Jalgaon Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण अशा जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत जो सातपुडा पर्वतरांगांनी घेतलेला आहे तो जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा!तापी नदीने वेढलेला जळगांव जिल्हा! शिक्षणाचा ’श’ देखील माहित नसतांना ग्रामीण धाटणीच्या कवितांनी जगभर प्रसिध्द झालेल्या बहिणाबाई चौधरींचा जळगांव जिल्हा! बालकवी ठोंबरेंचा जळगांव जिल्हा!
जळगांव जिल्ह्याची संपूर्ण माहिती Jalgaon Information In Marathi
जळगांव जिल्हा महाराष्ट्र राज्यात उत्तर पश्चिमेकडे वसलेला जिल्हा असुन सातपुडा पर्वत रांगांनी वेढलेला आहे, याच्या दक्षिणेकडे अजिंठा पर्वत रांगा आहेत.
जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे.
कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत.
जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते. ही शेती भारताच्या इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारताच्या सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
इतिहास
जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे साताऱ्याचे संस्थानिक होते.
भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते.
भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते.
१९०६ला खानदेश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि दोन नवीन जिल्हे बनवले गेले ; पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश[३] पूर्व खान्देश मध्ये आताचा जळगाव जिल्हा होता तर पश्चिम खान्देश मध्ये आता अस्तित्वात असलेले धुळे आणि नंदुरबार जिल्हे होते.
पुढे १९५० च्या काळात पूर्व खान्देश बॉम्बे राज्याचा भाग बनला. पूर्व खान्देश हा १० तालुके आणि ३ पेठे मिळून बनलेला होता.
त्यावेळेस पेठा हा तालुक्यामधील उपभाग होता. १०/१०/१९६०ला महाराष्ट्रच्या निर्मिती नंतर महाराष्ट्र शासनाने पूर्व खान्देशला जळगाव जिल्हा म्हणून नाव बदलले. १९६० नंतर पूर्व खान्देश जिल्ह्याचे नाव जळगाव जिल्हा ठेवण्यात आले.
भूवर्णन
जळगाव जिल्ह्यात पूर्णा नदी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची २२६ मी. आहे.जळगाव जिल्ह्याच्या पूर्व सीमेला बुलढाणा जिल्हा लागून आहे तर उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम सीमेला धुळे जिल्हा आहे आणि दक्षिणेस औरंगाबादजिल्हाआहे.जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे.
जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस कि.मी. आहे. स्थूलमानाने याचे सातपुडा पर्वतश्रेणी आणि उपत्यकाव्याप्त (पीडमाँट) तापीच्या उत्तरेचा भाग अजिंठा-चांदोर सातमाळा, आग्नेयीकडील हत्ती डोंगर या अल्पोच्च, विस्कळित डोंगररांगांनी व्याप्त भाग व या दोहोंमधील पूर्व-पश्चिम उताराचा तापी खोऱ्याचा पठारी भाग असे तीन नैसर्गिक विभाग पडतात.
या जिल्हयातुन तापी नदी गेली असुन या नदीची एकुण लांबी 724 कि.मी. आहे यातील 208 कि.मी. महाराष्ट्रात आहे. या नदिच्या अनेक उपनद्या असुन या नदीचे पात्र फार मोठे आहे. याशिवागिरणा आणि वाघुर या देखील प्रमुख नद्या आहेत.
जिल्ह्याची मुख्य नदी तापी ही पश्चिमवाहिनी व सखोल पात्राची असून हिच्या उपनद्या पूर्णा, गिरणा, वाघूर, भोगावती, बोरी व पांझरा या महत्त्वाच्या आहेत.
भोकर, सुकी, मोर, रानवती, हडकी, मंकी, गुळी, अनेर इ. उपनद्या व कान, तितूर, अंजनी इ. नद्या असून त्यांवर अनेक छोटेमोठे बंधारे आहेत. त्यांशिवाय हरताळे, म्हसवे, वेल्हाळे व मेहरूण हे चार तलाव आणि बागायतोपयोगी विहिरी आहेत.
जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव, पारोळे, पाचोरा, जामनेर व जळगाव हे ११ तालुके आहेत.
लोकसंख्या
या जिल्ह्याची लोकसंख्या 42,29,917 एवढी आहे. क्षेत्रफळ 11,765 वर्ग कि.मी.आहे. जिल्ह्याचा साक्षरता दर 85 %आहे.लिंग गुणोत्तर 1000 पुरूषांमागे 933 स्त्रिया असे आहे.या जिल्हयात फक्त पंधराच खेडीवजा शहरे असून एक लाखावर वस्तीचे फक्त जळगाव शहर आहे.
लोकवस्ती साधारण दाट, दर.चौ. किमी. स १८० आहे. ८५% लोक मराठी भाषिक, ८% उर्दू भाषिक, ३% गुजराती भाषिक आहेत.बंजारी, भिल्ल, पावरे (राजपूतवंशीय), तडवी (मुसलमान), गोंड, कोटिल, नहाळ या अनुसूचित जमाती आहेत.
जळगाव जिल्ह्यात राजपूत हिंदू,मुस्लिम, शीख,इसाई,ज्यू,ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोक राहतात. सोबतच ब्राम्हण, दोडे गुज्ज़र,कुनबी पाटील,माळी, मराठा,Badgujar लिंगायत समाज,धनगर धोबी तसेच भिल्ल,पावरा,टोकरे-कोळी या आदिवासी जमाती आहेत.लेवा पाटीदार समाज हा जळगाव जिल्ह्यातील मुख समाजघटक आहे.
भाषा
अहिराणी ही येथील प्राचीन आणि मुख्य भाषा असुन, मराठी, खानदेशी भाषा देखील येथे मोठया प्रमाणात बोलल्या जातात. मध्यप्रदेश लगतचा समुदाय हिंदी भाषेचा उपयोग करतो.जळगावात मराठी बोलली जाते.
बहुतेक लोक खान्देशी म्हणजेच लेवा गणबोली ही भाषा बोलतात. याच लेवा गणबोलीमध्ये प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आहेत. अनेकजण मराठी ऐवजी अहिराणी नावाची बोलीभाषा बोलतात.काही ठिकाणी वऱ्हाडी बोली भाषा सुद्धा बोलली जाते.
खनिजे
जळगाव जिल्ह्यात इमारतबांधणीस उपयुक्त दगड, वाळू, चुनखडी ही खनिजे येथे सापडतात.
हवामान
जळगाव जिल्ह्यातील हवामान हे विषम व कोरडे आहे जळगाव जिल्ह्यात सरासरी 75 ते 80 सेमी पाऊस पडतो.
या जिल्हयात साधारण 700 मि.मी. पाउस पडत असुन उन्हाळयात तापमान 45 ते 48 डिग्री सेल्सीयस पर्यंत देखील पोहोचते, थंडीच्या काळात वातावरण सुखदायक असते.
एकंदरीत जिल्ह्यातील हवा कोरडी, आरोग्यदायी पण विषम असून अत्यंत कडक उन्हाळ्यासाठी जळगाव शहर व जिल्हा प्रसिद्ध आहे. उन्हाळा दक्षिणेस कमी आणि सातपुड्यापर्यंत वाढता कडक आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर ते फेब्रुवारी तीव्र थंडी, मार्च ते मे कडक उन्हाळा (जळगाव येथे डिसेंबरमध्ये १०° से. व एप्रिलमध्ये ४२·५° से. तपमान असते).
जून ते सप्टेंबर आल्हाददायक पावसाळा असतो. ऑक्टोबरची उष्णता जाणवते. उन्हाळ्यात धुळीचे लोट उठतात. मेघगर्जनेसह वादळ–संभव उन्हाळा–पावसाळा अखेर जास्त असतो. पावसाची वार्षिक सरासरी ७४ सेंमी. व त्यातही तापी खोऱ्यात ७६ ते ८१ सेंमी. असून एकंदरीत पर्जन्यमान जास्त निश्चित स्वरूपाचे आहे.
मृदा
जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे.
सातपुड्याच्या उतारांवर व दक्षिणेकडील डोंगरांजवळ वाळूमिश्रीत, दक्षिण मध्यभागात मळईची, उत्तरभागाच्या जंगल विभागात जंगली, खोल दऱ्यांतून व सखल भागांतून काळी आणि बाकीच्या बहुतेक भागात मध्यम काळी मृदा आहे.
शेती व प्रमुख पिके
जळगाव जिल्ह्यात ७३% लोकांचे निर्वाहसाधन शेती आहे. हा डाळी पिकविणारा महत्त्वाचा जिल्हा अन्नपिकांच्या सु. २५% डाळी पिकवतो. केळी, गहु, बाजरी, लिंबु, भुईमुग, कापुस आणि उस ही येथील मुख्य पिकं आहेत.
जळगाव जिल्हा केळीच्या पिकासाठी आणि ऊत्पादनासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ज्वारी, कापुस, ऊस, मका, तीळ हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्यासोबत गहू व बाजरीचेही पीक घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे.
तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तीळ ही पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरूणची बोरे, मोसंबी, सिताफळ, इत्यादी फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात होते.
उद्योगधंदे
महाराष्ट्रातील तेलबिया पिकवणारा हा अग्रेसर जिल्हा असून एकूण क्षेत्राच्या १६% क्षेत्रात पिकणारे भुईमूग हे परदेशी चलन मिळवून देणारे पीक चाळीसगाव, जामनेर, पोरोळे, पाचोरा, अमळनेर या भागांत होते. धणे, लसूण, मिरच्या ही उत्पन्ने वाढत्या प्रमाणात, विशेषतः जळगाव तालुक्यात होतात. कपाशीस जिल्हा-अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मोसंबीसाठी एरंडोल, चाळीसगाव, भडगाव लिंबासाठी उत्राण आणि पेरू-बोरांसाठी जळगाव–मेहरूण भारतात तसेच परदेशांतही प्रसिद्ध आहे. द्राक्षे-पपया यांचे उत्पन्न वाढत्या वेगाने होत आहे. त्याचप्रमाणे सर्व तऱ्हेचा उत्तम व विपुल भाजीपाला इतर राज्यांत व आजकाल परदेशीही रवाना होतो.
जळगाव, अमळनेर, चाळीसगाव–प्रत्येकी एक कापडाचा, पिंप्राळे–एक कृत्रिम रेशमाचा, पाचोरे–वनस्पतितूप, शुद्ध तेल व साबण, जळगाव–केळपीठ, दारूकाम व मेवामिठाई, वरणगाव व भुसावळ–युद्धसाहित्य.
यांशिवाय जिल्ह्यात ७२ कापूस पिंजण्याचे, ३६ गाठी बांधण्याचे तसेच गूळ, विड्या, शाई, छपाई रीळ इत्यादींचे छोटे कारखाने आहेत. १९३८ पासून आतापर्यंत ८ कामगार संघटना आणि १० कामगार कल्याण केंद्रे असून ती जागृत आणि कार्यक्षम असल्याने उद्योगधंद्याचे भवितव्य उज्जवल आहे.
जिल्ह्यात हातमाग, यंत्रमाग, सुतारी, चर्मकारी, तेलघाणे, बांबूकाम, कुंभारकाम, लोहारकाम, वीटभट्ट्या, लोकरकाम, गूळ करणे, हातकागद करणे, भांडी घडविणे इ. कुटिरोद्योगांना आणि ग्रामोद्योगांना वाढत्या प्रमाणात उत्तेजन मिळते.
दळणवळण व वाहतूक
जळगाव जिल्ह्यातून जाणारा धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्याला धुळे आणि नागपूर या शहरांना जोडतो.
जिल्ह्यात हवाई मार्गाने दळण-वळणासाठी जळगाव येथे विमानतळ आहे. ते जळगावमध्ये आहे.
वने आणि प्राणी
जळगाव जिल्ह्यात १४·८५% वनप्रदेश असून त्यात साग, तिवस, धावडा, सलई, सादडा, हळद, शिसव, कळंब, बिब्बा, अंजन, खैर, बाभूळ, बोर, पळस, टेंभुर्णी इ. वृक्ष आढळतात. वाघ, अस्वल, हरिण, सांबर, चितळ, रानडुक्कर, नीलगाय, कोल्हा, खोकड, चिंकरा, ससा इ. वन्यपशूंचा विशेषतः सातपुड्यात मुक्तसंचार असतो. मासे, बगळे व मोर वगैरे पक्षीही विविध आहेत.
खेळ
जळगाव जिल्ह्यात सॉफ्टबॉल, खो-खो,फुटबॉल, कब्बड्डी, क्रिकेट, कुस्ती, मुष्टियुद्ध, बैडमिंटन,लॉन टेनिस, हॉकी, टेबल टेनिस इत्यादी खेळ प्रसिद्ध आहेत.
पर्यटन स्थळे
उनपदेव-सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे, जळगाव पासून 35 किमी अंतरावरील सातपुडा पर्वतातील मनुदेवी मंदिर पाल व यावल अभयारण्ये, पद्मालय येथील गणेश मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ, पाटणादेवी, वालझिरी व गंगाश्रम, पाल ही थंड हवेची ठिकाणे. भाऊ उद्यान आहे खुप छान जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जळगावपासून दक्षिणेस ५५ किमी अंतरावर आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशन (गान्धी तीर्थ ) जळगाव.
धन्यवाद!!!