भारतीय हवाई दला विषयी संपूर्ण माहिती Indian Air Force Information In Marathi

Indian Air Force Information In Marathi लहानपणी आकाशामध्ये विमान उडताना दिसले, की प्रत्येकालाच या विमानांमध्ये बसण्याची किंवा विमान उडवण्याची इच्छा होत असे.  गमतीने प्रत्येक जण मला पायलेट व्हायचे आहे असे देखील सांगत असे, मात्र या क्षेत्रात नोकरीसह देशाची सेवा करायला मिळाली तर किती छान होईल. अशीच एक नोकरी किंवा करिअर म्हणून भारतीय एअर फोर्स, अर्थात हवाई दलाला ओळखले जाते.

Indian Air Force Information In Marathi

भारतीय हवाई दला विषयी संपूर्ण माहिती Indian Air Force Information In Marathi

भारतीय वायुसेनेमध्ये काही विशिष्ट पात्रता पूर्ण केलेला कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. यामध्ये करिअर केल्यास व्यक्ती अतिशय प्रतिष्ठेच्या क्षेत्रात प्रवेश करू शकतो. या दलामध्ये सहभागी होण्याकरिता काही प्रवेश प्रक्रिया व परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. यानंतर तुम्हाला तेथील प्रशिक्षण देऊन नोकरीमध्ये सहभागी करून घेतले जाते.

प्रवेश घेण्याच्या बाबतीत अनेक चाचण्या द्याव्या लागतात, त्यामध्ये गट चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, वैद्यकीय चाचणी, मुलाखत या प्रकारांचा समावेश असतो. या सर्व पायऱ्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला भारतीय हवाई दलामध्ये सहभागी करून घेतले जाते, मात्र या पायऱ्या पार करणे सोपे नाही. या क्षेत्रातील चांगले ज्ञान असणारे व्यक्तीच येथे उत्तीर्ण होऊ शकतात. आजच्या भागामध्ये आपण हवाई दलाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावभारतीय हवाई दल
प्रकारसुरक्षा सेना
स्थापना दिनांक ८ ऑक्टोबर १९३२
सदस्य संख्यासुमारे १,७०,०००
ब्रीदवाक्यनभः स्पृश्यं दिप्तम
मुख्याधिकारीवीरेंद्र सिंग धनोआ
मुख्यालयनवी दिल्ली

भारताने १९१८ या वर्षी भारतीय हवाई दलाची स्थापना केली असली, तरी देखील या दलामधील संपूर्णतः प्रशिक्षित असणारी वैमानिकांची पहिली तुकडी बाहेर पडायला १९३३ हे साल उजाडावे लागले. आणि या तुकडीच्या आधारेच भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती.

पहिल्या महायुद्धानंतर युद्धाचे स्वरूप फार मोठ्या प्रमाणावर बदलले होते, जे हवाई स्वरूपाचे होऊन अतिशय विनाशकारी स्वरूप धारण केलेले होते. या काळामध्ये फ्रान्स, जर्मनी, रशिया, ब्रिटन, अमेरिका यांसारख्या देशांनी हवाई मार्गातून युद्ध खेळण्यास सुरुवात केली होती.

त्यामुळे इंग्रजांनी देखील भारतीय हवाई दलाची स्थापना करून, भारतामध्ये या अंतर्गत सैन्य भरती केली होती. सर्वात प्रथम भारतीय हवाई दलाचे मुख्यालय लाहोर येथे बनवण्यात आले होते. याकरिता जपान बरोबर भारताने फार मोठे युद्ध देखील सुरू केले होते.

भारतीय हवाई दलाची संघटना:

भारतीय हवाई दल हे खूपच कार्य आणि कर्तव्य तत्पर असून, जगभरामध्ये शिस्तीच्या कारणासाठी भारतीय हवाई दलाला ओळखले जाते. या भारतीय हवाई दलाच्या प्रमुख अधिकारी व्यक्तीला एअर मार्शल चीफ या नावाने ओळखले जाते. त्याचबरोबर त्यांच्या दिमतीला एयर मार्शल या दर्जाचे काही उच्च पदस्थ अधिकारी देखील नेमलेले असतात.

योग्य रीतीने कार्य करता यावे, याकरिता एअर फोर्स अर्थात हवाई दलाची अनेक समदेशांमध्ये विभागणी करून, त्यांना वेगवेगळे कार्य सोपवलेले आहे. या वेगवेगळ्या समदेशांचे प्रमुख किंवा मुख्य व्यक्ती म्हणून ए ओ सी आय सी अर्थात एयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ या व्यक्तीला ओळखले जाते. पुन्हा या समदेशांना युनिट, विंग, स्टेशन, यांसारख्या विविध छोट्या घटकांमध्ये विभाजित केले जाते. त्यामुळे कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देताना संपूर्ण सेना क्षणार्धात सक्रिय होण्यास मदत मिळत असते. त्याचबरोबर या संपूर्ण हवाई दलामध्ये समन्वय राखण्यात देखील अतिशय फायदा होत असतो.

भारतीय हवाई दलामध्ये सहभागी होण्याकरिताच्या पात्रता:

किमान बारावी इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दलामध्ये सहभागी होता येते. मात्र त्याकरिता विज्ञान विषयांतर्गत रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित इत्यादी विषयांचा अभ्यास केलेला असावा. जीवशास्त्राचा अभ्यास टाळाला असेल तरीदेखील असा उमेदवार भारतीय हवाई दलामध्ये सहभागी होण्यास पात्र ठरत असतो.

मात्र या अभ्यासक्रमामध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणे क्रमप्राप्त ठरते. त्याचबरोबर या ठिकाणी वयाची देखील अट ठेवलेली असून साडेसोळा ते एकोनाविस वर्षांच्या दरम्यान असलेले उमेदवार किंवा विद्यार्थी एन डी ए ची परीक्षा देऊन भारतीय हवाई दलामध्ये सहजरित्या सहभागी होऊ शकतात. सोबतच शारीरिक पात्रता पूर्ण करणे देखील बंधनकारक करण्यात आलेले असून, पदांच्या नुसार ही पात्रता बदलत असते.

भारतीय हवाई दलामध्ये सहभागी होण्याकरिता च्या पायऱ्या:

भारतीय हवाई दलामध्ये सहभागी व्हायचे असेल तर विविध पात्रता असण्याबरोबरच काही पायऱ्या देखील पार पाडाव्या लागतात. त्यामधील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे पीसीएम या विषयांचा ग्रुप घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्यानंतर या दलामध्ये सहभागी होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एन डी ए परीक्षेसाठी चा फॉर्म भरून ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करणे गरजेचे ठरते.

त्याचबरोबर एस एस बी अंतर्गत घेण्यात येणारी मुलाखत देखील उमेदवारांना उत्तीर्ण करावी लागते. पुढे उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या फिट आहे की नाही, हे तपासणे फार गरजेचे ठरते. त्याकरिता वैद्यकीय तपासणी देखील घेण्यात येते. पुढे वायुसेनेच्या अंतर्गत असलेल्या अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवून तेथील पदवीधर होणे गरजेचे ठरते. त्यानंतर हवाई दलामध्ये सहभागी करून घेतले जाऊ शकते.

हवाई दलामधील अधिकाऱ्यांचे वेतन:

हवाई दलामधील अधिकारी कोणत्या पदासाठी कार्य करत आहेत, त्यानुसार त्यांच्या वेतनामध्ये मोठा बदल दिसून येत असतो. त्याचबरोबर सेवेमध्ये सहभागी झाल्याचा कालावधी देखील महत्त्वपूर्ण ठरत असतो. तरीदेखील अंदाजे ६२ हजार ते ७५ हजार रुपयांच्या आसपास या उमेदवारांना वेतन मिळते.

निष्कर्ष:

हवेमध्ये उडणे हे अनेकांसाठी स्वप्न असते. काहीजण मौज मजा करण्याकरता विमान प्रवास करत असतात, तर काही कामानिमित्ताने विमानाच्या माध्यमातून फिरत असतात. मात्र असे देखील अनेक लोक आहेत, ज्यांनी हवाई क्षेत्राला आपले करिअर बनवून, त्यामध्येच आनंद शोधलेला आहे. देशाची सेवा करायला मिळणे हे भाग्यचे लक्षण असून, भारतीय वायुसेनेतील जवानांना हे भाग्य लाभलेले आहे.

मित्रांनो वायुसेना ही भारत देशाचे हवाई मार्गाने होणारे हल्ले परतावून लावण्यात मदत करत असते. त्याचबरोबर हवाई क्षेत्रातून भारताचे संरक्षण करणे, ही जबाबदारी या हवाई दलाची अर्थात वायुसेनेची असते. वायुसेनेमध्ये अतिशय सरावलेले व्यक्ती सहभागी होत असतात. अशा या भारतीय हवाई दलाबद्दल आजच्या भागामध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे.

ज्यामध्ये भारतीय हवाई दल म्हणजे काय, या दलामध्ये सहभागी होण्याकरिता च्या पात्रता, हवाई दलाच्या दिनाबद्दल माहिती, येथे सामील होण्याच्या विविध प्रक्रिया व पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची प्रक्रिया, हवाई दलातील उमेदवारांचे वेतन, भारतीय हवाई दलाची खरी शक्ती, आणि त्याबाबत असणारे काही मनोरंजक तथ्य देखील बघितलेले आहेत.

FAQ

भारतीय हवाई दलाला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

भारतीय हवाई दलाला इंग्रजी मध्ये इंडियन एअर फोर्स या नावाने ओळखले जाते.

जागतिक पातळीवर सर्वात जास्त हवाई दलाची स्थापना कोणत्या कालावधीमध्ये झाली होती?

जागतिक पातळीवर दोन जागतिक महायुद्ध होण्याच्या कालावधीमध्ये अर्थात १९१८ ते १९३८ या वीस वर्षांच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सर्वच देशांनी हवाई दले स्थापन केली होती.

भारत देशामध्ये हवाई दल सर्वात प्रथम कोणत्या वर्षी स्थापन झाले?

भारत देशामध्ये हवाईदल सर्वात प्रथम १९१८ यावर्षी स्थापन केले होते, जे इंग्रजांनी स्थापन केले होते.

स्थापनेवेळी भारतीय हवाई दलाला कोणत्या नावाने ओळखले जात असे?

स्थापनेवेळी भारतीय हवाई दलाला रॉयल एअर फोर्स अर्थात शाही हवाई दल या नावाने ओळखले जात असे.

स्थापनेच्या वेळी भारतीय हवाई दलाची स्थिती कशी होती?

स्थापनेच्या वेळी भारतीय हवाई दलामध्ये सुमारे ८० अधिकाऱ्यांसह, ६०० सैनिक तैनात होते. त्याचबरोबर यामध्ये दोन  स्क्रोन्ड्स देखील होते.

Leave a Comment