सूर्य मावळला नाही तर…मराठी निबंध If Sun Doesnt Sets… Essay In Marathi

If Sun Doesnt Sets… Essay In Marathi सूर्य ……मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या, जून महिना उजाडला. जून महिना म्हणजे शाळा सुरू होण्याची लगबग. शाळेचा पहिला दिवस मी शाळेत गेलो. शाळेत जात असताना एवढे प्रखर ऊन होते की, अंगाची लाही लाही झाली .सर्व मुलांची सुद्धा हीच अवस्था होती. सर्व अंग घामाने ओलेचिंब झाले होते .

If Sun Doesnt Sets... Essay In Marathi

सूर्य मावळला नाही तर…मराठी निबंध If Sun Doesnt Sets… Essay In Marathi

गर्मीने हैराण  झाले होते. वातावरणातील उष्णता खूप वाढली होती. एवढ्या झळया जाणवत होत्या. किती कडकडीत ऊन आहे ?हा कडकडीत उन्हाळा कधी संपेल? असे अनेक प्रश्न यावर आमच्या मित्रांमध्ये चर्चा चालली होती.
अशा वेळी माझ्या मनात एक विचार आला की, सूर्य मावळला नाही तर ? या प्रश्नाने मला भारावून टाकले नंतर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करू लागलो.

सूर्य हा पृथ्वीवरील असा एकमेव नैसर्गिक ऊर्जा व उष्णतेच्या प्रमुख स्त्रोत आहे. त्याच्या पासून मिळणारी उष्णता ही अमर्याद असते. सूर्य हा पृथ्वीवरील नाही तर आकाश गंगेतील ऊर्जेचा एकमेव स्त्रोत आहे. सूर्य मावळला नाही तर किती मज्जा येईल ,सगळीकडे प्रकाशच प्रकाश दिसेल. सूर्य मावळला नाही तर अंधार होणार नाही. मला दिवसभर खेळता येईल, कारण अंधार पडला नाही तर मला आई आवाज देणार नाही.

कारण खेळायला गेलो.अंधार पडला की ,आई लगेच आवाज देते. अंधार पडला, आता खेळ थांबवा व घरात या!तसेच अंधार पडला नाही तर, दिवसभर प्रकाश राहील. त्यामुळे विजेची बचत होईल व विजेचा वापरही कमी होईल .सौर ऊर्जेचा वापर जास्त केला जाईल.

या झाल्या चांगल्या गोष्टी पण, नंतर मला एक विचार आला की सूर्य मावळला नाही तर.. त्याचे वाईट परिणाम होतील व त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील हे खरे ! आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागेल. बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागेल.

सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे. आपल्या शरीराला उर्जा मिळण्यासाठी सूर्याच्या किरणांचा उपयोग होतो. सूर्य मावळला नाही तर.. रात्र होणार नाही, रात्र झाली नाही तर आपण झोपणार कधी! जे लोक दिवसभर काम करतात ते फक्त रात्रीच्या वेळेस शांत झोपू शकतात.त्यांना आराम मिळतो.

सूर्य मावळला नाही तर… ते आराम कधी करणार .ते दिवसभर काम करू शकत नाही. आपल्या शरीराला काम करण्याची शक्ती येण्यासाठी झोप व आराम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सूर्य मावळतो व सकाळी पुन्हा उगवतो.  सुर्य उगवल्यानंतर रमणीय दृश्य आपल्याला पाहता येणार नाही.

सकाळी सुर्य उगवल्यानंतर येणारा तो पक्षांचा किलबिलाट, कोंबड्यांची आरोळी या गोष्टींना आपल्याला मुकावे लागेल. सूर्य जर असाच तापत राहिला तर, पृथ्वीवरील तापमानात वाढ होईल. व पाण्याचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होऊन पृथ्वीवरील नद्या ,विहिरी, तळे हे जलस्त्रोत कोरडे होतील व त्यामुळे आपल्याला दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

अतिउष्णतेमुळे झाडेझुडपे सुकून जातील. त्यामुळे प्राण्यांना खायला अन्न उरणार नाही ते उपाशी राहतील. आपण जगतो ते ऑक्सिजन मुळे ! हा ऑक्सिजन आपल्याला मिळतो झाडांपासून !सूर्य मावळला नाही तर..पाऊस पडणार नाही व झाडांना पाणी न मिळाल्यामुळे ती झाडे मरून जातील.

झाडे नसल्यावर आपल्याला ऑक्सिजन भेटणार कुठून ?बाष्पीभवन झाल्यामुळे जमिनीवरील पाणी आटून जाईल व पाणी नसल्यामुळे वातावरणात बदल  होईल व नैसर्गिक चक्र हे बदलून जाईल. त्यामुळे पाऊस कसा पडेल? पाऊस पडला नाही तर.. शेतकरी शेतात पीक कसा घेऊ शकेल.शेतात धान्य पिकले नाही तर सर्वजण उपाशी राहतील. पाणी हे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे वेगवेगळ्या पक्षांचे आवाज आपल्या कानावर पडणार नाहीत .

सूर्य मावळला नाही तर ,पक्षी त्याच्या घराकडे परत कशे जातील. सूर्य मावळला नाही तर .. रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे चंद्र-तारे आपल्याला दिसणार कसे ?आपल्या सर्व गोष्टी या सूर्य उगवण्यावर व मावळण्यावर अवलंबून आहेत.

निसर्गाचे चक्र व्यवस्थित चालू राहणे हे खूप गरजेचे आहे .त्यामुळे सूर्य उगवणे व सूर्य मावळने या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सूर्य मावळला नाही तर ,ही कल्पना चांगली आहे.परंतु  अस्तित्वात कधीच येऊ नये.कारण याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल हे खरे !

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment