मी शिक्षणमंत्री झालो तर…मराठी निबंध If Were A Education Minister Essay In Marathi

If Were A Education Minister Essay In Marathi मी शिक्षण मंत्री झालो तर भविष्यामध्ये असे काही अमुलाग्र बदल घडवून आणील की त्यामुळे देशाला चांगले नागरिक उत्कृष्ट शिक्षक प्रभावशाली उत्तम नेते कुशल डॉक्टर आणि सत्याच्या मार्गावर चालणारे नागरिक मिळतील .त्यामुळे आपला देश विकसनशील ते कडून असेल ते कडून विकसित होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करेल.

If Were A Education Minister Essay In Marathi

मी शिक्षणमंत्री झालो तर… If Were A Education Minister Essay In Marathi

मला कधी कधी वाटते आपण शिक्षण मंत्री व्हावे खरेच तसे झाले ना ,तर मी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र घडवून आणेन सगळ्यात प्रथम मी आजची रटाळ शिक्षण पद्धती बदलून टाकेल. शिक्षण हे आनंददायी असले पाहिजे शिक्षण घेणे गरिबांना परवडत नाही.

अनेकदा हुशार विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. कधी- कधी तर कोवळ्या वयातील मुलांना अर्धवेळ काम करून परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. ज्याच्याजवळ गुणवत्ता आहे पण पैसा नाही अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा देईल बऱ्याचदा धन दांडगी मुले गुणवत्ता नसतानाही केवळ पैशाच्या जोरावर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी प्रिय कोर्ससाठी नामांकित  महाविद्यालयात मध्ये प्रवेश घेतात. पण ते शिकत  तर काहीच नाहीत उलट कॉलेजमध्ये इतरांना त्रास देऊन वेठीला धरतात अशावेळी वाटते, काय हा शिक्षणाचा खेळखंडोबा! तो मी पहिला बंद करीन.

चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, संगीत, वाद्यवादन, हस्तकला, लघुउद्योगासाठी, विविध वस्तू तयार करणे बेकरी ,बागकाम, शेती ,मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन, यांसारखे कितीतरी विषय लहानपणापासूनच शिकवले तर मुलगा मोठेपणी त्यात या कलेत पारंगत होईल.

आजकाल प्रत्येकाला एकाच प्रकारचे शिक्षण सक्तीने घ्यावे लागते .बर्‍याचदा नावडत्या विषयांचा अभ्यास करावा. लागल्यामुळे शिक्षण कंटाळवाणे वाटते .त्यामुळे अपयश पदरात पडते मग निराश होऊन मुले शाळा सोडतात अशावेळी वाटते शाळेतील अभ्यासक्रमात आवडीचा विषय शिकविण्याची सुविधा का नसावी.

पूर्वी कुटुंबातील व्यवसायात मुले लहानपणापासूनच तरबेज असायची. आता त्याच पद्धतीत तिने अत्याधुनिक तंत्राचा वापर करून शिक्षण दिल्यास समाजाला त्याचा अधिक लाभ होईल अशा शिक्षणासाठी खर्च खूप लागतो .त्याची तरतूद करून मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करेल त्यात परिस्थितीनुसार योग्य तो बदल करेन.

हे शिकवता शिकवता त्याला अक्षर ओळख भाषा गणित हे विषय शिकवावेत सध्या कार्यानुभव हा दुय्यम विषय आणि अभ्यासाचे विषय मुख्य आहेत. मी शिक्षण मंत्री झाल्यास हे चित्र नक्कीच बदलून टाकेल आणि सर्व शिक्षण संगणकीय पद्धतीने देण्याची सोय करेल.

आजकाल इंग्रजी माध्यमाचे महत्व वाढत चालले आहे. त्याऐवजी मातृभाषेत दोन प्राथमिक शिक्षण अनिवार्य करेल आणि परकीय भाषा ची ऐच्छिक असेल, उत्तम वाचन करण्यासाठी उत्तम पुस्तके कमीत कमी उपलब्ध करून देईल त्यातून वाचन संस्कृतीचा विकास होईल.

कामचुकार किंवा गुणवत्ता नसलेले शिक्षक नोकरी करण्यास अपात्र ठरवले जातील.

या क्षेत्रात येणार्‍या प्रत्येक शिक्षक सक्षम असला पाहिजे असा आग्रह धरणे विद्यार्थ्यांना कसलेही वाटेल ते ही फॅशन असलेले कपडे घालण्यास बंदी असेल.

गणवेश यामुळे समता निर्माण होते ,त्यातून एकतेचे दर्शन होते हा विचार मी विद्यार्थ्यांना पटवून देईल पण त्याच बरोबर गणवेश खरेदीतून संस्था फायदा उठवतात. त्यावर मात्र अंकुश ठेवला जाईल मुलींसाठी व मुलांसाठी योग्य असा गणवेश असला पाहिजे असा माझा आग्रह नक्की असेल.

सर्वात प्रथम मुलांच्या पाठीवर चे दप्तराचे ओझे ,उतरवुन त्याजागी आवडीचे ओझे येईल याची व्यवस्था करीन केवळ चार भिंतीत बंदिस्त शिक्षण घोकंपट्टी, व स्मरणशक्तीवर ,आधारित शिक्षण बंद होईल मुलांच्या कलागुणांना व अभिरूचीला वाव मिळेल याची दक्षता घेईल.

परीक्षेसाठी पुस्तक- परीक्षण असा एक विषय ठेवेल याचे वाचन अधिक त्याला अधिक गुण दिले जातील पण शिस्त पत्रके प्रगती पुस्तके यातील गुण केवळ लेखी परीक्षेतील नसतील .तर त्यात आरोग्य चारित्र्य कला मूल्य सामान्यज्ञान यांचाही विचार केला जाईल.

मनोरंजनातून शिक्षण, आनंदासाठी शिक्षण, जीवनोपयोगी शिक्षण, अशी असेल शिक्षण पद्धती .अरे हो पण हे सगळे केव्हा ?जर मी शिक्षण मंत्री झालो तर.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment