगली शाळा बनवण्याचा प्रयत्न केला असता. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीचे ज्ञान मिळावे यासाठी खूप मी कुशल कार्यक्षम, आणि प्रत्येक विषयामध्ये जे उत्तम शिक्षक आहेत.

त्यांची नियुक्ती शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केली असती आणि विज्ञान या विषयाकडे जास्त लक्ष दिले असते त्यासाठी शाळेमध्ये असणाऱ्या प्रयोग शाळेचे रुपांतर एका मोठ्या सुसज्ज आणि आधुनिक प्रयोगशाळेत करण्याचा प्रयत्न केला असता शाळेच्या ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी सगळी पुस्तके उपलब्ध करून दिली असती.

विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य सुधारण्यासाठी आणि त्यांना विविध भाषा अवगत होण्यासाठी वर्तमानपत्रे उपलब्ध करून दिली असती जेणेकरून वाचना बरोबर त्यांना चालू घडामोडी बाबत देखील माहिती मिळाली असती विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना मुलांना चित्रकला संगीत आणि संगणक प्रशिक्षण यांचे विशेष वर्ग चालू केले असते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे मी विशेष लक्ष दिले असते आमच्या विद्यालयात वेळोवेळी वाद-विवाद स्पर्धा ,निबंध स्पर्धा, तसेच वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा यांसारख्या स्पर्धा वेळोवेळी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला असता .त्याच बरोबर विशेष दिवशी तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यावर भर दिला असता.

एखाद्या शाळेत च्या मुख्याध्यापकाचे पद खूप महत्त्वाचे असते कोणत्याही शाळेची प्रगती मुख्याध्यापका वरच अवलंबून असते मुख्याध्यापक हा शाळेचा मुख्य बिंदू असतो व त्याच्या आजूबाजूलाच शाळेतील सर्व गोष्टी केंद्रीभूत असतात मुख्याध्यापकाच्या रूपात माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या असतील माझे मान्य मान्य आहे की कोणताही विद्यार्थी शिस्तीशिवाय आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही म्हणूनच मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त बनवून ठेवण्याचा प्रयत्न करेल.

परंतु शिस्तीचे नियम फक्त विद्यार्थ्यांवर अस लागू होत नाही मुलांमध्ये ही शिस्त शिक्षण व मुख्याध्यापकांना पाहूनच येते सर्वात आधी मी स्वतः शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी वर्गाला शिस्तीचे धडे देत महात्मा गांधी संगत असे की आपण तोपर्यंत शिस्तीचे धडे देऊ शकत नाही जोपर्यंत आपण स्वतः शिस्तीचे पालन करत नाही.गांधीजींच्या याच म्हणण्यानुसार मी स्वतः मध्ये शिस्त   आणली असते त्यानंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांना शिस्तीत राहण्यासाठी सांगितले असते.

मुख्याध्यापक झाल्यावर माझे दुसऱ्या कार्य विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे राहील त्यांच्यात नैतिक मूल्यांना वाढवू उत्तम चारित्र्य व व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मी प्रयत्न केले असते आपल्या देशात आज चारही बाजूंना नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आ.हे चोरी ,असंतोष व्याभिचार ,धार्मिक दंगे ,लूटपाट इत्यादी घटना दिवसेंदिवस वाढत आहे या घटना कमी करण्यासाठी आवश्यक य आहे की विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण द्यायला हवे.

आजचे युग संगणकाचे युग आहे दिवसेंदिवस संगणकाचा वापर वाढत आहे म्हणूनच मुख्याध्यापक झाल्यावर माझे कार्य विद्यालयात संगणक शिक्षणावर भर देणे राहील फक्त माध्यमिक इयत्तेतील विद्यार्थ्यांनाच संगणक न शिकवता प्राथमिक इयत्तेपासून संगणक प्रशिक्षण अनिवार्य करेल.

मुख्याध्यापक झाल्यावर व्यायाम व खेळाकडे माझे विशेष लक्ष राहील ,आजच्या काळात व्यायामाचे महत्त्व भरपूर आहे कारण यामुळेच व्यक्तीचा शारिरीक व मानसिक विकास होतो म्हणूनच माझा शाळेच्या अभ्यासाशिवाय खेळणे व व्यायाम करण्यावर देखील भर देईल व मी मुलाना संसृतिक कार्यक्रमांमद्धे भाग घेण्यास देखील प्रोत्साहित करेन.

अशा पद्धतीने मुख्याध्यापकाच्या रूपात मी पूर्ण निष्ठेने माझे कार्य पार पडेल माझ्या शाळेत अशी शिक्षणपद्धती निर्माण करेल जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षणासोबत देशाविषयी प्रेम आणि आपल्या संस्कृतीविषयी आदर निर्माण होईल.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment