Indian Navy Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारताच्या सुरक्षा दलामध्ये अनेक प्रकारच्या दलांचा समावेश होतो. त्यातील एकदल म्हणजे नौदल होय. ज्याला नाविक दल म्हणून देखील ओळखले जाते. हे दल सागरी क्षेत्रात कार्य करत सामरिक प्रकारच्या कारवाया करत असते.
भारतीय नौदलाची संपूर्ण माहिती Indian Navy Information In Marathi
या भारतीय नौदलाला सुमारे चारशे वर्षांचा इतिहास असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतातील पहिल्या नौदलाची स्थापना केली होती असे सांगितले जाते. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे किंवा आरमाराचे प्रमुख म्हणून देखील ओळखले जाते. या दलाद्वारे केवळ सागरी समाजाचे रक्षण करणे हे कार्य नसून भारतीय सागरीतलाची सभ्यता व संस्कृती राखणे हे देखील कार्य आहे. हे दल भारताच्या राष्ट्रपती यांच्या अधिकाराखाली कार्य करत असते.
सर्वप्रथम हिंदू नौदल ईस्ट इंडिया या कंपनी अंतर्गत भारतीय सागरी लष्करी युनिट याची स्थापना १६१२ या वर्षी करण्यात आली. जाने पुढे १६८५ यावर्षी बॉम्बे मरीन हे नाव धारण केले आणि ज्याद्वारे सुमारे ८३० पर्यंत आपले कार्य चालू ठेवले. या भारतीय नौदलाचा नौदल शिस्त कायदा भारतीय विधान परिषदेद्वारे ८ सप्टेंबर १९३४ या दिवशी मंजूर करण्यात आला आणि इथूनच रॉयल इंडियन नेव्ही स्थापन झाली.
आजच्या भागामध्ये आपण भारतीय नौदलाबद्दल माहिती घेणार आहोत.
नाव | भारतीय नौदल |
स्वरूप | भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करणे. |
मालक देश | भारत |
घटक | भारतीय सीमा सुरक्षा दलाचा घटक |
विस्तार | सुमारे ५६००० सागरी जवान |
मुख्यालय | नवी दिल्ली |
मुख्य सेनापती | आर हरी कुमार |
घोषवाक्य | ‘शं नो वरुण’ |
मित्रांनो भारतीय सैनिक विभागाचे तीन भाग पडतात हे आपल्याला माहितीच आहे. ज्यामध्ये आर्मी, नेव्ही व एअर फोर्स अर्थात भूदल, नौदल व हवाई दल यांचा समावेश होतो. यातील नौदल म्हणजे पाण्यामध्ये कारवाया करणारी दल होय ज्याला इंग्रजीमध्ये नेव्ही देखील म्हटले जाते.
या नौदला अंतर्गत भारताच्या सागरी सीमांचे रक्षण केले जाते व त्या लोकांना जहाजामध्ये किंवा पाणबुडीमध्ये सवार होऊन सतत भारताच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो.
संपूर्ण देशाच्या सागरी सीमाच्या दृष्टीने रक्षणाची जबाबदारी या दलावर असल्यामुळे हे काम खूपच जोखमीचे मात्र तेवढेच प्रतिष्ठेचे असते.
नौदलाचे कार्य काय आहे?
मित्रांनो ज्याप्रमाणे भूदल जमिनीवरून होणाऱ्या आक्रमणांना प्रत्युत्तर देते. हवाई दल हवाई कारवायांना नेस्तनाबूत करते. त्याप्रमाणे नौदल देखील जलमार्गावरून होणाऱ्या हल्ल्यांपासून देशाचे संरक्षण करत असते.
हे दल आपल्या बोटीद्वारे संपूर्ण सागरी किनाऱ्यावर गस्त घालत असते आणि संभाव्य सागरी धोक्यापासून देशाचे रक्षण करत असते. काही वेळेला नौदल जवानांना व अधिकाऱ्यांना एक एक महिना समुद्रातच काढावा लागतो मात्र देशसेवेचा विडा उचललेल्या या जवानांना त्याचे काहीही वाटत नाही आणि ते तेवढ्याच ताकतीने देशाचे सेवा करत असतात.
भारतीय नौदलामध्ये सहभागी होण्यासाठीच्या पात्रता:
मित्रांनो नौदलामध्ये सहभागी होणे हे जबाबदारीचे व जोखमीचे काम असल्यामुळे तेथे पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी अर्जदारांनी किमान बारावीची परीक्षा मान्यता प्राप्त बोर्डामधून उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. सोबतच बारावी करिता विज्ञान शाखेतून अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे.
या बारावीच्या परीक्षेत किमान ५० टक्के तरी गुण प्राप्त केलेले असावे आणि त्यातही इंग्रजीला किमान अर्धे म्हणजेच ५० टक्के गुण असले पाहिजेत.
या ठिकाणी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याला खूप महत्त्व दिले जात असल्यामुळे किमान ७० टक्के गुण या दोन्ही विषयांमध्ये आवश्यक असतात.
याशिवाय काही शारीरिक पात्रता देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम उंची तपासली जाते जी कमीत कमी १५७ cm तरी असली पाहिजे. महिलांना मात्र यामध्ये पाच सेंटीमीटर ची सूट देण्यात आलेली असून त्यांच्यासाठी १५२ इतकी उंची असली पाहिजे. तसेच उमेदवाराची छाती ८० सेंटीमीटर असावी.
इतर पात्रतांमध्ये उमेदवारांनी भारतीय नागरिकत्व धारण करणे आवश्यक असते. शिवाय हिंदी व इंग्रजी या भाषा अस्खलित रित्या यायला हव्यात.
उमेदवार हा मानसिक दृष्ट्या देखील सक्षम असला पाहिजे शिवाय त्याला हाडांबद्दलचे कुठलेही आजार किंवा हाडांमध्ये क्रॅक्स नसावेत.
या पात्रतेमध्ये वयाची अट ही किमान १७ वर्ष तर कमाल २२ वर्षे ठेवण्यात आलेली आहे. मात्र खेळाडू असतील तर त्यांना तीन वर्षाच्या सूटीसह २५ वर्षापर्यंत अर्ज करता येतो.
भारतीय नौदलामध्ये कसे सामील व्हावे?
मित्रांनो भारतीय नौदलामध्ये सामील होण्याकरिता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते. त्या परीक्षेला एनडीए असे म्हटले जाते जी वर्षातून दोन वेळा होत असते.
ही परीक्षा लेखी आणि मुलाखत अशा दोन्ही स्वरूपात असते. त्यानंतर उमेदवाराची एसएसबी अर्थात सेवा निवड मंडळाच्या अंतर्गत देखील मुलाखत घेतली जाते. या ठिकाणी उमेदवाराचे बौद्धिक मूल्यमापन केले जाते. या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराला एनडीए अंतर्गत काही दिवस प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले जाते.
हे प्रशिक्षण सर्वसाधारण सर्वच दलातील उमेदवारांसाठी सारखेच असते. त्यानंतर पुन्हा एक वर्षाचे नौदल सेवेतील प्रशिक्षण घ्यावे लागते आणि सेवेमध्ये भरती केले जाते.
निष्कर्ष:
मित्रांनो भारताला फार मोठा समुद्री किनारा लाभलेला आहे. तसे भू सीमांचे रक्षण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे सागरी सीमांवरून देखील आक्रमण होऊ शकते त्यामुळे येथे देखील जवान तैनात करणे खूपच गरजेचे ठरते यासाठी भारताने भारतीय नौदलाची स्थापना केलेली असून या अंतर्गत भारताच्या सागरी सीमांचे रक्षण केले जाते. यासाठी सुमारे ५६ हजार नौदल जवान अविरत कार्य करत असतात.
मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण या भारतीय नौदलाविषयी माहिती घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला भारतीय नौदल म्हणजे काय त्याचे कार्य काय असते सोबतच यामध्ये सहभागी होण्यासाठीच्या पात्रता काय असतात. शैक्षणिक व शारीरिक पात्रता तसेच नौदलामध्ये अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते.
एनडीए म्हणजे काय व त्यासाठी काय अभ्यासक्रम असतो व या परीक्षांची तयारी कशी करावी इत्यादी गोष्टीबद्दल माहिती बघितली आहे. त्याशिवाय विविध नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.
FAQ
भारतीय नौदलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
भारतीय नौदलाची स्थापना १९३४ या वर्षी करण्यात आली.
भारतीय नौदलाचे मुख्यालय कोठे आहे?
भारतीय नौदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
भारतीय नौदलामध्ये किती वर्ष नोकरी किंवा सेवा करावी लागते?
भारतीय नौदलामध्ये पदाच्या पात्रतेनुसार रिटायरमेंटचे वय हे वेगवेगळे असते जे ५२ वर्षांपासून ६२ वर्षांपर्यंत असते.
भारतीय नौदलातील नोकरी ही सरकारी नोकरी असते का?
भारतीय नौदल हे भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाचा किंवा संरक्षण मंत्रालयाचा एक भाग असल्यामुळे ते सरकारी कारभारा अंतर्गत येते. परिणामी ही नोकरी देखील सरकारी नोकरी असते.
भारतीय नौदल सेवेमध्ये सहभागी होण्याकरिता वयोमर्यादा किती असते?
भारतीय नौदल सेवेमध्ये सहभागी होण्याकरिता उमेदवारांची किमान वय हे १७ वर्षे पूर्ण असले पाहिजे. तसेच उमेदवार वयाच्या २२ वर्षापर्यंत अर्ज करू शकतो. तसेच क्रीडा कोट्या अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांची सवलत दिली जाऊ शकते.
मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण भारतीय नौदल याविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील भारतीय नौदलामध्ये जाण्याची इच्छा आहे का व त्यासाठी तुम्ही तयारी करत आहात का? याविषयीची माहिती देखील शेअर करा आणि आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना, भारतीयांना या विषयी माहिती व्हावी याकरता त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा.
धन्यवाद!!!