जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती Jalna Information In Marathi

Jalna Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठवाडा भागातील अशा जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत तो राज्याच्या मध्यभागी आहे तो जिल्हा म्हणजे जालना जिल्हा!मराठवाडा भागातील एक जिल्हा जालना! एक विशेष गोष्ट म्हणजे हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तरेला येतो.

Jalna Information In Marathi

जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती Jalna Information In Marathi

जालना हा जिल्हा पुर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता पण मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्हयामधील एक तालुका झाला आणि पुढे 1 मे 1981 रोजी तो जिल्हा म्हणुन उदयाला आला.जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर हे  आहे.

जालना शहर  महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील जालन्याशी राज्‍य महामार्गांनी जोडलेली आहेत. जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध आहे .  स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) आहे .याच जालना शहरामध्ये हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. तसेच जालना शहरामध्ये बिडीचेही कारखाने आहेत.

जालना जिल्ह्याची स्थापना

मराठवाड्यातील जालना हा एक प्राचीन जिल्हा असून, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्पनि पूनीत झालेला जिल्हा आहे.

जालना जिल्ह्याचा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला.

पुढील काळात हा हैदराबादच्या निजामाच्या राज्यावा एक भाग होता. दिनांक १ मे, १९८२ रोजी औरंगाबाद व परभणी या जिल्ह्यांची पुनर्रचना करून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.

हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून त्याची स्थापना 1 मे 1981 रोजी झाली. स्थापना केल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे चार तालुके तसेच परभणी जिल्ह्यातील परतूर एक तालुका असे एकूण पाच तालुके जालना जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले.

इतिहास

जिल्ह्यातील जालना शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर पूर्वी माती आणि विटांच्या भिंतींनी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आलेले होते. मात्र, आता या शहरात मुर्ती दरवाजा आणि हैद्राबाद दरवाजा असे फक्त दोन दरवाजे शिल्लक आहेत. राजा अकबराच्‍या काळामध्‍ये जालना हे शहर अकबरच्‍या एका अधिकाऱ्याला जहागीर म्हणून देण्यात आलेले होते. काही काळासाठी अबुल फजलने या ठिकाणी वास्‍तव्‍य केल्याची नोंद आहे.

निजाम-उल-मुल्‍क असफ जहॉ याने या शहराबद्दल काही लिहून ठेवलेले आहे. यामध्ये त्याने औरंगाबादपेक्षाही हे शहर राहण्यासाठी पोषक असल्याचं म्हटलेलं आहे. तसेच 1725 साली त्याने काबिल खान याला जालना शहराच्या पूर्वेला एक किल्‍ला बांधण्‍यास सांगितले हेाते. या किल्ल्याचे नाव आज मस्‍तगड आहे.

जालना शहराचा जमीन महसूल मराठे गोळा करत असत. मात्र यामध्ये नेहमी बदल होत असे. मराठा सत्‍तेचे वर्चस्‍व कमी झाल्‍यानंतर शेवटी हैद्राबादच्‍या निजामाकडे या ठिकाणाची सत्‍ता गेली होती. पुढे 1855 मध्‍ये रोहीले आणी कंपनी सत्‍तेमध्ये लढाई झाली होती.

या लढाईत दोन्‍ही बाजुचे साधारणतः 100 पेक्षा अधिक सैनिक मरण पावले किंवा जखमी झाले होते. नंतर या लढाईत रोहील्‍यांना शरणागती पत्‍कारावी लागली होती.मराठवाडा मुक्ती संग्रामामधे हिरीरीने सहभाग घेउन जालना वासियांनी महत्वाची भुमिका बजावली होती, जनार्दन मामा नागपुरकर यांनी मातृभुमीकरता आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

भूरचना

जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत जालना जिल्ह्याने राज्याच्या एकूण भागापैकी 2.51 % भाग व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1.32 टक्के म्हणजेच 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ शहरी भाग आहे.

जालना जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव जिल्हा, पूर्वेस परभणी जिल्हा असून, ईशान्येस बुलडाणा जिल्हा, दक्षिणेस बीड, पश्चिमेस औरंगाबाद जिल्हा व नैऋत्येस अहमदनगर जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या वायव्येकडील भाग अजिंठ्याच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे.

भौगोलिकद्ष्टया जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते. जालना जिल्हा 19.1 ते 20.3 या उत्तर अक्षांश व 75.4 रेखांश  ते 76.4  या पूर्व रेखांशामध्ये वसलेला आहे.  जिल्हयाचे स्थान राज्यात साधारणपणे मध्यभागी आहे.

हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी असून त्याची स्थापना 1 मे 1981 रोजी झाली. स्थापना केल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे चार तालुके तसेच परभणी जिल्ह्यातील परतूर एक तालुका असे एकूण पाच तालुके जालना जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले.

2011 च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यात एकूण 971 गावे आहेत. यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्ह्यात 806 स्वतंत्र ग्रामपंचायती व 157 गटग्रामपंचायती आहेत. या आकडेवारीमध्ये काळानुसार बदल झालेला आहे.

जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. त्यांची नावे भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा अशी आहेत. या जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, परतूर व मंठा या पाच ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे.

नद्या धरणे

नदीनाले जिल्ह्याच्या दक्षिण सेमी लगत गोदावरी नदी अंदाजे 60 किलोमीटर इतके जिल्ह्यातील वाहते त्यामुळे जिल्ह्याचा दक्षिण भाग गोदावरीच्या खोऱ्यात मोडतो.

गोदावरी, पूर्णा व दुधना या जालना जिल्ह्याच्या महत्त्वाच्या नद्या असून, गिरजा, खेळणा, जीवरेखा, धामणा, दुधना, कल्याण या उपनद्या आहेत. कुंडलिका ही दूधनाची उपनदी जालना शहरातून वाहते. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा, अंबड तालुक्यातील गल्हाटी, भोकरदान तालुक्यातील जुई व धामना, जालना तालुक्यातील कल्याण,पीरकल्याण ही जिल्ह्यातील प्रमुख धरणे आहेत.

लोकसंख्या

जालना जिल्ह्याची लोकसंख्या  2011 च्या जनगणनेनुसार 19,58,000एवढी आहे .जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,687.39 वर्ग कि.मी. एवढे आहे.

साक्षरतेचे प्रमाण 73.6% आहे.

जिल्हयाचे वार्षीक सरासरी पर्जन्यमान 650 ते 750 मि.मी.आहे. लिंग गुणोत्तर एक हजार पुरुषांमागे 937 स्त्रिया असे आहे. लोकसंख्येची घनता 254 आहे.जालना जिल्ह्यात धाडसी लमाणी व भिल्ल जमाती आहेत.

हवामान

जिल्हयाचा उन्हाळा कडक असतो आणि हिवाळा देखील कडाक्याच्या थंडीचा असतो. समुद्रकिनाऱ्यापासून अधिक अंतरावर असलेल्या व खंडांतर्गत स्थान लाभलेल्या या जिल्ह्याचे हवामान स्वाभाविकच विषम व कोरडे आहे.

येथील उन्हाळा अतिशय कडक असून हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. एप्रिल- मे महिन्यात तापमान ४१ सेल्सिअसच्या पुढे जाते दैनिक व वार्षिक तापमानकक्षेतील फरक अधिक असतो.

तौलनिकदृष्टया जिल्ह्यातील पर्जन्यप्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी अवघा ४५ से. मी. इतका कमी पाऊस पडतो. त्यातही पावसाचे वितरण असमान आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. अंबड, परतूर, व मंठा या तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्टया अधिक पाऊस पडतो.

तर जाफ्राबाद, भोकरदन तालुक्यात कमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. जिल्ह्यास अल्प प्रमाणात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचाही लाभ होतो.

२०१७ मध्ये जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली, परंतु जुलैपैसून पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीप हंगाम अडचणीत आला. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 650 ते 750 मि.मि.असते.

जमिनीचा प्रकार

जालना जिल्ह्यातील जमीन सुपीक व काळी असून कापसाच्या पिकासाठी योग्य आहे. जालना, बदनापूर, भोकरदन व जाफ्राबाद या तहसीलींमधील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे.

या भागात प्रामुख्याने खरीपाची पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या दक्षिण व आग्नेय भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलींमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापसाचे व रब्बीचे पीके चांगल्या प्रमाणात येते.

जिल्ह्याच्या उत्तर भागात विहिरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमिनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असून भूगर्भातील पाणी अपुऱ्या प्रमाणात आढळते. ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते.

प्रमुख पिके

जालना जिल्ह्यातील ज्वारी मुख्य पीक असून, , ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. या जिल्ह्यातील खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, कापूस, मूग, तूर, उडीद, भुईमूग ही पिके घेतली जातात आणि रब्बी हंगामात गहू, ज्वारी, करडई व सूर्यफुलासारखी गळिताची पिके घेतली जातात. महाराष्ट्रात मोसंबीखाली सर्वात जास्त क्षेत्र जालना जिल्ह्यात आहे.

Jalnaज्या भागात जलसिंचनाच्या सोयी आहेत, तसेच त्या भागात उसाचे पीक घेतले जाते. याशिवाय डाळिंब, केळी, द्राक्षे आदी बागायती पिकेही जिल्ह्यात घेतली जातात. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात पानमळे (विड्याच्या पानांचे) आहेत.

अर्थकारण

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे जालना जिल्ह्यातील रोजगाराचे प्रमुख साधन शेती हे आहे. हा जिल्हा देशात मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच या जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने ५०० हेक्टर क्षेत्रावर हे प्रकल्प उभारला जात आहे. मराठवाड्यातील शेतमाल व औद्योगिक उत्पादने थेट मुंबईतील न्हावा शेवा पोर्ट ट्रस्टपर्यंत पोहोचविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ड्रायपोर्ट जवळून मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग तयार केला जाणार आहे. त्याद्वारे उत्पादने थेट मुंबईपर्यंत पोचविली जातील.

जिल्ह्यातील बाजारपेठा

कुंभार पिंपळगाव, रजनी, जाफराबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा, राजूर, रामनगर, सेवली. पिंपळगाव (रेणूका).

उद्योग व्यवसाय

या जिल्ह्यात जालना, परतूर, अंबड, , भोकरदन, जाफराबाद व जालना येथे औद्योगिक वसाहती असून, जालना शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. जालना व आष्टी येथे हातमाग व यंत्रमाग उद्योग चालतो. जालना येथे धातू उद्योगासह विडी व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो.

जिल्हयाचे वार्षीक सरासरी पर्जन्यमान 650 ते 750 मि.मी.

हा जिल्हा हायब्रीड सीडस्साठी प्रसिध्द असुन स्टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारीत उद्योगधंदे उदा. दालमिल, बी.बियाणे, तसच मोसंबीसाठी देखील प्रसिध्द आहे.

हा जिल्हा संकरित बियाणे प्रक्रिया सारख्या कृषि आधारित उद्योगांसाठी प्रसिध्द आहे, महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग या जिल्हयात आहेत.

जालन्याला स्टिल ऑफ  सिटी आणि बियाण्यांची राजधानी देखील संबोधण्यात येतं. येथे हातमाग आणि यंत्रमाग व्दारे कापड बनविण्याचे महत्वाचे केंद्र आहे. जालना जिल्हयातील जनतेने ‘मराठा मुक्ती संग्रामामधे’ महत्वाची भुमिका पार पाडली होती.

जिल्हयाचा 95 %भाग हा गोदावरी नदीच्या खो.यात येतो.ज्वारी, गहु, इतर धान्य आणि कापुस ही येथील मुख्य पिकं आहेत.

या जिल्हयात केंद्र सरकारच्या वतीनं 500 हेक्टर क्षेत्रावर ड्रायपोर्ट उभारला जात असुन मराठवाडयातील शेतमाल आणि औद्यागिक उत्पादनं थेट मुंबईतील  जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पर्यंत पोहोचवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

मुंबई, नागपुर समृध्दी महामार्ग या जिल्हयातुन जाणार आहे.

दळणवळण

जालना जिल्ह्यामधून धुळे ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ गेला असून, मनमाड-काचीगुडा हा लोहमार्ग पुढे सिकंदराबादला दक्षिणेत गेला आहे.

जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिरे

जालना शहराची मंमादेवी, आनंदस्वामी मठ, दुर्गामाता मंदीर, मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर, राजुर चा गणपती, समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान, जाम (तालुका घनसावंगी), प्रसिध्द दर्गा रऊनापराडा ता. अंबड (या ठिकाणी दरवर्षी मोठा ऊरूस भरतो), चक्रधर स्वामींचे मंदीर (वालसावंगी), येथीलच विठ्ठल रूक्मिणी मंदिर.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment