24 Interesting facts about Android in Marathi

मित्रांनो तुम्ही हा लेख वाचताय म्हणजेच मोबाईल बद्दल तुम्हाला नक्कीच माहित असेल. तुम्ही अँड्रॉइड (Android) हा शब्द अनेक वेळा ऐकलाही असेल, पण तुम्हाला याबद्दल जास्त माहिती नसेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण अँड्रॉइड बद्दल काही रोचक तथ्य (Interesting facts about Android in Marathi) जाणून घेणार आहोत.

Interesting facts about Android in Marathi

1) Android एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जी लिनक्स कर्नल वर आधारित आहे. Android ला मोबाईल च्या नजरेत ठेवून डिझाइन केलं होत. त्यामुळे यामध्ये फोन मधील सर्व एप्लिकेशन्स अगदी सहजपणे चालवता येतील.

2) Android चे खूप सारे version आहेत आणि त्यांचं त्यात विभाजन केलं आहे. Lollipop, Marshmallow, Nought हे Android चे सर्व version आहेत.

3) Android Inc. ची स्थापना Andy Rubin, Rich Miner, Nick Sears आणि Chris White यांनी मिळून ऑक्टोबर 2003 मध्ये केली होती.

4) Android Inc. ची स्थापना झाल्यानंतर दीड वर्षानी Google ने सन 2005 मध्ये Android ला 50 मिलियन डॉलर मध्ये विकत घेतले.

5) मार्च 2013 मध्ये Andy Rubin यांनी Android ला सोडण्याचा निश्चय केला आणि त्यानंतर ही जागा त्यांनी Sundar Pichai यांना दिली.

6) Android चा वापर मोबाइल शिवाय, Google Glass आणि Smartwatch मध्ये सुद्धा केला जातो.

7) Android OS डिजिटल कॅमेरा वर लक्ष्य देऊन तयार करण्यात आला होता. परंतु परत हे Smartphone मध्ये प्रसिद्ध झाले त्यामुळे परत याला मोबाईल मध्ये चालवलं गेलं.

8) Android च्या सर्व Operating System ची नावे मिठाई च्या नावावरून ठेवण्यात आली होती. जसं की जेली बिन, आइस्क्रीम, सँडविच इत्यादी.

9) Android या शब्दाचा अर्थ एक माणसासारखा दिसणारा रोबोट असा आहे.

10) Android एक Open Source Operating System आहे म्हणजेच आपण यात आपल्या मनाप्रमाणे बदल करू शकतो.

11) आता सध्या जगामध्ये android 46 भाषेमध्ये उपलब्ध आहे.

12) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की Google Play Store वर 48 बिलियन पेक्षा जास्त ॲप्स आहेत.

13) Android Operating System वर चालणारा HTC चा T हा पहिला मोबाईल होता ज्याला 2008 मध्ये लाँच केलं होत.

14) Android ला Google ने 23 सप्टेंबर 2008 ला पहिल्यांदा रिलिज केलं होत.

15) Apple Mobile च्या तुलनेने जगभरात जास्त मोबाईल हे android चे वापरले जातात.

16) Android System फक्त मोबाईल पर्यंतच मर्यादित नाही तर आता त्याला टीव्ही मध्ये सुद्धा वापरल जात आहे.

17) Android ची ओळख असलेला Android चा हिरव्या रंगाचा लोगो ग्राफिक डिझाईनर इरीना ब्लोक द्वारा 2007 मध्ये बनवला गेला होता.

18) Google कंपनी दरवेळेस 6-9 महिन्यामध्ये Android साठी नवीन नवीन update घेऊन येते.

19) Android कंपनी बरोबर 46 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कंपन्या जोडल्या गेल्या आहेत.

20) Android Software चे पाच भाग आहेत ज्याच्या आधारावर पूर्ण Android प्लॅटफॉर्म काम करतो.

21) Android Smart phone, टॅब्लेट यासारख्या Device च्या माध्यमातून 190 देशामध्ये पसरला आहे.

22) Android 3.0 Version, Honeycomb हे एकमेव असं Android Version होत जे मोबाईल वर चालत न्हवत त्याला फक्त टॅबलेट साठी डिझाइन केलं होत.

23) Android कंपनी ची स्थापना कॅलिफोर्निया मधील पालो आलटो शहरात झाली होती.

24) पूर्ण जगातील प्रत्येक दुसरा माणूस Android mobile वापरतो.

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण अँड्रॉइड बद्दल काही रोचक तथ्य (Interesting facts about Android in Marathi) जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Comment