Indian Scientist Information In Marathi मानवी प्रगतीला लाभलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विज्ञान होय, आणि ही प्रगती करायची असेल तर वैज्ञानिक शोध लावणे नितांत गरजेचे ठरते. यासाठी आपले शास्त्रज्ञ दिवस-रात्र मेहनत घेत असतात. शास्त्रज्ञ देशाच्या जडणघडणीत अतिशय मोलाची भूमिका पार पाडत असतात.
भारतीय वैज्ञानिकची संपूर्ण माहिती Indian Scientist Information In Marathi
काही शास्त्रज्ञ वैयक्तिक स्तरावर कार्य करतात, तर काही संघटनात्मक स्तरावर देशासाठी कार्य करतात. काही नवनवीन शोध लावतात, तर काही असलेल्या शोधांचा वापर करून देशाच्या प्रगती मध्ये मदत करतात. काही शास्त्रज्ञ देशाला परग्रहावर घेऊन जातात. शास्त्रज्ञ देशाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे देश प्रगतीपथावर राहण्यास मदत होते, मात्र तो देश शास्त्रज्ञांवर आणि त्यांच्या शोधांवर लक्ष न देता त्यावर खर्च करत नाही, तो देश इतर देशांपेक्षा नेहमी मागे राहताना आपण पाहतो.
भारतामध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक दिग्गज शास्त्रज्ञ होऊन गेले. ज्यांनी वेगवेगळे शोध लावत भारताचे नाव संपूर्ण जगभर केलेले आहे. ज्यामध्ये आर्यभट्ट यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्व जगाला माहित आहे की विमानाचा शोध राइट बंधू यांनी लावला, मात्र राईट बंधू यांच्याही आधी भारतातील शिवकर बापू तळपदे यांनी जुहू चौपाटी येथे विमान उडविले होते. ज्याला महादेव गोविंद रानडे आणि सयाजीराव गायकवाड दोघेजण साक्ष होते.
असे हे भारतीय शास्त्रज्ञांचे कार्य अतिशय महान आहे. आजच्या भागामध्ये आपण भारतीय शास्त्रज्ञाबद्दल माहिती बघणार आहोत.
नाव | शास्त्रज्ञ |
प्रवर्ग | भारतीय शास्त्रज्ञ |
प्रकार | शोध लावणारे शास्त्रज्ञ, अंतराळ शास्त्रज्ञ, गणितीय शास्त्रज्ञ इत्यादी. |
डॉ. सी व्ही रमण:
ज्यांच्या शोधाच्या आठवणीत भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो, असे शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर सी व्ही रमण होय. त्यांनी इसवी सन १९३० मध्ये प्रकाश किरण विखुरण्याच्या शोधाला जग जाहीर केले होते. आणि या कार्यासाठी त्यांना भौतिकशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते.
त्यांच्या याच शोधाच्या आठवणीत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. तिरूचिरापल्ली येथे दिनांक ७ नोव्हेंबर १८८८ रोजी जन्मलेले सी व्ही रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण असे होते. त्यांच्या नावे दोन विक्रम आहेत, ते म्हणजे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या व्यक्तींमधले ते पहिलेच आशिया खंडातील व्यक्ती, आणि पहिलेच काळ्या रंगाचे व्यक्ती होते.
डॉ सी वी रमन यांनी प्रकाशासोबतच ध्वनीच्या शास्त्रावरही बरेच काम केले, तबला व मृदंग यांसारख्या भारतीय वाद्यांच्या आवाजाचा त्यांनी सूक्ष्म रीतीने अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय नोबेल पारितोषिक सोबतच त्यांना भारत सरकारचा सर्वोच्च सन्मान असणारा भारतरत्न हा पुरस्कार इसवी सन १९५६ मध्ये देण्यात आला.
जगदीशचंद्र बोस:
वनस्पतींनाही भावना असतात या अतिशय जगावेगळ्या शोधाचे जनक म्हणजे जगदीश चंद्र बोस होय. लंडन येथील रॉयल इन्स्टिट्यूशन या संस्थेद्वारे मान्यता मिळालेले ते पहिलेच भारतीय शास्त्रज्ञ होते. बंगाल प्रांतातील विक्रमपूर येथे जगदीश चंद्र बोस यांचा जन्म झाला.
हा प्रांत सध्या बांगलादेश या देशामध्ये आहे. त्यांनी क्रॅसोग्राफ या डिव्हाईस चा शोध लावला, या यंत्राद्वारे वनस्पती मधील वाढ मोजता येत असे. जगदीश चंद्र बोस यांनी मायक्रोवेव्ह ऑप्टिक्स या तंत्रज्ञानाचा शोध लावला होता. श्री जगदीश चंद्र बोस हे शास्त्रज्ञ असण्याबरोबरच एक उत्तम लेखक देखील होते.
एम विश्वेश्वरय्या:
१५ सप्टेंबर १८६१ रोजी मुद्देनहली येथे जन्मलेल्या विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण नाव मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या असे होते. त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी भारतामध्ये १५ सप्टेंबर हा दिवस इंजिनिअर्स डे म्हणून साजरा केला जातो.
काही काळ म्हैसूरचे दिवाण म्हणून कार्य केलेले एम विश्वेश्वरय्या हे शास्त्रज्ञ असण्याबरोबरच अफाट बुद्धीचे इंजिनियर अर्थात अभियंता होते. त्यांनी जलस्त्रोतांवर नियंत्रण ठेवण्यामध्ये आपले मोलाचे योगदान दिलेले आहे. सिंचन क्षेत्रामध्ये त्यांनी ऑटोमॅटिक स्लोईस गेट अँड ब्लॉक इरिगेशन या तंत्रज्ञानाचा शोध लावला.
डॉक्टर एम विश्वेश्वरय्या यांचे असे मत होते की भारताने पुढे जायचे असेल, तर त्यांनी प्रगत औद्योगिक राष्ट्रांच्या सोबतीने राहायला हवे, जेणेकरून उद्योगधंद्यांच्या माध्यमातूनच भारताचा विकास होऊ शकतो.
एस चंद्रशेखर:
विसाव्या शतकातील म्हणजेच अलीकडील सर्वात महत्त्वाचे शास्त्रज्ञ म्हणजे एस चंद्रशेखर होय. ते एक महान खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९१० या दिवशी लाहोर या ठिकाणी झाला. एस चंद्रशेखर यांच्या विषयी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते महान भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या बंधूंचे पुत्र होते. मात्र एस चंद्रशेखर यांनी १९५३ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
सर्वात महत्त्वाचा असणारा शोध म्हणजे चंद्रशेखर लिमिटही त्यांनीच शोधून काढलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी स्थिर असणाऱ्या पांढऱ्या बटु ताऱ्यांचे अधिकाधिक वस्तुमान सिद्ध करण्याचे प्रयत्न केले.
हरगोविंद खुराणा:
आपण हरगोविंद खुराना हे नाव खूप वेळा ऐकले असेल. पश्चिम पंजाब मधील सध्याच्या पाकिस्तानच्या रायपूर या गावात जन्मलेले हरगोविंद खुराना यांचा जन्मदिवस ९ जानेवारी १९२२ हा आहे. ते एक बायोकेमिस्ट होते. त्यांनी जिवंतपेशींमध्ये सर्वप्रथम कृत्रिम जनुकाचे संश्लेषण केली. ज्यामुळे जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील जीन थेरेपी मध्ये पुढे जाऊन खूप फायदा झाला.
निष्कर्ष:
आजच्या भागामध्ये आपण भारतीय शास्त्रज्ञा बद्दल माहिती पाहिली, ज्यामध्ये आपण शास्त्रज्ञांची कार्ये आणि त्यांच्याबद्दलची बरीचशी माहिती पाहिली. मित्रांनो, शास्त्रज्ञ हे तसे दुर्लक्षित करिअर. या क्षेत्राकडे शक्यतो फारसे कोणी वळताना आढळत नाही, कारण या क्षेत्रामध्ये येण्यासाठी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असते. मात्र आजकालच्या पिढीला कमी श्रमामध्ये जास्त पुढे जायची सवय लागल्यामुळे शास्त्रज्ञ बनण्याकडे फारसा कोणाचा कल दिसून येत नाही.
मित्रांनो, लहानपणापासून तुम्हाला विज्ञानाची आवड असेल, आणि अभ्यासात तुम्ही सरस असाल तर तुम्ही नक्कीच शास्त्रज्ञ व्हायला हवे, जेणेकरून तुमच्या ज्ञानाच्या जोरावर आपला देश पुढे जाण्यासाठी मदत होईल. तसेच तुम्हाला देखील समाजामध्ये मान प्रतिष्ठा लाभेल. आणि तुम्ही देखील देशासाठी काहीतरी केले या विचाराने समाधानी व्हाल.
FAQ
असे कोणते शास्त्रज्ञ आहेत ज्यांना राष्ट्रपती बनण्याचा बहुमान मिळालेला आहे?
भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना शास्त्रज्ञ व राष्ट्रपती असा दुहेरी बहुमान मिळालेला आहे.
भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञांना ओळखले जाते?
डॉक्टर प्रफुल्लचंद्र रे यांना भारतीय रसायनशास्त्राचे जनक या नावाने ओळखले जाते.
भारतातील असे कोणते महान गणिती शास्त्रज्ञ आहेत ज्यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते?
भारतातील रामानुजन या गणिती शास्त्रज्ञांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते.
शून्याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
शून्याचा शोध भारतीय गणिततज्ञ आर्यभट्ट यांनी लावला.
भारतातील कोणते शास्त्रज्ञ पक्षी तज्ञ होते?
भारतीय शास्त्रज्ञ सलीम अली हे पक्ष तज्ञ देखील होते.
आजच्या भागामध्ये आपण भारतीय वैज्ञानिका बद्दल इत्यंभूत माहिती पाहिली, ही माहिती बाल वर्गापासून कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवकांसाठी खूप मोलाची ठरेल यात काही शंका नाही. त्यामुळे एक कर्तव्य समजून ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा, तसेच आम्हाला या लेखावरील तुमच्या प्रतिक्रियांची नक्कीच उत्सुकता आहे त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका.
धन्यवाद…
आजचा युवा पिढीला scientists होवायला पाहीजे कारण ही भारत या देशाची खुप मोठी गरज आहे.