information technology in marathi एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञान मानवजातीसाठी वरदान बनलेले आहे. सध्या आपण तंत्रज्ञानाच्या विश्वात जगत आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टीत आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञान information technology marathi meaning यामुळे आपले आयुष्य खूप जलद व सुखकर झाले आहे. मानवासह इतर सजीवांच्या ही जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला तंत्रज्ञानाची सोबत आहे. या लेखामध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान बद्दल माहिती पाहणार आहोत science and technology information in marathi
तंत्रज्ञान म्हणजे काय ? information technology meaning in marathi
काय आहे हे तंत्रज्ञान? तंत्रज्ञान म्हणजे मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या भौतिक सुविधांसाठी वेगवेगळी साधने विकसित केली की ज्याच्या आधारामुळे आज जग इतके जवळ आले.आपले दैनंदिन जीवन आरामदायी व सुखकर झाले.
वेगवेगळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि फायदे information technology in marathi
चला आपण आपल्या जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व फायदे याबद्दल जाणून घेऊ.
१. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचे फायदे medical field information technology in marathi
आजच्या घडीला वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान हे एक वरदानच ठरले आहे. वैद्यकीय क्षेत्रात विकसित झालेली वेगवेगळी उपकरणे विविध प्रकारचे नवनवीन औषधे,लस तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. विविध प्रकारच्या चाचण्या व रोगांवरील निदान, अवयव प्रत्यारोपण, विविध जटिल व अवघड शस्त्रक्रिया तंत्रज्ञानामुळे साध्य झाले आहे. आज संपूर्ण जग करोनासारख्या महाभयंकर महामारीशी लढत आहे, यापासून बचाव करण्यासाठी आपण फक्त तंत्रज्ञानावरच अवलंबून आहोत.
२. शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा उपयोग Education field information technology in marathi
भारतासह इतर सर्व देशांमध्ये ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर केला जात आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन लेक्चर्स, ऑडिओ व पीडीएफ स्वरूपातील पुस्तके हा सर्व तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे. शिक्षकही आता फळा व खडू सारख्या पारंपारिक शिक्षण पद्धतीचा वापर न करता संगणक प्रोजेक्टर सारख्या नवनवीन प्रणालींचा वापर करत आहेत. यामुळे शिक्षण अतिशय सुलभ व सोपे झाले आहे. विद्यार्थी कोणत्याही ठिकाणी बसून कोणत्याही विषयाचे ज्ञान तात्काळ मिळू शकतात. तंत्रज्ञानातील विकासामुळे इंटरनेटवर पीडीएफ व ऑडिओ स्वरूपात लाखो पुस्तके वाचनासाठी उपलब्ध झाली आहेत. विद्यार्थी कोणाच्या मदतीशिवाय स्वावलंबीपणे अध्ययन करू शकतात. हे सर्व केवळ तंत्रज्ञानातील विकासामुळे शक्य झाले आहे.
३. शेती क्षेत्रात आधुनिकीकरण farm field information technology in marathi
शेती हा संपूर्ण मानव जातीच्या जीवनाचा कणा आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती, त्यामुळे अधिक वेळ अधिक मनुष्यबळाचा वापर करूनही कमी उत्पादन मिळत होते. आता शेती कशी आधुनिक पद्धतीचा वापर केला जात आहे शेतीतील विविध घटकांमध्ये विविध प्रकारची उपकरणे व प्रणालींचा वापर करून कमी वेळात व कमी मनुष्यबळाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेतले जात आहे.शेतीतील विविध घटकांमध्ये होत असलेला तंत्रज्ञानाचा वापर
मशागत :- शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर ची विविध अवजारे तसेच इतर यंत्रांचा वापर केला जातो त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होते
सिंचन :- सिंचनासाठी कमीत कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्यासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक प्रणालींचा वापर केला जातो, तसेच मल्चिंगचा वापर केला जातो.
कीड व रोग व्यवस्थापन :- एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक रोग व्यवस्थापन तसेच विविध प्रकारची नवनवीन किटकनाशके व बुरशीनाशके यांच्या वापरामुळे किड व रोग यामुळे होणारे शेतीतील नुकसान कमी करण्यात यश आले आहे.
बियाणे :- तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पिकांचे नवनवीन आणि अधिक उत्पादनक्षम वाण तयार करणे साध्य झाले आहे.
शेतीमालावरील प्रक्रिया व कृषी उद्योग :- विविध प्रकारचे आधुनिक यंत्र व प्रक्रियांचा वापर करून अनेक कृषी उद्योग भरभराटीस आले आहेत. फळे तसेच भाज्यांवर प्रक्रिया करून विविध उत्पादने बनवली जात आहेत. तसेच शीतगृहांची चा वापर करून शेतीमालाची दीर्घ काळासाठी साठवणूक करणे शक्य झाले आहे.
४.संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर Defense field information technology in marathi language
संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज होती, देशाच्या सीमा रक्षण तसेच देशांतर्गत संरक्षणामध्ये विविध तांत्रिक प्रणालींचा वापर केला जात आहे. नवनवीन जलद व हलकी हत्यारे तसेच आधुनिक यंत्रसामग्री, सैनिकांना अतिथंड किंवा अतिउष्ण तापमानात राहण्यास मदत करणारे आधुनिक साहित्य, संभाषणाचे तसेच दळणवळणाच्या आधुनिक उपकरणे अशा तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा वापर संरक्षण क्षेत्रात केला जात आहे.
५.दळणवळणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग
तंत्रज्ञानाचा वापर करून दळणवळण क्षेत्रास चालना मिळाली आहे. जग जवळ आले आहे. देशांतर्गत तसेच देशा देशांमधील व्यापार व देवाणघेवाण वाढली आहे. यामुळे राष्ट्रांच्या आर्थिक विकासात भर पडली आहे. तसेच प्रवासामध्ये वेळेची व पैशाची बचत होत आहे. ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या रेल्वेची किंवा विमानाची तिकिटे घेणे शक्य झाले आहे.
६.देशाच्या आर्थिक विकासात भर
तंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्रांती झाली तसेच लहान मोठ्या उद्योगधंद्यांना चालना मिळाली. यामुळे विकसित किंवा विकसनशील सर्वच देशांना याचा फायदा झाला आहे. देशातील परस्पर देवाण-घेवाण, मालाची आयात व निर्यात तंत्रज्ञानाच्या साधनामुळे शक्य झाले परिणामी डॉलर सारखे आंतरराष्ट्रीय चलनाच्या आदान-प्रदान यामुळे विविध देशांच्या आर्थिक विकासास भर मिळाली.७. मानवाच्या भौतिक सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर
मानवी वृत्ती अतिशय आरामदायी व भोगविलासी आहे, आपल्या दैनंदिन जीवनात माणसाने सर्व प्रकारच्या भौतिक सुविधांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तंत्रज्ञानामुळे माणसाचे जीवन अतिशय सुखकर व आरामदायी झाले आहे. आपल्या दैनंदिन जीवन शैलीत प्रत्येक गोष्टीमागे तंत्रज्ञानाचा आधार आहे. तंत्रज्ञान हे माणसासाठी वरदानच आहे.
८.उद्योगधंद्यांना चालना
तंत्रज्ञानामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळाली आहे आधुनिक यंत्रसामग्री मुळे कमी मनुष्यबळाचा वापर करून अधिक उत्पादन मिळत आहे. तसेच उद्योगधंद्यांना व व्यापाऱ्यांना खरेदी व विक्री साठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्या ऑनलाईन मार्गाचा वापर करून जगभरात आपला व्यापार करत आहेत.
९. मनोरंजनासाठी तंत्रज्ञानाचा वापर
आपण आपल्या दैनंदिन जीवनात मनोरंजन करण्यासाठी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या विविध साधनांचा वापर करत आहोत.
१०.अवकाश संशोधन व तंत्रज्ञान
अवकाशातील सर्व संशोधन हे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहेत. वैज्ञानिक विविध प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून शोध लावत आहेत. इस्रो,नासा यांसारख्या अवकाश संशोधन करणाऱ्या संस्था पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत.
अशाप्रकारे आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. तंत्रज्ञान हे एका प्रकारे आपल्यासाठी वरदानच आहे. परंतु त्याचा योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे वापर करणे काळाची गरज आहे
No schema found.