कचोरी रेसिपी मराठी Kachori Recipe In Marathi कचोरी हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. ज्याचा उपयोग लोक सकाळी नाष्टा म्हणून करतात, कचोरी ही अतिशय लोकप्रीय चाट आहे. कचोरीचे अनेक प्रकार आहेत, यापैकी मुंग डाळ कचोरी प्रसिद्ध व चवदार आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हामध्ये शेगाव येथील शेगाव कचोरी ही पूर्ण महाराष्ट्र तसेच अनेक राज्यात प्रसिद्ध आहे. ही खूप चवदार आणि स्वादिष्ट कचोरी मानली जाते. कचोरीमध्ये सर्वात जास्त मूंग डाळ कचोरी ही लोकांची आवळती आहे. आपण हॉटेल किंवा बेकरी वरती पाहतो. एकदम स्वादिष्ट आणि चमचमीत कचोरी खायला मिळते. काही लोकांना कचोरी खूप आवडते, पण त्यांच्या परिसरात स्वादिष्ट कचोरी मिळत नाही आणि काही लोक बाहेर जाऊ शकत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहे, एकदम सोप्या आणि सहज पद्धतीने स्वादिष्ट कचोरी कशी बनवायची तर चला मग जाणून घेऊया कचोरी रेसिपी विषयी माहिती.
कचोरी रेसिपी मराठी Kachori Recipe In Marathi
कचोरीच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ :
कचोरी बनवण्यासाठी आपल्याला पहिले पूर्वतयारी करावी लागते. यासाठी आपल्याला 30 मिनिट वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
कचोरी कुकिंग करण्यासाठी आपल्याला 20 मिनिट वेळ लागतो.
टोटल टाईम :
कचोरी तयार करण्यासाठी पहिले पूर्वतयारी करावी लागते. नंतर आपण लवकर कचोरी तयार करू शकतो, आणि नंतर कुकिंग करावी लागते. यासाठी आपल्याला टोटल टाईम 1 तास वेळ लागतो.
किती लोकांकरिता रेसिपी बनवणार आहे?
कचोरी ही रेसिपी आपण 6 व्यक्तिकरिता बनवणार आहे.
कचोरीचे प्रकार :
कचोरी हा एक लोकप्रिय नास्ता आहे. कचोरीचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी मूंग डाळ कचोरी, मटर कचोरी, आलू कचोरी, तूरडाळ कचोरी, गोड कचोरी, मसला कचोरी, खस्ता कचोरी, कांदा कचोरी हे सर्व कचोरीचे प्रकार आहेत. जे खायाला खूप स्वादिष्ट आणि चवदार आहेत.
कचोरीसाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे :
1) 3 वाटी मध्यम मुग डाळ.
2) 1 वाटी बेसन.
3) 1 चम्मच हळद.
4) 1 पाव मैदा.
5) 1 चम्मच धनिया पावडर.
6) 1 चम्मच लाल मिरची पावडर.
7) 1 चिमूट काळे मीठ.
8) 1 चम्मच गरम मसाला.
9) चवीनुसार मीठ.
10) तेल.
11) 1 चिमूट कस्तुरी मेथी.
12) 1 चिमूट आमचूर पावडर.
पाककृती :
- सर्वात प्रथम कचोरी बनवण्या अगोदर मूंग 6 तास भिजू घाला, नंतर तिला स्वच्छ धुऊन घ्या.
- कचोरीसाठी लागणारे पीठ तयार करूया. एक सपाट मोठे भांडे घ्या, त्यामध्ये मैदा टाका.
- यात चवीनुसार थोडे मीठ व 2 चम्मच तेल टाका, आणि थोडे थोडे पाणी टाकत, पीठ मऊ मऊ तयार करा.
- व्यवस्थित मिक्स करून पीठाचा नरम गोळा तयार करा. नंतर 10 मिनिट हा गोळा मुरण्यासाठी एका ओल्या कापडात बाजूला ठेवा.
- आता आपण कचोरीसाठी लागणारा मसाला तयार करूया, सर्व साहित्य जवळ घ्या.
- कचोरीसाठी लागणारी भिजलेली मूगडाळ मध्यम मिक्सर मधून बारीक करून घ्या.
- आता गॅस वरती एक खोल तळाचा पॅन ठेवा, आणि गॅस चालू करा. त्यामध्ये 5 ते 6 चम्मच तेल टाका.
- प्रथम यामध्ये बारीक अद्रक टाका, गॅस मध्यम आशेवरीती ठेवा. नंतर धनिया पावडर आणि गरम मसाला टाका.
- मसाला व्यवस्थित झाला की, यामध्ये 1 वाटी बेसन टाका आणि चांगले भाजून घ्या.
- बेसन भाजून झाल्यावर यामध्ये बारीक केलेली मूगडाळ टाका, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या, गॅस मध्यम आशेवरती ठेवा.
- नंतर यामध्ये 1 चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, थोडे काळे मीठ, कस्तुरी मेथी, आणि चवीनुसार मिठ टाकून, पूर्ण मिक्स करून घ्या.
- मसाला झाला की, थोडा कोरडा दिसेल. नंतर गॅस बंद करून मसाला खाली काढून घ्या.
- कचोरी मसाला थंड झाला की, मध्यम आकाराचे लहान गोळे तयार करा, आता मैद्याचे कणीक घ्या.
- आता पीठाचा एक छोटा भाग घ्या, आणि त्याला लाटून व्यवस्थित लहान गोल वाटीसारखा तयार करा.
- हे करत असताना मधातील भाग थोडा जाड आणि बाजूचा भाग थोडा पतला करावा.
- आता मसालाचा एक गोळा घेऊन, चपातीच्या मध्यभागी ठेवा, आणि मसाला बंद करून घ्या.
- त्याची मध्यम गोल कचोरी तयार करा, अशा प्रकारे सर्व कचोरी तयार करून घ्या.
- नंतर गॅस चालू करून, त्यावर एक खोल तळाची कढई ठेवा, आणि आवश्यक तेवढे तेल टाकून तेल गरम करा.
- त्यात एक एक करून कचोरी तळून घ्या, व गॅस मध्यम आशेवर ठेवा. कचोरी एका बाजूने थोडी लालसर झाली की दुसऱ्या बाजूने उलटा.
- कचोरी सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढून घ्या. आता आपली गरमा गरम कचोरी तयार आहे.
- कचोरी एका प्लेटमध्ये घेऊन, त्यावर थोडी खताई, बारीक कांदा, बारीक शेव, आणि एक तळलेली हिरवी घेऊन स्वादिष्ट आणि मसालेदार कचोरी आपण खाऊ शकतो.
कचोरीमध्ये असणारे घटक :
कचोरी ही मूगडाळ, बेसन,मसाले पासून बनवली जाते. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, फॅट, चरबी, सोडियम हे सर्व घटक आहेत. हे मानवी शरिसाठी खूप आवश्यक घटक आहेत.
फायदे :
कचोरी मध्ये असणारे घटक जसे व्हिटॅमिन, प्रथिने हे आपले शरीर निरोगी ठेवतात.
यातील फॅट आणि चरबी आपली शारीरिक चरबी वाढवण्यास मदत करतात.
कचोरी खाल्ल्याने अनेक पोषक घटक मिळतात. यातील घटक आपल्यासाठी खूप फायद्याचे आहेत.
तोटे :
कचोरी ही तेलातून तळून बनवली जाते. हे आपण जास्त प्रमाणात सेवन केली तर आपल्याला मळ मळ होऊ शकते.
यामध्ये असणारी मूगडाळ, बेसन आणि मसाले आपण जास्त सेवन केल तर आपल्याला पोटदुखी होऊ शकते.
म्हणून आपण कचोरी योग्य प्रमाणात सेवन केली पाहिजे. ज्यामुळे आपली तब्बेत चांगली राहील.
तर मित्रांनो, तुम्हाला कचोरी रेसिपी ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.