झुणका रेसिपी मराठी Jhunka Recipe in Marathi Language

झुणका रेसिपी मराठी Jhunka Recipe in Marathi Language झुणका भाकर नाव आपण ऐकलंच असेल, ही रेसिपी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खूप प्रसिद्ध आहे.  बऱ्याच धार्मिक स्थळावर देखील झुणका भाकर प्रसादाच्या स्वरूपात मिळतो.  झुणका हा एक भाजीचा प्रकार आहे.  झुणका या भाजीसोबत भाकरी खायला छान लागतात तसेच झुमक्याची चव अप्रतिम व चविष्ट अशी असते.  एकदा जर का झुणका भाकरी खाल्ली तर ती परत खाण्याची इच्छा होतेच.  तर आज आपण झुणका ही रेसिपी कशी तयार करायची  त्याविषयी माहिती बघणार आहोत.

Jhunka Recipe

झुणका रेसिपी मराठी Jhunka Recipe in Marathi Language

रेसिपी प्रकार :

झुणका हा महाराष्ट्रातील पारंपारिक शाकाहारी मराठी पदार्थ आहे.  त्यामध्ये हरभरा डाळीचे पीठ खरपूस व घट्ट शिजवून झुणका तयार केला जातो.  झुणका बनवण्याच्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे पातळ झुणका, ज्याला पिठले सुद्धा म्हणतात.  व दुसरा म्हणजे घट्ट झुणका.  ज्यामध्ये कांदा, मिरची, मीठ, कोथिंबीर, लसुन इत्यादी पदार्थ टाकून तयार केला जातो.  भाकरी सोबत किंवा भातासोबत हा दिला जातो.  तर चला मग जाणून घेऊया झुणका या रेसिपी विषयी माहिती.

ही रेसिपी किती लोकांकरिता बनणार आहे ?

ही रेसिपी आपण 6 व्यक्तींकरिता बनवणार आहोत.

पूर्वतयारी करताना वेळ :

झुमका रेसिपी तयार करण्याकरता पूर्व तयारी करावी लागते त्याकरता किमान आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

झुणका रेसिपी कुकिंग करण्यासाठी आपल्याला 10 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम  :

झुणका रेसिपी पूर्ण तयार करण्याकरिता आपल्याला एकूण वेळ हा 20 मिनिटे लागतो.

झुणका रेसिपी तयार करण्याकरता लागणारे साहित्य :

1)  दोन वाटी बेसन हरभरा डाळीचे

2)  अर्धा चमचा मोहरी

3) अर्धी वाटी तेल

4) अर्धा चमचा जिरे

5) पाव चमचा हिंग

6) एक चमचा अद्रक पेस्ट

7) बारीक चिरलेला लसूण एक चमचा

8) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाच

9)  एक वाटी चिरलेला कांदा

10) पाव चमचा हळद

11) चवीनुसार मीठ

12)  बारीक चिरलेली कोथिंबीर

फोडणीसाठी लागणारे साहित्य  :

1) एक मोठा चमचा तेल

2) अर्धा चमचा मोहरी

3) पाव चमचा हिंग

4) आठ ते दहा कढीपत्त्याची पानं

5) दोन चमचे बारीक चिरून लसूण

6) दोन सुखी लाल मिरची

पाककृती  :

  • मालपुवा रेसिपी मराठी
  • सर्वप्रथम एका खोल नॉनस्टिक कढाई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी घाला.  मोहरी चांगली तडतडू द्या.  छान अशी मोहरी तडतडून झाली की, त्यामध्ये जिरे व हिंग घाला आणि मध्यम आचेवर काही सेकंद परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, आले, लसूण आणि कांदा घाला व हे सर्व मिश्रण पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये हळद बेसन आणि मीठ घाला, हे मिश्रण चांगले एकत्र करून घ्यावे आणि हळूहळू एक ते दोन मिनिटे शिजवून घ्यावे.
  • अर्धा कप गरम पाणी घाला आणि चांगले ढवळून घ्या.  नंतर कढईवर झाकण ठेवा. हे झाकून ठेवून तीन ते चार मिनिटे मंद आचेवर झुणका शिजवून घ्या.
  • नंतर त्यामध्ये कोथिंबीर घाला व चांगले ढवळून घ्या.
  • फोडणी तयार करण्याकरिता एका छोट्या नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून घ्या.  त्यामध्ये मोहरी, हिंग आणि लसूण घाला तसेच मध्यम आचेवर एक मिनिट परतून घ्या.
  • नंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि लाल तिखट घाला तसेच मध्यम आचेवर फोडणी चांगली परतून घ्या.
  • झुणका भाजीमध्ये ही फोडणी घाला आणि चांगले ढवळून घ्या.
  • अशाप्रकारे तुमची गरमागरम झुणका रेसिपी तयार आहे.  आता ही रेसिपी तुम्ही भाकरी, भात व पोळी सोबत सर्व्ह करा.

पोषक घटक :

झुणका हे हरभरा डाळी पासून बनवली जाते त्यामध्ये हिंग, कांदा, कोथिंबीर असे पौष्टिक घटक टाकले जातात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये कॅलरी, सोडियम, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, विटामिन, एप्रथिने, शुगर, कॅल्शियम, लोह इत्यादी पौष्टिक घटक असतात.

फायदे  :

झुणका भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला त्यापासून प्रथिने, कॅल्शियम असे पौष्टिक घटक मिळतात.  जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक्षमता वाढवतात तसेच हाडे मजबूत करतात.

झुणका खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते त्यापासून आपल्या शरीराला प्रोटीन देखील मिळते.

तसेच झुणका भाजी खाल्ल्यामुळे त्यातून मिळणारे अमिनो ऍसिड शरीरातील पेशी मजबूत करतात.

झुणका भाकर ही मधुमेह रुग्णांसाठी देखील फायद्याचे आहे.

झुणकामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

तोटे  :

झुणका पचण्यास जड व किंचितसा उष्ण असल्यामुळे वातदोष वाढू शकतो.  त्यामुळे वात असणाऱ्या रुग्णांनी झुणक्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.

तसेच पचनशक्ती मंद असणाऱ्यांनी देखील झुणका कमी प्रमाणात खावे.

झुणक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपण जर ती भाजी अति प्रमाणात खाल्ली तर आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

तर मित्रांनो, तुम्हाला झुणका ही रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.  तसेच ही रेसिपी तुम्ही घरी बनवून पहा.

Leave a Comment